Join us  

थंडीच्या दिवसांत इडलीचं पीठ आंबविण्यासाठी ५ खास टिप्स, इडल्या मस्त फुलून येतील- चवदार होतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2023 2:12 PM

How to Ferment Idli Batter in Winter: हिवाळ्यात थंडीमुळे इडलीचं पीठ व्यवस्थित आंबत नाही, त्यामुळे मग ते चांगलं फुगत नाहीत आणि इडल्याही मऊ होत नाहीत, अशी तक्रार अनेकींची असते. त्यासाठीच बघा हे काही खास उपाय. 

ठळक मुद्देया काही खास टिप्स, हिवाळ्यातही इडलीचं पीठ छान आंबवलं जाईल आणि इडल्या मस्त फुलून येतील.

घरी पीठ करून तयार केलेल्या इडल्या चवीला अगदी उत्तम लागतात. त्यामुळे बऱ्याचजणी इडली- डोसा यासाठी विकतचं पीठ (How to ferment Idli batter in Winter)आणण्यापेक्षा घरीच पीठ तयार करण्यावर भर देतात. पण बऱ्याचदा थंडीच्या दिवसांत असं होतं की इडलीचं पीठ व्यवस्थित आंबत नाही. त्यामुळे मग इडल्या चांगल्या फुलून येत नाहीत आणि मऊसूत होत नाहीत. म्हणूनच या काही खास टिप्स बघा (Tips and tricks for soft spongy idli batter) आणि एकदा ट्राय करा. यामुळे हिवाळ्यातही इडलीचं पीठ छान आंबवलं जाईल आणि इडल्या मस्त फुलून येतील.

हिवाळ्यात इडलीचं पीठ फुलून यावं यासाठी टिप्स१. इडलीचं पीठ भिजविण्यासाठी ३ वाट्या तांदूळ आणि १ वाटी उडीद डाळ असं प्रमाण घ्यावं. इंद्रायणी तांदूळ वापरू नये, कारण तो अधिक चिकट असतो.

कपडे ड्रायरमध्ये खूप वेळ राहिल्याने चुरगळले? बर्फाचा करा खास वापर, आढ्या होतील गायब 

इतर कोणताही तांदूळ वापरला तरी चालेल. तसेच डाळ- तांदूळ भिजवतातना त्यात २ चमचे हरबरा डाळ, १ चमचा मसूर डाळ, अर्धा चमचा मेथी दाणे टाका.

 

२. इडलीसाठी भिजत टाकलेले डाळ- तांदूळ हिवाळ्यात कमीतकमी ८ तासांसाठी भिजत ठेवावे. उन्हाळ्यात ६ तास भिजवले तरी चालतात. तसेच इडलीचं पीठ मिक्सरमधून वाटताना ते थोडं जाडसर ठेवावं. 

प्रेग्नन्सीच्या सुरुवातीला त्रास झालाच, पण कोणाला सांगू शकले नाही, कारण.... आलिया भट सांगतेय...

३. हिवाळ्यात इडलीचं पीठ व्यवस्थित आंबवलं जावं यासाठी डाळ- तांदूळ वाटताना त्यात दोन ते ब्रेड बारीक चुरून टाकावेत. किंवा मिक्सरमधून काढावे. ब्रेडचे काठ मात्र काढून टाकावेत.

 

४. इडलीचं पीठ आंबविण्यासाठी ते भांडे ठेवण्याच्या ट्रॉलीमध्ये ठेवावे. किंवा पीठ भरून ठेवलेलं भांडं झाकण लावून एखाद्या मोठ्या डब्यात ठेवून द्यावं. काही वेळ दुपारच्या उन्हात ठेवलं तरी चालेल. किंवा मग त्या भांड्यावर एखादं जाडसर पांघरून टाकून द्यावं.

स्क्रिन पाहून डोळ्यांवर ताण येतो? २ मिनिटांचा एक सोपा उपाय, वाचा योगतज्ज्ञांचा खास सल्ला 

५. मायक्रोवेव्ह प्री- हिट कन्व्हेंशन मोडवर १० मिनिटांसाठी ठेवावं. त्यानंतर ते बंद करून टाकावं आणि त्यात इडलीच्या पीठाचा डबा ठेवावा. पीठ चांगलं फुलून येईल.

 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.