Join us  

लसूण सोलण्याचं किचकट काम होईल सोपं; २ मिनिटांत सोलून होतील अर्धा लसूण; एकदम सोपी ट्रिक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2024 8:17 PM

Home Tips And Tricks : काही सोप्या ट्रिक्स वापरल्या तर लसूण सोलणं सोपं होईल.

लसूण (Garlic)  जेवणाची चव वाढवण्यासाठी आहारात वापरला जातो.  छोट्या छोट्या पाकळ्या सोलणं खूपच कठीण होतं.  लसूण सोलायला खूपच वेळ जातो तर कधी नखं दुखतात. लसूण सोलण्यासाठी तुम्ही काही सोप्या ट्रिक्स वापरल्या तर तुमचं काम सोपं होईल. काही सोप्या ट्रिक्स वापरल्या जर लसूण सोलणं सोपं होईल. तुम्ही किचनचं काम सोपं, सरळ बनवू शकता. (How To Peel Garlic In Minutes Try This Amazing Quick Peeling Hack) 

इटींग वेलच्या रिपोर्टनुसार नेहमी ताजे दिसतील असेच लसूण विकत घ्या. सुकलेले लसूण घेतल्यास काही दिवसांनी ते खराब होऊ लागतात. कोरड्या ठिकाणी लसूण साठवून ठेवा. पावसाळ्याच्या दिवसांत उघड्यावर लसूण ठेवल्यास त्यावर लगेच मॉईश्चर येते.  एका बरणीत लसूण भरून बरणी वर-खाली हलवा. ज्यामुळे लसूण चांगले सोलून होतील.

खरं कोणं आणि खोटे मित्र कोण कसं ओळखाल? विकास दिव्यकिर्ती सांगतात चांगल्या लोकांना कसं ओळखायचं

एका ताटात लसूण घेऊन ते मायक्रोव्हेव्हमध्ये 30 ते 60 सेकंदांसाठी ठेवा. त्यानंतर लसूण चांगले सोलून होतील. लसूण सोलण्यासाठी तुम्हाला  सुरीची आवश्यकता असेल. सगळ्यात आधी लसणाच्या कळ्या सुरीच्या मदतीने अर्ध्या कापून घ्या. त्यानंतर लसणाच्या कळ्या चिरलेला भाग खाली असेल अशा पद्धतीने ठेवा. 

जेवणानंतर फक्त १ चमचा 'या' बीया खा; कोलेस्टेरॉल-BP कंट्रोलमध्ये येईल; पोट नीट साफ होईल

त्यानंतर सुरीने फ्लॅट बाजूचा लसूण ठेवा नंतर व्यवस्थित ठोका त्यानंतर लसूण लगेच बाहेर येतील. हे काम करण्यासाठी तुम्हाला ४ ते ५ सेकंद लागतील.  या पद्धतीने एका मिनिटांत तुम्ही अर्धा किलो  लसूण सोलू शकता. ही नवीन ट्रिक वापरून तुमचं काम अधिकच सोपं होईल.

लसूण सोलण्याची ही ट्रिक वापरल्यास तुम्ही चविष्ट पदार्थ कमी वेळात बनवू शकता. हे टेक्निक वपरून तुम्हाला अधिकच फायदा होईल. गरम पाण्यात तुम्ही लसूण घालू शकता अशी ट्रिक तुम्ही याआधी कधीच पाहिली नसेल.  लसणाच्या पाकळ्या गरम पाण्यात ठेवा त्यानंतर लसूण त्यातून बाहेर काढा. ज्यामळे त्याची सालं लगेच निघतील. लसूण खराब होऊ नयेत यासाठी सोललेले लसूण एका कोरड्या बरणीत भरून ठेवा. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.