आपल्या सगळ्यांच्या घरात रोज दूध आणले जाते. दूध हे नाशवंत पदार्थांपैकी एक आहे. दूध जर योग्य पद्धतीने गरम केले नाही किंवा फ्रिजमध्ये व्यवस्थित स्टोअर करुन ठेवले नाही तर ते लगेच खराब होते. दूध खराब होण्याच्या समस्येला आपल्यापैकी अनेकजण अगदी रोज सामोरे जात असतील. बरेचदा आपण दूध व्यवस्थित स्टोअर करून ठेवले तरीही ते खराब होते. दूध फाटल्यानंतर असे दूध आपण शक्यतो न वापरता लगेच फेकून देतो. अशाप्रकारे दूध जर वारंवार खराब झाले तर दुधाची नासाडी होते असे दूध रोज फेकून द्यावे लागते(How to prevent Milk from Spoilage).
दूध रोज फेकून दिल्याने पैसेही वाया जातात. अशा परिस्थितीत, दूध खराब होऊ नये म्हणून तसेच ते दीर्घकाळ चांगले टिकून त्याची शेल्फ लाईफ वाढावी यासाठी एका खास ट्रिकचा वापर करु शकता. मास्टर शेफ पंकज भदौरिया यांनी आपल्या इन्स्टाग्राम पेजवरून एक व्हिडीओ शेअर करत दूध दीर्घकाळ चांगले टिकून राहावे, तसेच ते लगेच खराब होऊ नये म्हणून एक सोपी ट्रिक फॉलो करण्यास सांगितली आहे. ही ट्रिक नेमकी कोणती आहे ते पाहूयात. ( Kitchen Hacks : 1 Simple Ways to Prevent Milk from Spoilage).
दूध लगेच खराब होऊ नये म्हणून काय करावे ?
कित्येकदा आपण खूप काळजीपूर्वक दूध व्यवस्थित स्टोअर करून ठेवतो. इतकी काळजी घेऊनही काहीवेळा दूध खराब होते. अशावेळी दूध खराब न होता दीर्घकाळ चांगले टिकून राहावे यासाठी मास्टर शेफ पंकज भदौरिया दूध गरम करताना त्यात चिमूटभर बेकिंग सोडा (Baking Soda) मिक्स करण्याचा उपाय सांगत आहेत. दुधात बेकिंग सोडा मिसळल्याने दूध खराब तर होत नाहीच याशिवाय दुधाचा स्वाद अधिक वाढण्यास मदत मिळते. तसेच दुधातील या बेकिंग सोड्यामुळे दुधावर छान अशी मस्त घट्टसर साय येते. या एका सोप्या ट्रिकमुळे दूध खराब न होता दीर्घकाळ व्यवस्थित स्टोअर करून ठेवू शकतो.
आंबटगोड चिंच टिकेल वर्षभर, पाहा पारंपरिक पद्धत - चिंच पावसाळ्यातही खराब होणार नाही...
दुधात बेकिंग सोडा मिसळल्याने नेमके काय होते ?
दुधामध्ये हलकेसे अॅसिडिक पीएच असते. दुधामध्ये असणारे बॅक्टेरिया लॅक्टिक अॅसिड तयार करुन दुधाचे दह्यात रूपांतर करतात, जे की अधिक आम्लीय आणि अॅसिडिक असते. जेव्हा आपण दूध खराब होऊ नये म्हणून त्यात चिमूटभर बेकिंग सोडा घालतो तेव्हा बेकिंग सोड्यात असणारे क्षारीय गुणधर्म बॅक्टेरिया कडून तयार केलें जाणारे लॅक्टिक अॅसिड तयार करण्याची प्रकिया थांबवतात. यामुळे दूध थोडे क्षारीय होऊन त्याची पीएच लेव्हल देखील वाढते, यामुळेच दुधात बेकिंग सोडा घातल्याने त्याचे लगेच दह्यात रूपांतर होत नाही किंवा ते लगेच खराब न होता दीर्घकाळ चांगले टिकून राहते.