Lokmat Sakhi >Food > म्हशीचं की गायीचं? कोणत्या दुधाचं दही चांगलं लागतं? विकतसारखं घट्ट दही हवं तर..

म्हशीचं की गायीचं? कोणत्या दुधाचं दही चांगलं लागतं? विकतसारखं घट्ट दही हवं तर..

Tips to Make Thick Curd from Toned Milk : विकतसारखे दही लावा घरीच; फक्त दही लावताना काही गोष्टी लक्षात ठेवा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2024 02:09 PM2024-04-15T14:09:58+5:302024-04-15T14:40:10+5:30

Tips to Make Thick Curd from Toned Milk : विकतसारखे दही लावा घरीच; फक्त दही लावताना काही गोष्टी लक्षात ठेवा..

Tips to Make Thick Curd from Toned Milk | म्हशीचं की गायीचं? कोणत्या दुधाचं दही चांगलं लागतं? विकतसारखं घट्ट दही हवं तर..

म्हशीचं की गायीचं? कोणत्या दुधाचं दही चांगलं लागतं? विकतसारखं घट्ट दही हवं तर..

उन्हाळ्यात दही खाण्याचे अनेक फायदे आहेत. दही आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते (Curd Making). यामुळे रोजच्या जेवणात दह्याचा समावेश करायला हवा (Cooking Tips). त्यात अनेक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सचे गुणधर्म असतात. ज्यामुळे आपल्या शरीरातील पोषक तत्वांची कमतरता भरून निघते (Kitchen Tips). काही जण दही घरीच तयार करतात. तर काही जण विकतचे दही खातात.

अनेकांना घरात दही लावता येत नाही. बऱ्याचदा दही लावल्यानंतर दह्यातून पाणी सुटते. किंवा घट्टपणा येत नाही. त्यामुळे आपण बऱ्याचदा विकतचे दही आणून खातो. पण विकतचे दही आणण्यापेक्षा घरीच दही लावणे योग्य. पण दही लावण्यासाठी कोणत्या दुधाचा वापर करावा? दही लावण्याची योग्य पद्धत कोणती? दही लावताना कोणत्या भांड्याचा वापर करावा? पाहूयात(Tips to Make Thick Curd from Toned Milk).

दही लावण्यासाठी कोणत्या दुधाचा वापर करावा?

थ्रेडिंग-वॅक्सिंगचा त्रास कशाला? दुधात मिसळा '४' गोष्टी; अनावश्यक केस होतील गायब-चेहरा चमकेल

सर्वप्रथम, एका भांड्यात एक कप पाणी गरम करण्यासाठी ठेवा. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात एक कप फुल फॅट म्हशीचे दूध घाला. गॅस मध्यम आचेवर ठेवा. १० मिनिटानंतर गॅस लो फ्लेमवर ठेवा. दुधाला उकळी फुटल्यानंतर त्यात गॅस बंद करा, व दुधाचं भांडं एका बाजूला थंड करण्यासाठी ठेवा.

फक्त ३० मिनिटात डाळी भिजवून करा क्रिस्पी मेदूवडे; दाक्षिणात्य चवीचे मेदूवडे हवेत तर..

दूध कोमट झाल्यानंतर एका भांड्यात दोन चमचे दही घालून फेटून घ्या. दह्याला क्रिमी टेक्स्चर आल्यानंतर त्यात दूध घाला. त्यावर ३ तासांसाठी प्लेट ठेवा. ३ तास रूम टेम्प्रेचर आणि २ तास फ्रिजमध्ये दही सेट करण्यासाठी ठेवा. ५ तासानंतर आपण पाहू शकता, दह्याला छान घट्टपणा आला असेल. पाणी न सुटता दही तयार होईल. जर ५ तासानंतरही दही तयार झालं नसेल तर, दही आणखीन २ तासांसाठी फ्रिजमध्ये सेट करण्यासाठी ठेवा. सुरीने कापता येईल असे घट्ट दही तयार होईल, शिवाय चवीलाही गोड लागेल.

Web Title: Tips to Make Thick Curd from Toned Milk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.