Lokmat Sakhi >Food > माठातले पाणी लवकर भरपूर आणि जास्त वेळ गार होण्यासाठी १ सोपी ट्रिक, प्या पाणी गारेगार...

माठातले पाणी लवकर भरपूर आणि जास्त वेळ गार होण्यासाठी १ सोपी ट्रिक, प्या पाणी गारेगार...

Tips & Tricks How To Do Chilled Water In Pitcher Like Fridge : माठातील पाणी गार असते परंतु उन्हाळ्याच्या दिवसांत माठातील पाणी अजून गार करण्याची एक सोपी ट्रिक लक्षात ठेवू.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2023 12:25 PM2023-04-06T12:25:22+5:302023-04-06T12:39:04+5:30

Tips & Tricks How To Do Chilled Water In Pitcher Like Fridge : माठातील पाणी गार असते परंतु उन्हाळ्याच्या दिवसांत माठातील पाणी अजून गार करण्याची एक सोपी ट्रिक लक्षात ठेवू.

Tips & Tricks How To Do Chilled Water In Pitcher Like Fridge | माठातले पाणी लवकर भरपूर आणि जास्त वेळ गार होण्यासाठी १ सोपी ट्रिक, प्या पाणी गारेगार...

माठातले पाणी लवकर भरपूर आणि जास्त वेळ गार होण्यासाठी १ सोपी ट्रिक, प्या पाणी गारेगार...

उन्हाळा म्हटलं की वाढत्या तापमानाने आपल्या जीवाची काहिली होते. वाढती उष्णता, गरमी यामुळे आपल्याला उन्हाळ्यात सतत तहान लागते. उन्हाळ्यात ही तहान भागवण्यासाठी आपण पाणी, ताक, फळांचे रस, सरबत असे अनेक द्रव पदार्थ पित असतो. बऱ्याचदा उन्हांतून फिरुन आल्यानंतर आपल्याला भरपूर तहान लागते अशावेळी आपण फ्रिजमधील किंवा मातीच्या माठातील गार पाणी पिणे पसंत करतो. परंतु फ्रिजमधील गार पाणी प्यायल्यामुळे आपल्याला सर्दी, खोकला, घसा बसणे असे अनेक आजार होऊ शकतात. फ्रिजमधील गार पाणी पिण्याचे अनेक दुष्परिणाम आहेत. फ्रिजमधील गार पाणी पिण्यापेक्षा माठातील गार पाणी पिणे केव्हाही उत्तम ठरते. 

कितीही जग पुढे गेले असले तरीही काही गोष्टी या 'जुनं ते सोनं' असं म्हणून आपण त्याचा वापर करतच असतो, त्यातील एक गोष्ट म्हणजे 'मातीचा माठ'. उन्हाळ्याच्या दिवसांत माठातलं पाणी प्यायल्याने जी मनःशांती होते ती फ्रिजमधले पाणी प्यायल्याने होते नाही. आपल्या पूर्वजांनी मातीच महत्व जाणलं होत म्हणूनच त्यांनी माठाची निर्मिती केली होती. अजूनही बऱ्याचशा घरात पाणी पिण्यासाठी माठाचा वापर केला जातो. जेव्हा आपण फ्रिजमधील पाणी पितो तेव्हा तहान भागते, पण ती तात्पुरती असते. जर आपण माठातील पाणी प्यायलो, तर मातीचा हलकासा सुगंध आणि माठातील नैसर्गिक गार पाणी याने तहान नक्कीच भागते. मातीच्या माठातील पाणी गार असते परंतु उन्हाळ्याच्या दिवसांत माठातील पाणी अजून गार करण्याची एक सोपी ट्रिक लक्षात ठेवू(Tips & Tricks How To Do Chilled Water In Pitcher Like Fridge). 

नक्की काय करता येऊ शकते? 

१. सर्वप्रथम, संपूर्णपणे मातीपासून बनलेला एक मातीचा माठ घ्यावा, तो स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावा. आपण विकत आणलेला मातीचा माठ हा खरंच मातीचा आहे की नाही हे तपासून पाहण्यासाठी माठ चमच्याने वाजवून पाहावा. 

२. आता आपण ज्या स्टँडवर मातीचा माठ ठेवतो त्या स्टँडवर मातीचा माठ ठेवण्याआधी मातीची छोटीशी कुंडी ठेवावी. ही कुंडी मातीने भरलेली असावी. मातीने भरलेली कुंडी ठेवल्यानंतर माती भिजून ओली होईल इतके पाणी त्यात घालावे. त्यानंतर या कुंडीवर आपला पाण्याने भरलेला मातीचा माठ अलगद ठेवून द्यावा. 

३. त्यानंतर एक कॉटनचा टॉवेल किंवा सुती कापड घेऊन ते संपूर्णपणे पाण्याने भिजवून घ्यावे. हे भिजवून घेतलेले कापड माठाच्या बाहेरील बाजूने माठाला  संपूर्णपणे गुंडाळून घ्यावे. यामुळे माठातील पाणी जास्त काळासाठी थंडगार राहते. 

कच्च्या कैरीची आईस कँडी आता सहज करा घरच्याघरी, शेफ तारला दलाल रेसिपी...

मातीच्या माठातील पाणी जास्त काळासाठी थंडगार कसे राहाते ?

मातीच्या माठातील पाणी थंड होणं बाष्पीभवनच्या क्रियेवर अवलंबून असते. जेवढे जास्त बाष्पीभवन होत पाणी तेवढेच थंड होत. धातूच्या भांड्यांच्या तुलनेत बाष्पीभवन प्रक्रिया मातीच्या भांड्यात लवकर होते कारण मातीच्या भांड्यात लहान छिद्र असतात जे आपण डोळ्यांनी बघू शकत नाही. माठात पाणी या छिद्रांमधून माठाच्या पृष्ठभागावर येत आणि बाहेरील उष्णतेमुळे बाष्पीभवन प्रक्रिया होते, या प्रक्रियेत माठाच्या आतील भागाचं तापमान कमी होत. बाष्पीभवनची ही प्रक्रिया उन्हाळ्यातच चांगल्या प्रकाराची होते. हेच कारण आहे की उन्हाळ्यात धातूच्या भांड्यांच्या तुलनेत मातीच्या माठात पाणी थंड राहतं.  

मातीच्या माठातील पाणी पिण्याचे फायदे :- 

१. चयापचय क्रिया सुधारते. 

२. रोगप्रतिकार शक्ती वाढते. 

३. खोकला किंवा सर्दी असलेल्या व्यक्तींनी देखील माठातील पाणी प्यायल्याने त्यांना कोणत्याही प्रकारचे अपाय होत नाहीत. 

४.  उष्माघात रोखण्यास मदत होते. 

५. आरोग्यासाठी व त्वचेसाठी मातीच्या माठातील पाणी पिणे उत्तम असते.

Web Title: Tips & Tricks How To Do Chilled Water In Pitcher Like Fridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.