साऊथ इंडियन पदार्थ भारतभरात आवडीने खाल्ले जातात. हे पदार्थ स्वादीष्ट तितकेच चवीलाही चांगले असतात. (Cooking Hacks & Tips) डाळ, भाजी, सांबार, इडली, डोसा हे पदार्थ खायला सर्वांनाच आवडते. जगभरातील इडली डोसा खाण्यासाठी वेडे असल्याचं दिसून येतं. डोसा घरी बनवणं अनेकांना अवघड वाटतं कारण डोसा बनवणं थोडं ट्रिकी काम आहे. तव्याला डोसा चिकटतो, डोसा व्यवस्थित होत नाही अशी अनेकांची तक्रार असते. (How to Make Perfect Dosa At Home)
डोसा तव्यावर चिकटू नये यासाठी काय करावे? (How to Make Perfect Dosa)
सगळ्यात आधी तवा उच्च आचेवर गरम करा. तवा व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यावर पाण्याचे काही थेंब शिंपडा. कॉटनच्या कापडाने पुन्हा व्यवस्थित पुसून घ्या. २ ते ३ वेळा हा प्रयोग केल्यास चांगला परिणाम दिसून येईल. आच मंद ठेवा तव्यावर थोडं तेल पसरवून घ्या नंतर ओल्या कापडाने पुसा. नंतर तव्याला तेल लावून घ्या. चमच्याच्या साहाय्याने डोश्याचे पीठ परसवा नंतर डोसा पलटवा. यात तुम्ही गरजेनुससार तेल घालून डोसा परतवून घेऊ शकता.
दुसरी पद्धत
तव्याला डोसा चिकटू नये यासाठी तुम्ही मीठ आणि नारळाच्या तेलाचा वापर करू शकता. सगळ्यात आधी तवा गरम करून घ्या नंतर तव्यावर पाण्याचे थेंब शिपंडा. नंतर कमी आचेवर मीठ घाला आणि मोठ्या कापडाने तवा पुसून घ्या. हात जळणार नाही याची काळजी घ्या. नारळाचं तेल घालून पुन्हा पुसून घ्या. त्यानंतर डोश्याचं पीठ तव्यावर घाला.
ही चूक करू नका (Avoid These Mistakes While Making Dosa)
डोश्याचं पीठ खूप थंड असेल तर ते तव्याला चिकटतं म्हणून डोसा रूम टेम्परेचरवर असेल असं पाहा. तवा घाणेरडा झाला तरी त्याचं पीठ तव्याला चिकटतं. म्हणून तवा आधी व्यवस्थित स्वच्छ करून घ्या. जर ते पीठ जास्त घट्ट असेल तर डोसा व्यवस्थित बनणार नाही. पीठ पातळ असेल तरच डोसा कुरकुरीत बनेल.