Join us  

लालेलाल- रवाळ कलिंगड कसं निवडाल? कलिंगड विकत घेण्यापूर्वी लक्षात ठेवा ३ टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 11:00 AM

Tips to buy sweet watermelon : कलिंगड हे हंगामी फळ, तब्येतीला फायदे अनेक.

उन्हाळ्यात सगळ्यात जास्त खाल्ल्या जाणाऱ्या फळांमध्ये कलिंगडाचा समावेश होतो. कलिंगड हे हंगामी फळ आहे याचे तब्येतीला अनेक फायदे आहे. कलिंगड चविलाही उत्तम असल्यानं सर्वानाच आवडते. बाजारात कलिंगडाचे वेगवेगळे प्रकार उपलब्ध आहेत. शरीरातील रोगांपासून सुटका मिळवण्यासाठी आणि उन्हाच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी टरबूज खायलाच हवे.  (How to Pick a Watermelon at the Store That's Sweet and Ripe)

काही कलिंगड गोड असतात तर काही कमी गोड असतात. पैसे मोजूनही मनासारखं कलिंगड मिळालं  नाही तर मूड खराब होण्याची शक्यता असते. आजकाल केमिकल्स किंवा इन्जेक्शन टाकून फळं पिकवली जातात. कलिंगड विकत घेताना काही गोष्टीं लक्षात ठेवल्या तर काम अधिक सोपं होऊ शकतं. (Three tips to pick out a sweet watermelon)

कलिंगड गोड आहे की नाही कसं ओळखाल

जर कलिंगड विकत घेताना गोड आहे की नाही ते पाहायचे असेल तर हातात धरून त्यावर मारून पाहा. कलिंगडातून येणाऱ्या आवाजाद्वारे तुम्ही ओळखू शकता की कलिंगड कच्चे आहे की पिकलेले आहे.  जर कलिंगडातून टप टप असा आवाज येत असेल तर ते छान पिकलेलं आहे. कलिंगडावर हात मारल्यानंतर जर जोरात आवाज होत असेल तर ते  पिकलेलं असतं आणि आवाज कमी येत असेल तर ते कच्चं असू शकतं.

कलिंगडात  जर जाड हिरव्या लाईन्स असतील आणि मध्ये पातळ हिरव्या लाईन्स असतील तर ते कलिंगड गोड असू शकते. अधिक डार्क रंगाचे कलिंगड गोड असतात. कलिंगडाचे वजन पाहून कलिंगड गोड आहे की नाही ते आपण ओळखू शकता. अनेकदा कलिंगड आकारानं मोठे असतात पण वर उचलल्यानंतर हलके असतात. 

कलिंगडाच्या आकारानुसार वजन जास्त असेल तर ते कलिंगड खरेदी करा असे कलिंगड  गोड असतात.  कलिंगडाच्या वर हलक्या पिवळ्या रंगाची लाईन असते. हे फळ जमिनीवर लागलेले असते. या पिवळ्या भागाचा रंग जितका गडद असेल तितकंच ते गोड असतं. हलका पिवळा किंवा पांढरा रंग असलेलं कलिंगड कच्चं असतं. 

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.अन्न