Join us  

महागामोलाच्या लिची पावसाळ्यात खराब होतात, ३ सोप्या ट्रिक्स - लिची भरपूर टिकतील - सडणार नाहीत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2024 2:07 PM

Kitchen hacks : Tips to buy good lychees & keep them fresh for 1 week : वातावरणातील बदलांमुळे लिची लगेच खराब होऊ शकते, असे होऊ नये म्हणून लिची विकत घेताना लक्षात ठेवा ४ गोष्टी...

सध्या बाजारांत सगळीकडेच लालचुटुक लिची विकायला ठेवलेली दिसते. लिची हे फळं आकाराने लहान असले तरी चवीला तितकेच छान लागते. या इवलूशा फळात आरोग्याला आवश्यक असणारे पोषक घटक भरपूर प्रमाणात असतात. लिचीमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते. यासोबतच लिचीमध्ये कार्बोहाईड्रेट, व्हिटॉमिन ए, व्हिटॉमिन सी, पोटॅशियम, कल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फॉरस, आयर्न आणि मिनरल्स असल्याने लिची खाणे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरते. लिचीमध्ये नैसर्गिकरित्या गोडवा असल्याने ते खाल्ल्याने लगेच एनर्जी मिळण्यास मदत होते. लिचीमुळे पोटात थंडावा कायम राखला जातो(Kitchen Tips: How To Keep Litchis Fresh For A Long Time).

बाजारांत विकायला ठेवलेली बाहेरुन लाल, आतून रसाळ (Litchi Store Method) अशी लिची खाण्याचा मोह कुणालाच आवरत नाही. लिची आपण अनेकदा विकत आणून स्टोअर (HOW TO STORE LYCHEE) करुन ठेवतो. परंतु लिची व्यवस्थित स्टोअर करुन ठेवली नाही तर ती लगेच खराब होते. काहीवेळा लिची फ्रिजमध्ये ठेवल्याने सुकून जाते, तर बाहेर ठेवल्याने खराब होते. अशावेळी लिची नेमकी (How to Store Litchi for Long Time) कशी स्टोअर करुन ठेवावी, असा प्रश्न पडतो. लिची दिर्घकाळासाठी रसाळ कशी राहील व ती स्टोअर करण्याच्या सोप्या ट्रिक्स पाहूयात(tips for keeping lychee fresh).

लिची कशी स्टोअर करुन ठेवावी ? 

१. लिची नेहमी देटासह विकली जाते, यामुळे ती खराब होत नाही आणि दीर्घकाळ टिकते. जर तुम्ही घरात जास्त प्रमाणांत लिची आणली असेल तर तिचे देट न मोडता ती देटासहित स्टोअर करुन ठेवावी. लिची धुवून देठ न मोडता उघड्यावर एका मोठ्या हवेशीर भांड्यात स्टोअर करुन ठेवावी. या लिचीवर मध्ये मध्ये  थोडे पाणी शिंपडत रहावे, त्यामुळे लिची लगेच खराब न होता दीर्घकाळासाठी टिकून राहील. 

२. लिचीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने त्यात आर्द्रता असते, म्हणून लिची लवकर खराब होते. लिचीचा स्वतःचा रस देखील असतो त्यामुळे लिचीत एक प्रकारचा ओलावा असतो. जर हा ओलावा जास्त असेल लिची खराब होऊ शकते. लिची कधीही धुवून आहे तशीच ओली फ्रिजमध्ये ठेवू नका. सगळ्यात आधी  लिची धुवा आणि त्यावरचे पाणी पूर्णपणे सुकू द्यावे त्यानंतर ती कागदात गुंडाळून ठेवा.

फणस कापण्याचा व्याप मोठा, हात-सुरी चिकट होते? ३ सोप्या टिप्स- फणस खा- कापा-बरंका..

३. लिची स्टोअर करताना आणखी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे गुच्छातील एक जरी लिची खराब झाली किंवा थोडी जास्त पिकली तर ती काढून टाका. अन्यथा ही पिकलेली किंवा खराब झालेली लिची इतर लिची लवकर खराब करू शकते. जर लिची खूप पिकली असेल तर ती २ ते ३ दिवसात खाऊन संपवावी. उरलेली लिची रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा परंतु इतर फळं आणि भाज्यांपासून वेगळी ठेवा.

४. अनेकवेळा आपण बाजारातून फळे, भाजीपाला विकत आणून तो तसाच प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून फ्रिजमध्ये ठेवतो. त्यामुळे फळे आणि भाज्या लवकर खराब होतात. लिची कधीही प्लॅस्टिकच्या पिशवीत भरुन स्टोअर करु नका. लिची थंड ठिकाणी कागदी किंवा कापडी पिशवीत स्टोअर करुन ठेवा, त्यामुळे लिची अनेक दिवस ताजी राहते. 

कापसाहून मऊ, जाळीदार लोणी डोसा बनवण्याची पारंपरिक रेसिपी, पाहा एकदम सोपी पद्धत-डोसा परफेक्ट...

लिची खरेदी करताना लक्षात ठेवा... 

१. पाऊस पडल्यावरच लिची खावी कारण पावसामुळे लिची अधिक गोड आणि रसाळ झालेली असते.  २. पहिल्या पावसाने लिचीच्या आत असणारे आम्लही कमी झालेले असते. ३. लिची खरेदी करताना नीट तपासा, अनेकवेळा दुकानदार खराब लिची मध्यभागी लपवून विकतात. ४. किंचित लाल किंवा तपकिरी रंगाची लिची चवीला अधिक गोड असते.

टॅग्स :अन्नफळे