Join us  

भाजी करपली, कढईत खाली लागली तर काय करायचं? बर्फाची जादू करा, भाजी होईल चविष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2023 5:34 PM

Tips to prevent food from sticking at the bottom of the pan भाजी करपली, खाली लागली तर वासही येतो तसे होऊ नये म्हणून हा उपाय.

'आज काय बनवतेस'? या प्रश्नाचं उत्तर शोधताना महिलांची तारांबळ उडते.  घरातली बाईच अनेकदा स्वयंपाक करते तेव्हा घरातले अन्य सदस्य फर्माईश करत असतात. त्यात घाई, रोजचे डबे यामुळे कधीतरी स्वयंपाक करताना पदार्थ करपतो, भाजी पातेल्यात खाली लागते. करपल्याने वासही येऊ लागतो.

भाजी जर अशी करपली, खाली लागली तर र्फाच्या २ तुकड्यांचा वापर करा. आता तुम्ही म्हणाल बर्फाच्या तुकड्याच्या वापराने तळाशी चिकटलेली भाजी कशी निघेल? तेच पाहूया(Tips to prevent food from sticking at the bottom of the pan).

पावसाळ्यात नळाला गढूळ पाणी येते? अस्वच्छ पाण्याने आंघोळ करू नका, ४ उपाय - पाणी होईल स्वच्छ

पाहा ट्रिक

जेव्हा भाजी कढईत किंवा इतर भांड्याच्या तळाशी चिकटते, तेव्हा भाजी करपण्याची शक्यता जास्त वाढते. भांडं जुनं असो किंवा नवीन, भाजी खाली लागते.  अशावेळी भाजी लागू नये म्हणून त्यात बर्फाचे दोन तुकडे घाला. बर्फाचे तुकडे घातल्यानंतर बर्फ वितळेपर्यंत भाजीत मिक्स करा. यामुळे काही सेकंदात तळाशी चिकटलेली भाजी निघेल आणि पुन्हा खाली लागणार नाही.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्ससोशल मीडियासोशल व्हायरल