Lokmat Sakhi >Food > उन्हाळ्यात कडधान्याला चांगले मोड आले तरी आंबूस वास येतो? १ सोपा उपाय, चिकटपणा-वास येणार नाह

उन्हाळ्यात कडधान्याला चांगले मोड आले तरी आंबूस वास येतो? १ सोपा उपाय, चिकटपणा-वास येणार नाह

Tips To Keep Sprout Fresh For Long Time In Summer :उन्हाळ्यात उसळी खाव्यात की नाही असे वाद असतात, पण प्रमाणात उसळ खात असाल आणि त्यांना उत्तम मोड आलेले असतील तर उसळींचा त्रास होणार नाही.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2023 03:37 PM2023-05-19T15:37:26+5:302023-05-19T16:04:37+5:30

Tips To Keep Sprout Fresh For Long Time In Summer :उन्हाळ्यात उसळी खाव्यात की नाही असे वाद असतात, पण प्रमाणात उसळ खात असाल आणि त्यांना उत्तम मोड आलेले असतील तर उसळींचा त्रास होणार नाही.

Tips To Keep Sprout Fresh For Long Time In Summer : In summer, pulses become sticky, do they smell if they get too wet? 2 tips, pulses will remain fresh | उन्हाळ्यात कडधान्याला चांगले मोड आले तरी आंबूस वास येतो? १ सोपा उपाय, चिकटपणा-वास येणार नाह

उन्हाळ्यात कडधान्याला चांगले मोड आले तरी आंबूस वास येतो? १ सोपा उपाय, चिकटपणा-वास येणार नाह

आपला आहार परीपूर्ण असेल तरच आपलं आरोग्य उत्तम राहतं. शरीराचे पोषण झाले तर शरीराच्या सर्व क्रिया सुरळीत राहतात. अन्यथा प्रतिकारशक्तीवर त्याचा परिणाम होतो आणि म्हणूनच आहारात धान्ये, डाळी, भाज्या, पालेभाज्या, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, फळे, कडधान्ये अशा सगळ्या गोष्टींचा योग्य प्रमाणात समावेश करायला हवा असे आपण वारंवार ऐकतो. भारतात विविध रंगांची, आकाराची आणि चवीची ही कडधान्ये मिळतात. ही कडधान्ये आवर्जून आहारात घ्यायला हवीत. कारण हृदयाच्या आरोग्यापासून रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यापर्यंत कडधान्ये पोषक ठरतात. म्हणूनच नैसर्गिकरित्या फॅट-मुक्त आणि प्रोटीनचा उत्तम स्त्रोत असलेली कडधान्ये आहारात असायला हवीत (Tips To Keep Sprout Fresh For Long Time In Summer). 

(Image : Google)
(Image : Google)

उत्तम आरोग्यासाठी आहारात दररोज किमान १ कप कडधान्यांचा समावेश करायला हवा. वजन कमी करण्यासाठी, शरीराला प्रथिने, फायबर, विविध जीवनसत्त्वे मिळावीत यासाठी यांचा चांगला उपयोग होतो. कधी घरातल्या भाज्या संपल्या असतील तरीही कडधान्यांची उसळ हा सोपा आणि उत्तम पर्याय ठरतो. थंडीत कडधान्यांना लवकर मोड येत नाहीत मात्र उन्हाळ्याच्या दिवसांत कडधान्यांना लवकर आणि चांगले मोड येतात. असे असले तरी काही वेळा पाण्यात भिजवलेले कडधान्य चुकून उपसायचे राहिले तर किंवा तापमान जास्त असल्याने या कडधान्यांना कुबट वास येण्याची शक्यता असते. काही वेळा ही कडधान्ये चिकटही होतात. अशावेळी एकतर ती फेकून द्यावी लागतात किंवा उसळ केल्यास त्यालाही त्याचा वास लागतो. असे होऊ नये म्हणून काही गोष्टींची आवर्जून काळजी घ्यायला हवी. या गोष्टी कोणत्या ते पाहूया...

१. कडधान्ये भिजवण्यापूर्वीच त्याला वास येत नाही ना हे तपासून पाहावे. कारण कडधान्य मूळात खराब असेल तर ते भिजवल्यानंतर आणखी खराब होऊ शकते. त्यामुळे त्याला एकप्रकारचा चिकटपणा आणि वास येण्याची शक्यता असते. 

२. सालांमुळे कडधान्ये लवकर खराब होतात, त्यामुळे कडधान्यांची साले काढल्यास ती जास्त काळ टिकण्यास मदत होते. यासाठी एका बाऊलमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये कडधान्य भिजवावे. यामुळे साले निघून जाण्यास मदत होते. 

(Image : Google)
(Image : Google)

३. कडधान्ये चांगली भिजावीत आणि त्याला योग्य पद्धतीने मोड यावेत यासाठी फक्त २ गोष्टींची आवश्यकता असते त्या म्हणजे टिश्यू पेपर आणि प्लास्टीकची बरणी. 

४. यासाठी एक प्लास्टीकची बरणी स्वच्छ करुन घ्यायची आणि त्यामध्ये टिश्यू पेपर घालायचा. यामध्ये पाण्यात भिजवलेली कडधान्ये व्यवस्थित निथळून घालायची. म्हणजे त्यामध्ये राहीलेला पाण्याचा अंश टिश्यू पेपरमध्ये शोषला जातो. 

५. बरणीचे झाकण लावले की यामध्ये असणाऱ्या दमटपणामुळे या कडधान्याला चांगले मोड येण्यास मदत होते. कडधान्याला जितके छान मोड येतील तितकी ती पचायला हलकी होतात. अशी मोड आलेली कडधान्ये आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात. 

 

Web Title: Tips To Keep Sprout Fresh For Long Time In Summer : In summer, pulses become sticky, do they smell if they get too wet? 2 tips, pulses will remain fresh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.