डोसे किंवा धिरडे हा पदार्थ अनेक जणांच्या आवडीचा. त्यामुळे नाश्त्याला हे पदार्थ करावेत असं अनेकदा वाटतं. शिवाय ते पौष्टिकही खूप असतात. धिरडे हा तर प्रोटीन्सचा एक उत्तम स्त्रोत मानला जातो. त्यामुळे ते आपल्या आहारात नेहमी असावंच.. पण नेमकी अडचण अशी होते की हे दोन्ही पदार्थ करणं अनेकजणींना खूपच त्रासदायक होतं. करण धिरडे असो किंवा डोसे असो ते तव्याला चिटकून बसतात. निघता निघत नाहीत. त्यामुळे मग डोसे किंवा धिरडे खाण्याचा आनंद मिळण्यापेक्षा त्याचा त्रासच जास्त होतो (how to make dosa or chilla perfectly?). म्हणूनच या काही टिप्स पाहा आणि ट्राय करा (tips and tricks for making perfect chilla). यामुळे डोसे असो किंवा मग धिरडे असो ते तुम्हाला अगदी झटपट करता येतील..(why dosa get stick to pan?)
डोसा किंवा धिरडे तव्याला चिटकून बसू नयेत म्हणून टिप्स...
१. डोसे किंवा धिरडे करताना सगळ्यात पहिली गोष्ट ही लक्षात ठेवावी की दोन्हींचे पीठ खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ करू नये. कारण पीठ घट्ट किंवा पातळ झाले तरी डोसे आणि धिरडे व्यवस्थित जमत नाहीत.
'चलता है' म्हणत नेहमीच उशिरा झोपता? डॉ. श्रीराम नेने सांगतात अपुऱ्या झोपेचे गंभीर दुष्परिणाम
२. दुसरी गोष्ट म्हणजे डोसे किंवा धिरडे करण्यापुर्वी तव्याला थोडे सेट करणे गरजेचे असते. यासाठी तवा थोडा तापू द्या. तवा गरम झाल्यानंतर त्यावर सगळ्याबाजुने व्यवस्थित तेल लावून घ्या. यानंतर तव्यावर पाणी शिंपडा आणि ते पाणी एखाद्या कोरड्या सुती कपड्याने अलगदपणे पुसून घ्या. अशा पद्धतीने तवा सेट केल्यावरच त्यावर डोसे किंवा धिरडे करायला घ्या.
३. डोसे किंवा धिरडे करण्यासाठी तुमचा तवा कितपत तापलेला आहे हे लक्षात घेणंही गरजेचं आहे. जर तवा खूप जास्त तापलेला असेल तर डोसा किंवा धिरडे व्यवस्थित होत नाही. ते चिटकून, करपून जाते.
९० टक्के लोक मायक्रोवेव्ह वापरताना करतात गंभीर आजार ओढवून घेणाऱ्या 'या' चुका! तुमचंही चुकतंय?
४. जेव्हा तुम्ही डोश्याचं किंवा धिरड्याचं पीठ तव्यावर टाकून ते पसरवत असता तेव्हा गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवा. त्यानंतर फ्लेम मध्यम आचेवर करा. खूप मोठ्या गॅसवर धिरडं किंवा डोसा करपून जातो.