Lokmat Sakhi >Food > हॉटेलसारखा कुरकुरीत डोसा घरी बनत नाही? ७ खास ट्रिक्स, तव्याला न चिकटता परफेक्ट बनेल डोसा

हॉटेलसारखा कुरकुरीत डोसा घरी बनत नाही? ७ खास ट्रिक्स, तव्याला न चिकटता परफेक्ट बनेल डोसा

Tips to make Perfect Dosa At Home : रेस्टाँरंटस्टाईल परफेक्ट डोसा बनवण्याच्या ट्रिक्स पाहूया.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2023 04:19 PM2023-11-02T16:19:21+5:302023-11-03T01:05:11+5:30

Tips to make Perfect Dosa At Home : रेस्टाँरंटस्टाईल परफेक्ट डोसा बनवण्याच्या ट्रिक्स पाहूया.

Tips to make Perfect Dosa : At Home Smart tips to make that perfect dosa for beginners | हॉटेलसारखा कुरकुरीत डोसा घरी बनत नाही? ७ खास ट्रिक्स, तव्याला न चिकटता परफेक्ट बनेल डोसा

हॉटेलसारखा कुरकुरीत डोसा घरी बनत नाही? ७ खास ट्रिक्स, तव्याला न चिकटता परफेक्ट बनेल डोसा

नाश्त्यासाठी खाल्ला जाणारा डोसा घरी बनवला तर रेस्टारंटसारखा कुरकुरीतहोत नाही अशी तक्रार अनेकांची असते.  डोसा खायला प्रत्येकालाच आवडते. डोसा ही एक साऊथ इडीयन पदार्थांची रेसिपी आहे. दक्षिण भारतातील घराघरांत नाश्त्याला किवा दुपारच्या जेवणाला डोसा खाल्ला जातो. (Dosa kasa banvaycha) एक- दोन प्रकारचे नाही तर अनेक प्रकारचा डोसा बनवला जातो. (Cooking Tips)

विकतसारखा म्हणजेच हॉटेलमध्ये मिळतो तसा कुरकुरीत, खमंग डोसा घरी बनवणं सर्वांनाच जमतं असं नाही. (Smart tips to make that perfect dosa for beginners) डोश्याचे बॅटर तयार करताना काही गडबड झाली किंवा डोसा बॅटर तयार करण्याची पद्धत चुकली तर डोसा बिघडण्याची शक्यता असते. रेस्टाँरंटस्टाईल परफेक्ट डोसा बनवण्याच्या ट्रिक्स पाहूया. (How to make perfect dosa at home)

परफेक्ट डोसा बनवण्यासाठी लागणारं साहित्य (Dosa Making Tips)

१) बारीक उडीदाची डाळ- एक वाटी 

२) तांदूळ- ३ कप

३) हरभरा डाळ- अर्धा कप

४) मेथी - २ टिस्पून

५) चवीनुसार मीठ

६) २  तासांसाठी यीस्ट भिजवून ठेवा. 

घरी बनवलेला डोसा बिघडू नये यासाठी टिप्स (How to make Hotel Style Perfect Dosa)

१) डोश्याचे पीठ परफेक्ट होण्यासाठी आणि चव मेंटेन ठेवण्याासठी वर दिलेल्या प्रमाणात तांदूळ, डाळी आणि मेथीचा वापर करा.  जर डाळ तांदळाचे प्रमाण चुकले तर इडली किंवा डोश्याचे पीठ व्यवस्थित फुलणार नाही.

२) डोश्याच्या बॅटरमध्ये चणा डाळ मिसळ्याने रंग खूप चांगला येतो. याशिवाय चवही चांगली येते.  जर तुम्हाला चणा डाळ खाणं आवडत नसेल तर तुम्ही बॅटरमध्ये चणा डाळ मिसळणं टाळू शकता. 

थंडीच्या दिवसाही दुप्पट फुलेल इडलीचं पीठ; तांदूळ वाटताना हा पदार्थ मिसळा, मऊ होतील इडल्या

३) चणा डाळ, उडीद डाळ आणि तांदूळ हे तिन्ही पदार्थ एकत्र न दळता वेगवेगळे दळा. डोश्याचं बॅटर बनवण्यासाठी डाळ व्यवस्थित वाटून घ्या आणि तांदूळ जाडसर दळा. या मिश्रणात उडीदाच्या डाळीचे प्रमाण जास्त असू नये. 

चकली ना कडक होणार ना वातड; भाजणी करताना लक्षात ठेवा ७ टिप्स-कुरकुरीत बनेल चकली

४) बॅटर सॉफ्ट बनवण्याासठी त्यात चुटकीभर  इनो मिसळा आणि एक छोटा चमचा मेथीच्या दाण्यांचा वापर करा.

५) बॅटर परफेक्ट बनवण्यासाठी सर्व साहित्य मिक्स करून बॅटर ५ मिनिटांसाटी एकाच दिशेने गोल फरवत फेटून घ्या. 

६) डोसा बटर १० तासांसाठी आंबवण्यासाठी ठेवा जेणेकरून पीठ चांगले फुलून येईल आणि डोसा तव्यावर सहज घालता येईल.

७) डोसा तुटू नये  यासाठी नॉन स्टिक पॅनचा वापर करा. पॅनला आधी व्यव्सथित तेल लावून किंवा त्यावर पाणी शिंपडून मग डोसा  घाला. असं होऊ शकतं की पहिला डोसा तुटेल आणि त्या नंतरचे सगळे डोसे चांगले बनतील. 
 

Web Title: Tips to make Perfect Dosa : At Home Smart tips to make that perfect dosa for beginners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.