Lokmat Sakhi >Food > भाजी निवडताना-चिरताना हातावर काळे-चिकट डाग पडतात? ५ सोपे उपाय- हात दिसतील स्वच्छ...

भाजी निवडताना-चिरताना हातावर काळे-चिकट डाग पडतात? ५ सोपे उपाय- हात दिसतील स्वच्छ...

tips & tricks how to remove stain from hands after peeling & cutting vegetables with amazing tips : अनेकदा धुवूनही भाजी चिऱल्यावर हातावरचे डाग आणि चिकटपणा जात नाही त्यासाठी हा उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2023 01:12 PM2023-08-11T13:12:42+5:302023-08-11T22:28:40+5:30

tips & tricks how to remove stain from hands after peeling & cutting vegetables with amazing tips : अनेकदा धुवूनही भाजी चिऱल्यावर हातावरचे डाग आणि चिकटपणा जात नाही त्यासाठी हा उपाय

tips & tricks how to remove stain from hands after peeling & cutting vegetables with amazing tips. | भाजी निवडताना-चिरताना हातावर काळे-चिकट डाग पडतात? ५ सोपे उपाय- हात दिसतील स्वच्छ...

भाजी निवडताना-चिरताना हातावर काळे-चिकट डाग पडतात? ५ सोपे उपाय- हात दिसतील स्वच्छ...

आपल्या रोजच्या आहारमधील भाजी हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. भारतीय थाळीचा विचार केल्यास, यात दोन प्रकारच्या भाज्या तर आवर्जून असतातच, एक सुकी भाजी व एक ओली रस्सा भाजी. आपल्यापैकी बहुतेकांच्या घरी देखील दोन प्रकारच्या भाज्या केल्या जातात. रोज दोन प्रकारच्या भाज्या म्हटलं की भाज्या साफ स्वच्छ करुन सोलणे किंवा निवडून ठेवणे आलेच. ही सगळी कामे घरातील गृहिणीलाच करावी लागतात. 

जेव्हा भाज्या स्वच्छ करून त्या निवडण्याचा प्रश्न जेव्हा येतो तेव्हा हे गृहिणींना अगदीच कंटाळवाणे काम वाटते. यांतील काही भाज्या या अशा असतात ज्या निवडताना आपले हात अधिक जास्त खराब होतात. कच्च्या फणसाची भाजी, अरबी, इतर कंदमूळ किंवा मेथी, पालक यांच्या मुळाशी असलेली माती यांसारख्या अनेक गोष्टींमुळे गृहिणींचे हात खराब होतात. असे काळे, लाल मातीचे किंवा इतर डाग आपल्या हातांवर तसेच राहतात. हे डाग एकदा हात धुवून निघत नाहीत. भाजी स्वच्छ करून झाल्यानंतर हे डाग पुढचे किमान २ ते ३ दिवस तरी राहतात. भाजी स्वच्छ केल्यानंतर हातांवर असे डाग राहू नयेत म्हणून काही सोपे घरगुती उपाय, पाहूयात(tips & tricks how to remove stain from hands after peeling & cutting vegetables with amazing tips).

भाजी निवडताना, कापताना हातावर डाग राहू नयेत म्हणून नेमके काय करावे ? 

१. लिंबाचा वापर कर :- हातावरील भाज्यांचे डाग साफ करण्यासाठी लिंबाचा वापर करू शकता. यासाठी थोडे पाणी गरम करून त्यात लिंबू पिळून घ्यावा.  त्यानंतर या पाण्यात पाच ते सात मिनिटे हात बुडवून ठेवावेत. याने हातावरील भाज्यांचे डाग सहज निघून जातात. 

गुळाचा चहा फुटू नये म्हणून ५ टिप्स, न फाटता - न नासता चहा होईल फक्कड !!

२. बटाट्याची मदत घ्या :- भाजी कापताना हातावरील डाग दूर करण्यासाठी आपण बटाट्याचीही मदत घेऊ शकता. यासाठी मोठ्या आकाराचा बटाटा घेऊन त्याची साल काढावी व नंतर त्याचे दोन ते तीन तुकडे करावेत. त्यानंतर बटाट्याचे हे तुकडे हातावरील डागांवर हळूवारपणे चोळा. यामुळे भाज्यांचे डाग निघून जातात. 

डाळी भिजवून ठेवण्याचे ५ फायदे, सांगतात सुप्रसिध्द शेफ पंकज भदौरिया - पचन सोपे - प्रोटीन भरपूर...

३. मीठ आणि गरम पाण्याचा वापर करा :- हातावरील भाज्यांचे डाग घालवण्यासाठी मीठ आणि गरम पाण्याचाही वापर केला जाऊ शकतो. यासाठी एका भांड्यात दोन ते तीन ग्लास पाणी ओतून ते गरम करुन घ्यावे. त्यानंतर या पाण्यात दोन ते तीन चमचे मीठ मिसळून त्याचे द्रावण तयार करा. यानंतर या मिठाच्या पाण्यांत हात बुडवून १५ ते २० मिनिटे तसेच राहू द्यात, यामुळे काही मिनिटांत हातांवरील चिकट काळे डाग निघून जातील.

तीळगुळाचे लाडू खाल्लेच असतील, आता खाऊन पाहा तीळगुळाच्या दशम्या-पावसाळ्यातला पौष्टिक आहार...

४. व्हिनेगरची मदत घ्या :- आपल्या हातावरील भाजीचे डाग काढण्यासाठी आपण व्हिनेगरचा वापर करू शकता. यासाठी तळहातावर एक किंवा दोन चमचे व्हिनेगर घ्या आणि काहीवेळासाठी हात हलकेच चोळून घ्यावेत. नंतर हात साबणाने धुवा. हातावरील डाग काही वेळात नाहीसे होतील. 

५. मोहरीच्या तेलाचा वापर करा :- ज्या भाज्या निवडल्याने किंवा कापल्याने हातांवर डाग पडतात त्या कापण्यापूर्वी किंवा स्वच्छ करण्याआधी हातावर मोहरीचे तेल लावल्यास हातावर डाग पडत नाहीत. यासाठी भाजी सोलण्यापूर्वी एक चमचा तेल घेऊन हातांच्या वरच्या व खालच्या अशा दोन्ही बाजूस लावावे. त्यामुळे हातावर डाग पडत नाहीत, तसेच त्वचा गुळगुळीत व मुलायम राहते.

Web Title: tips & tricks how to remove stain from hands after peeling & cutting vegetables with amazing tips.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.