पास्ता, नूडल्स हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीचे पदार्थ. हॉटेलमध्ये गेल्यावरही लहान मुलांकडून ज्या काही पदार्थांची ऑर्डर येत असते, त्यात हे दोन पदार्थ हमखास असतातच. हे पदार्थ बाहेरून मागवले तर त्यासाठी भरपूर किंमत मोजावी लागते. त्यामुळे मग अनेक जणी हे पदार्थ घरीच तयार करतात. पण पास्ता किंवा नूडल्स घरी तयार केले तर ते विकतसारखे मोकळे किंवा सुटसुटीत होत नाही. एकमेकांना चिटकून बसतात. त्यासाठीच तर सेलिब्रिटी शेफ संजीव कपूर यांनी या काही खास टिप्स (Tips to prevent your pasta or noodles from sticking.) सांगितल्या आहेत.
पास्ता किंवा नूडल्स नॉनस्टिकी होण्यासाठी...१. पास्ता किंवा नूडल्स अगदी हॉटेलप्रमाणे मोकळ्या, सुटसुटीत आणि चमकदार होण्यासाठी या काही टिप्स आणि ट्रिक्स वापरून बघा.
पीसीओडी आणि पीसीओएसचा त्रास? ५ पथ्य पाळा, वाचा आहारतज्ज्ञांचा खास सल्ला
२. बऱ्याच जणी पाणी पातेल्यात किंवा कढईमध्ये तापायला ठेवले की लगेचच त्यात नूडल्स किंवा पास्ता टाकतात. असं करू नका. पाण्याचं तापमान वाढेपर्यंत आणि त्याला उकळी येण्यास सुरुवात होईपर्यंत त्यात नूडल्स किंवा पास्त टाकू नये.
३. पाण्याला उकळी यायला सुरुवात झाली आहे, असे दिसल्यानंतर त्यात थोडेसे मीठ, थोडेसे तेल टाकावे, असा खास सल्ला संजीव कपूर यांनी दिला आहे. मीठ आणि तेलामुळे नूडल्स किंवा पास्त एकमेकांपासून सुटे होतील आणि चिकटणार नाहीत.
४. याशिवाय लिंबाचा वापरही करता येतो. मीठ, तेल टाकल्यानंतर उकळत्या तेलात अर्धे लिंबू पिळा. त्यामुळेही पास्ता- नूडल्स चिकट होणार नाहीत.
५. या टिप्स तुम्ही पुलाव, मसालेभात, बिर्याणीकरिता तांदूळ शिजवून घेतानाही वापरू शकता. तांदूळ अतिशय मोकळा आणि सुटसुटीत होईल.