Lokmat Sakhi >Food > हिवाळ्यात भरपूर पालेभाज्या विकत आणल्या, पण लवकर सडतात? ५ उपाय - भाज्या खा मनसोक्त...

हिवाळ्यात भरपूर पालेभाज्या विकत आणल्या, पण लवकर सडतात? ५ उपाय - भाज्या खा मनसोक्त...

How To Store Green Vegetables For Long Time During Winters Know Easy Tips : How to Store Vegetables to Keep them Fresh : Tips to store green leafy vegetables in winter season : थंडीच्या दिवसांत पालेभाज्या ठेवा फ्रेश...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2024 07:04 PM2024-12-06T19:04:15+5:302024-12-06T19:05:17+5:30

How To Store Green Vegetables For Long Time During Winters Know Easy Tips : How to Store Vegetables to Keep them Fresh : Tips to store green leafy vegetables in winter season : थंडीच्या दिवसांत पालेभाज्या ठेवा फ्रेश...

Tips to store green leafy vegetables in winter season How To Store Green Vegetables For Long Time During Winters Know Easy Tips | हिवाळ्यात भरपूर पालेभाज्या विकत आणल्या, पण लवकर सडतात? ५ उपाय - भाज्या खा मनसोक्त...

हिवाळ्यात भरपूर पालेभाज्या विकत आणल्या, पण लवकर सडतात? ५ उपाय - भाज्या खा मनसोक्त...

हिवाळ्यात बाजारांमध्ये हिरव्या पालेभाज्या अगदी फ्रेश, ताज्या आणि हिरव्यागार विकायला येतात. वर्षभरातील इतर ऋतूंच्या तुलनेत हिवाळ्यात (Tips to store green leafy vegetables in winter season) स्वस्त आणि मस्त हिरव्या पालेभाज्या मिळतात. संपूर्ण बाजारपेठ अशा हिरव्या पालेभाज्यांनी बहरते. या दिवसात बरेच जण मेथी, पालक, शेपू, लालमाठ आणि कोथिंबीर अशा अनेक प्रकारच्या पालेभाज्या एकदाच विकत ( How to Store Vegetables to Keep them Fresh) त्या निवडून फ्रिजमध्ये स्टोअर करुन ठेवतात. बाजारांत डोळ्यांसमोर दिसणाऱ्या त्या हिरव्यागार पालेभाज्या पाहून एकाचवेळी अनेक जुड्या घेण्याचा मोह आवरता येत नाही. अशा एकदम एकाचवेळी पालेभाज्या आणून त्या स्टोअर करुन ठेवल्या की, काही दिवसांतच त्या पटकन वापरुन संपवाव्या लागतात(How To Store Green Vegetables For Long Time During Winters Know Easy Tips).

जर या पालेभाज्या वेळीच वापरुन संपवल्या नाहीत तर ठराविक काळानंतर त्यांची पान पिवळी पडून, कुजू लागतात. अशा पिवळ्या पडलेल्या पालेभाज्यांच्या पानांची भाजी केली तर ती खायला चांगली लागत नाही. तसेच अशी पिवळी पडलेली पालेभाजी आपण शक्यतो वापरणे टाळतो किंवा सरळ फेकून देतो. यामुळे एवढ्या महागामोलाच्या पालेभाज्या फेकून दिल्या तर त्या वायाच जातात. यासाठी हिवाळ्यात आणलेल्या फ्रेश  पालेभाज्या दीर्घकाळासाठी फ्रिजमध्ये स्टोअर करायच्या असतील तर या काही खास टिप्स उपयोगात येतील.

हिवाळ्यात फ्रेश - हिरव्यागार विकत आणलेल्या पालेभाज्या अशा करा स्टोअर... 

१. कॉटनच्या कपड्याचा वापर :- जेव्हा तुम्ही हिरव्या पालेभाज्या बाजारांतून विकत आणता तेव्हा त्यावर पाणी शिंपडल्याने त्या हलक्या ओल्या असतात. अशा परिस्थितीत, या ओल्या असलेल्या भाज्यांची जुडी मोकळी करुन त्या संपूर्णपणे सुकवून घ्याव्यात. त्या संपूर्णपणे कोरड्या झाल्यानंतर त्यांना कॉटनच्या  कापडात गुंडाळा आणि रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. असे केल्याने पालेभाज्या न कुजता दीर्घकाळ चांगल्या टिकतील. एवढंच नाही तर या पालेभाज्यांची पान देखील  कुजणार नाही आणि पाने लवकर पिवळी पडणार नाहीत.

स्वयंपाकात कोथिंबीर तर हवीच, पण वापरता कमी आणि फेकताच तुम्ही जास्त! पाहा ‘हा’ योग्य वापर...

२. एअर टाईट कंटेनर वापरा :- हिवाळ्यात पालेभाज्या आठवडाभरापेक्षा जास्त दिवस चांगल्या स्टोअर करुन ठेवण्यासाठी आपण एअर टाईट कंटेनरचा वापर करु शकता. हिरव्या पालेभाज्या स्वच्छ केल्यानंतर, कोणत्याही एअर टाईट कंटेनरमध्ये ठेवा त्यानंतर कंटेनर फ्रिजमध्ये ठेवा. या पद्धतीने पालेभाज्या स्टोअर केल्यानंतर त्या लवकर खराब होत नाहीत.

३. देठ काढून स्टोअर करा :- हिरव्या पालेभाज्या लवकर खराब होऊ नयेत यासाठी त्यांचे देठ तोडून त्यांची पाने स्टोअर करुन ठेवावीत. त्यामुळे त्यांची पाने लवकर पिवळी पडत नाहीत. तसेच, यामुळे पालेभाज्या ४ ते ५ दिवस अजिबात खराब न होता चांगल्या टिकून राहतील. 

भारती सिंग लेकासाठी करते थंडीत खास पौष्टिक लाडू, पाहा तिनं सांगितलेली खास रेसिपी...

४. ब्लँचिंगची मदत घ्या :- हिरव्या पालेभाज्या स्टोअर करुन ठेवण्यासाठी तुम्ही ब्लँचिंगचीही मदत घेऊ शकता. यासाठी सगळ्यात आधी हिरव्या पालेभाज्यांची पाने गरम पाण्यात उकळा. यानंतर त्यांना थंड पाण्यात टाका. कोरडे झाल्यानंतर, त्यांना रेफ्रिजरेटरमध्ये स्टोअर करुन ठेवा. अशा पद्धतीने भाजीपाला लगेच खराब न होता बरेच दिवस चांगला टिकून राहील. 

५. ज्यूटच्या पिशवीत ठेवा :- हिरव्या पालेभाज्या जास्त दिवस स्टोअर करून ठेवायच्या असतील तर प्लॅस्टिक ऐवजी ज्यूटच्या पिशव्यांचा वापर करावा. या ज्यूटच्या पिशव्यांचा वापर करुन तुम्ही हिरव्या पालेभाज्या दीर्घकाळ स्टोअर करुन ठेवू शकता. यासाठी पालेभाज्या ज्यूटच्या पिशवीत भरुन रेफ्रिजरेटरमध्ये स्टोअर करुन ठेवाव्यात.

Web Title: Tips to store green leafy vegetables in winter season How To Store Green Vegetables For Long Time During Winters Know Easy Tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.