Lokmat Sakhi >Food > उपमा करताना त्यात रव्याच्या गाठी- गुठळ्या होतात? ४ टिप्स -उपमा बिघडणारच नाही

उपमा करताना त्यात रव्याच्या गाठी- गुठळ्या होतात? ४ टिप्स -उपमा बिघडणारच नाही

Tips And Tricks For Making Perfect Rava Upma: उपमा करताना त्यात रव्याच्या गाठी किंवा गुठळ्या राहून जात असतील, तर असं होऊ नये म्हणून ४ गोष्टी लक्षात ठेवा. (How to make upma)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2024 09:07 AM2024-01-06T09:07:12+5:302024-01-06T15:03:29+5:30

Tips And Tricks For Making Perfect Rava Upma: उपमा करताना त्यात रव्याच्या गाठी किंवा गुठळ्या राहून जात असतील, तर असं होऊ नये म्हणून ४ गोष्टी लक्षात ठेवा. (How to make upma)

Tips and tricks for making perfect rava upma, How to make upma, upma recipe in marathi, How to avoid lumps in suji upama | उपमा करताना त्यात रव्याच्या गाठी- गुठळ्या होतात? ४ टिप्स -उपमा बिघडणारच नाही

उपमा करताना त्यात रव्याच्या गाठी- गुठळ्या होतात? ४ टिप्स -उपमा बिघडणारच नाही

Highlightsउपमा करताना तो तसा बराच काळजीपुर्वक आणि थोड्या टिप्स वापरून करावा लागतो.

नाश्त्यासाठी इडली, डोसा, सॅण्डविज, ब्रेड बटर असे पदार्थ आता आले. काही वर्षांपुर्वी तर पोहे, उपमा किंवा उपीट, कुस्करा असे  पदार्थच नाश्त्यासाठी केले जायचे. त्यातल्या त्यात पोहे जरा जास्तच व्हायचे. कारण ते करायला सोपे. उपमा करताना तो तसा बराच काळजीपुर्वक आणि थोड्या टिप्स वापरून करावा लागतो. कारण त्यात जर काही गडबड झाली तर लगेच तो एकतर खूप पातळ  होतो, नाहीतर घट्ट होतो किंवा मग त्यात रव्याच्या गाठी किंवा गुठळ्या राहतात (Tips and tricks for making perfect rava upma). उपमा करताना तुम्हालाही अशीच अडचण होत असेल तर या काही टिप्स लक्षात ठेवा (How to make upma). उपमा अगदी छान मऊसूत होतो आणि सगळ्यात मुख्य म्हणजे त्यात गाठी राहात नाहीत.(upma recipe in marathi)

 

उपम्यामध्ये गाठी राहू नये म्हणून टिप्स

१. उपमा करताना आपण फोडणी करून घेतो. त्यानंतर कढईमध्ये पाणी टाकतो. अनेक जणी थंड पाणी फोडणीत घालतात किंवा काही जणी खूप उकळतं पाणी फोडणीत टाकतात. असे दोन्ही प्रकार करू नयेत. थंड किंवा उकळतं अशा दोन्ही प्रकारचं पाणी घालू नये. फोडणीमध्ये जे पाणी घालू ते गरम असावं. थंड किंवा उकळतं पाणी घातल्याने गुठळ्या होतात.

कॉर्न स्टार्च आणि कॉर्न फ्लोअर यात नेमका काय फरक? पदार्थ बिघडेल- पाहा काय वापरायचं?

२. उपमा करण्यासाठी आपण रवा भाजतो. रवा कच्चा राहिला तरीही उपम्यामध्ये गाठी किंवा गुठळ्या राहतात. त्यामुळे रवा सोनेरी रंगाचा होईपर्यंत चांगला भाजून घ्यावा.

 

३. भाजलेला रवा जेव्हा आपण फोडणीच्या पाण्यात घालतो, तेव्हा तो रवादेखील गरम किंवा कोमट असावा. पाणी गरम आणि भाजलेला रवा थंड असं झालं तरीही उपम्यामध्ये गाठी होऊ शकतात.

केस गळणं कमी करणारा सोपा उपाय, केस होतील घनदाट- वाढतील भराभर, करून पाहा

४. कढईतल्या गरम पाण्यात भाजलेला रवा टाकताना तो एकदम टाकू नये. हळूहळू टाकावा. तसेच दरवेळी थोडा थोडा रवा टाकला की कढईतलं सगळं मिश्रण हलवून घ्यावं. यासाठी इतर कोणताही चमचा वापरण्यापेक्षा झाऱ्या वापरावा. यामुळे पाणी व्यवस्थित हलवलं जातं आणि गुठळ्या होत नाहीत. 


 

Web Title: Tips and tricks for making perfect rava upma, How to make upma, upma recipe in marathi, How to avoid lumps in suji upama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.