Join us  

विळी न वापरता नारळ खोवण्याच्या २ सोप्या ट्रिक्स, भराभर नारळ खोवून करा नारळीपौर्णिमा साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2023 9:06 AM

Cooking Tips: विळीमुळे हाताला दुखापत होण्याची भिती वाटते ना, म्हणूनच नारळ खाेवण्याच्या या दोन सोप्या ट्रिक्स पाहून घ्या. (Naral or coconut khovane)

ठळक मुद्देविळी घेऊन नारळ खोवण्याची भिती वाटत असेल तर या २ सोप्या पद्धती पाहून घ्या. पाहिजे तेवढं नारळ भराभर खोवून होईल.

नारळीपौर्णिमेला भावासाठी तसेच येणाऱ्या पाहुण्यांसाठी नारळीभात, नारळाची करंजी असं काय काय करायचं असेल, तर त्यासाठी नारळ खोवण्याची तयारी आधीपासूनच करावी लागते. कारण नारळ खोवण्याचं काम घाई- गडबडीत करून मुळीच चालत नाही. थोडीशी घाई केली की लगेच विळीशी गाठ. हाताला दुखापत होऊ शकते. म्हणूनच विळी घेऊन नारळ खोवण्याची भिती वाटत असेल तर या २ सोप्या पद्धती पाहून घ्या. पाहिजे तेवढं नारळ भराभर खोवून होईल. (Naral or coconut khovane without using chopping pad or cutter )

 

विळी न वापरता कसं खोवायचं नारळ?१. किसनीनारळाचा वरचा काळपट चॉकलेटी भाग काढून टाका आणि मध्यम आकाराच्या छिद्राच्या किसनीने नारळ किसून घ्या.

वजन लवकर कमी करायचंय? रोज सकाळी १ गोष्ट करायला मुळीच विसरु नका, आहारतज्ज्ञ सांगतात..

यासाठी खूप मोठ्या छिद्रांची किंवा खूप लहान छिद्रांची किसनी वापरून जमणार नाही. कारण लहान छिद्रांच्या किसनीने नारळ किसताना त्याचं दूध निघेल. त्यामुळे किसनीची निवड अचूक पद्धतीने करा. 

 

२. मिक्सरनारळ खाेवण्याची दुसरी सोपी पद्धत म्हणजे मिक्सर. पण मिक्सरचा वापर करून नारळ खोवणार असाल, तर खूप काळजीपुर्वक करावे लागेल. कारण थोडा वेळ जरी मिक्सर जास्त फिरलं तरी नारळाची पेस्ट होऊ शकते.

मुलांना ३ खेळ शिकवा, एकाग्रता वाढेल- डोकं होईल सुपीक आणि मोबाइलचं वेडही होईल कमी 

म्हणूनच त्यासाठी या काही गोष्टी लक्षात ठेवा. नारळाचे उभे काप करा आणि ते मिक्सरमध्ये टाका. अगदी ३ ते ४ सेकंदासाठी मिक्सर फिरवा आणि लगेच बंद करा. असं थोडं थोडं मिक्सर फिरवून नारळ छानपैकी खोवता येतं.  

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.रक्षाबंधन