Join us  

भजी फार तेलकट होतात? ४ उपाय - भजी तेल पिणार नाहीत - होतील खमंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2023 5:57 PM

Tips to Reduce Oil Absorption While Deep Frying भजी - वडे जास्त तेल पितात? ४ सोप्या टिप्स, कमी तेलाचे कुरकुरीत भजी होतील रेडी..

स्नॅक्स म्हटलं की अनेकांना भजी हा पदार्थ आठवतो. भजी हा पदार्थ सगळ्यांना आवडतो. भजीचे देखील विविध प्रकार आहेत. कोणाला कांदा, बटाटा, तर कोणाला पालक, पनीरची भजी खायला प्रचंड आवडते. भजी खायला काळवेळ लागत नाही. उन्हाळा असो किंवा पावसाळा. गरमा - गरम भजी प्रत्येक जण चवीने खातो. भजी करण्यासाठी बेसन, तेल व मसाला आवश्यक आहे.

काही लोकं भजी खाण्यास टाळाटाळ करतात. कारण भजी हा पदार्थ तेलात तळून तयार होतो. ज्यामुळे कॅलरीज वाढण्याची शक्यता निर्माण होते. भजी खायची इच्छा आहे पण, तेलामुळे भजी खाण्यास नकार देत असाल तर असे करू नका. भजी कमी तेल शोषून घेण्यासाठी या काही ट्रिक्सचा वापर करा. ज्यामुळे भजी कमी तेल शोषून घेतील(Tips to Reduce Oil Absorption While Deep Frying).

बेसनाचे करा असे बॅटर

कमी तेल पिणारे भजी करण्यासाठी, बेसनाच्या बॅटरमध्ये योग्य प्रमाणात साहित्यांचा वापर करणे आवश्यक आहे. यासाठी एका बाऊलमध्ये बेसन व मसाले मिक्स करा. त्यानंतर त्यात थोडे - थोडे पाणी घालून मिक्स करा. बॅटर जास्त पातळ किवा जाडसर नसावे. आता त्यात भाजी डीप करून पाहावे, त्याला बॅटर कोट होत आहे की नाही हे चेक करा. त्यानंतर त्यात ३ ते ४ थेंब तेलाचे मिक्स करा. या ट्रिकमुळे भजी जास्त तेल अब्जॉर्ब करणार नाही.

‘बिन साखरेचे’ गोड आणि पौष्टिक लाडू खाल्ले आहेत कधी? खा भरपूर, गोड खाण्याचा गिल्ट विसरा

जाड तळ असणाऱ्या भांड्यात तळा भजी

भजी जास्त तेल पिण्याचे कारण कदाचित आपले भांडं देखील असू शकते. भजी तळण्यासाठी जाड तळाच्या भांड्याचा वापर करा. यामुळे तेलाचे तापमान स्थिर राहते, व भजी जास्त तेल अब्जॉर्ब करणार नाही.

तळण्यासाठी तेलाचे प्रमाण ठेवा योग्य

भजी कुरकुरीत व्हावी यासाठी लोकं कढईत जास्त तेल घालतात. तेल योग्यरित्या गरम झालं नसेल तर, भजी तेल जास्त शोषून घेतात. भजी तळताना तेल लवकर संपते. तेल कमी झाल्यानंतर भजी एकमेकांना चिकटतात. ज्यामुळे भजी अधिक तेल शोषून घेतात. त्यामुळे भजी तळताना तेल जास्त घाला, व नीट गरम करा.

उन्हाळ्यात दूध लवकर नासू नये म्हणून ३ सोप्या-भन्नाट ट्रिक, दूध नासण्याची काळजी नाही

 भजी नॅपकीनवर ठेवा

भजी पॅनमधून बाहेर काढल्यानंतर नॅपकीनवर ठेवा. ज्यामुळे भजीतील अतिरिक्त तेल निघून जाईल. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स