जेवणात वरण, भाजी, भात, चटणी, कोशिंबीर हे पदार्थ एक वेळ कमी प्रमाणात असले किंवा त्यांची चव थोडी बिघडलेली असली तरी चालते. पण पोळी किंवा फुलके हे मात्र पोटभर असायला हवेत आणि दुसरं म्हणजे ते व्यवस्थितच करता आले पाहिजेत. कारण पोळी किंवा चपातीवरच आपले बहुतांश जेवण अवलंबून असते. जर पोळ्याच कडक, वातड होत असतील किंवा काठांना कच्च्या राहात असतील तर जेवणाची मजाच निघून जाते (tips and tricks for making soft wheat roti). त्यामुळे परफेक्ट मऊ पोळी कशी करायची याविषयीच्या या काही खास टिप्स...(how to make chapati or fulka more soft?)
पोळी किंवा चपाती मऊ राहण्यासाठी टिप्स
१. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कणिक मळण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करा. यामुळे कणिक छान मळली जाते आणि पोळ्या मऊसूत होतात.
काळेभोर-चमकदार-लांबसडक केसांचं सिक्रेट! महिन्यातून २ वेळा करा 'हा' सोपा उपाय
२. कणिक मळून झाली की हातावर थोडे तेल घ्या आणि ते कणकेच्या गोळ्याला लावा. त्यानंतर पुन्हा ५ ते ७ मिनिटे कणिक मळा. जेवढी जास्त तुम्ही कणिक मळाल तेवढ्या तिच्या पोळ्या अधिक मऊ, चांगल्या होतील.
३. कणिक मळून झाल्यानंतर कधीही लगेचच पोळ्या लाटायला घेऊ नका. कणिक मळल्यानंतर ती किमान १० मिनिटांसाठी तरी झाकून ठेवा आणि त्यानंतर पोळ्या लाटायला सुरुवात करा.
४. जेव्हा तुम्ही पोळ्या भाजत असाल तेव्हा गॅस खूप मोठा किंवा खूप कमी करू नका. या दोन्ही गोष्टींमध्ये पोळ्या कडक, वातड होतात. पोळ्या भाजताना गॅसची फ्लेम नेहमी मध्यम ते जास्त अशा पद्धतीने ठेवावी.
लग्नसराई स्पेशल अंगठ्यांचे ७ सुंदर पर्याय!! कपल रिंग घालून करा रोमँटीक नात्याची सुरूवात
५. पोळ्यांचे काठ जर व्यवस्थित भाजले गेले नाहीत तर पोळ्या कडक होतात. त्यामुळे उचटणे किंवा बाजारात मिळणारे पोळ्या भाजण्याचे लाकडी यंत्र वापरून पोळ्यांचे काठ दाबून दाबून व्यवस्थित भाजा.
६. भाजून झाल्यानंतर पोळी जेव्हा तुम्ही तव्यावरून खाली घ्याल तेव्हा लगेचच त्याला तेलाचा किंवा तुपाचा हात लावा आणि ती पोळी दुमडून ठेवा. पसरवून ठेवल्यानेही पोळी बऱ्याचदा कडक होते.