Lokmat Sakhi >Food > शहाळ्यात पाणी जास्त आहे की मलई ? कसे ओळखाल - ६ टिप्स - अचूक निवड करणे झाले सोपे...

शहाळ्यात पाणी जास्त आहे की मलई ? कसे ओळखाल - ६ टिप्स - अचूक निवड करणे झाले सोपे...

Tips & Tricks Is There More Water Or Cream In Tender Coconut : Identify Right One Tender Coconut In Minutes With These 5 Easy Tricks : How to choose a tender coconut : शहाळ विकत घेताना लक्षात ठेवा ६ टिप्स, ठरवा शहाळ पाणीदार हवं की भरपूर मलई असणार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2025 09:13 IST2025-04-08T09:12:20+5:302025-04-08T09:13:25+5:30

Tips & Tricks Is There More Water Or Cream In Tender Coconut : Identify Right One Tender Coconut In Minutes With These 5 Easy Tricks : How to choose a tender coconut : शहाळ विकत घेताना लक्षात ठेवा ६ टिप्स, ठरवा शहाळ पाणीदार हवं की भरपूर मलई असणार...

Tips & Tricks Is There More Water Or Cream In Tender Coconut Identify Right One Tender Coconut In Minutes With These 5 Easy Tricks How to choose a tender coconut | शहाळ्यात पाणी जास्त आहे की मलई ? कसे ओळखाल - ६ टिप्स - अचूक निवड करणे झाले सोपे...

शहाळ्यात पाणी जास्त आहे की मलई ? कसे ओळखाल - ६ टिप्स - अचूक निवड करणे झाले सोपे...

उन्हाळ्यात आपण सगळेच शहाळ्याच पाणी पिणे पसंत करतो. कडक उन्हांत असे मस्त थंडगार शहाळ्याचे पाणी पिण्याची मज्जा काही औरच असते. उन्हाळ्यात शहाळ्याचे पाणी प्यायल्याने आपल्या शरीराला त्याचे अनेक फायदे मिळतात. शहाळ्याच्या पाण्यांत असलेली पोषक तत्वे, जीवनसत्वे आणि इतर काही महत्वाचे घटक कडक (Tips & Tricks Is There More Water Or Cream In Tender Coconut) उन्हापासून आपला बचाव करतात. उन्हाळ्यांत (Identify Right One Tender Coconut In Minutes With These 5 Easy Tricks) शहाळ्याचे पाणी पिणे अतिशय फायदेशीर मानले जाते. परंतु फक्त पाणीच नाही तर मलई खाणे देखील तितकेच उपयुक्त ठरते(How to choose a tender coconut).

शहाळ्याच्या पाण्यांत आणि मलईत आपल्या शरीरासाठी आवश्यक असणारी अशी अनेक पोषक तत्व असतात. उन्हाळ्यात शहाळ्याचे पाणी पिताना, काहींना पाणी भरपूर असलेलं शहाळ हवं असत, तर काहींना शहाळ्यातील मलई अधिक आवडते. परंतु शहाळ्यात नेमकं पाणी जास्त आहे का मलई हे कसं ओळखावं, हे बऱ्याचजणांना माहित नसते. यासाठी नेहमी शहाळ विकत घेताना काही गोष्टीं तपासून घेणे गरजेचे असते. शहाळ विकत घेताना त्यात मलई जास्त आहे की पाणी हे कस ओळखावं, याच्या काही सोप्या टिप्स लक्षात ठेवूयात. 

शहाळ्यात पाणी जास्त आहे की मलई कसं ओळखाल ? 

१. शहाळ कानाजवळ नेऊन हलवा आणि आवाज ऐका :- सर्वप्रथम नारळ हातात घ्या, तो तुमच्या कानाजवळ आणा आणि हळूवारपणे हलवा. जर आतून पाण्याचा मोठा आवाज येत असेल तर समजून घ्या की पाणी जास्त आहे आणि क्रीम कमी आहे. दुसरीकडे, जर आवाज हलका किंवा मंद ऐकू येत असेल तर समजून घ्या की त्यात भरपूर क्रीम आहे.

२. वजनाने अंदाज लावा :- शहाळ हातात घेऊन त्याच्या वजनानुसार अंदाज लावण्याचा प्रयत्न करा. वजनाने हलक्या नारळात सहसा पाणी असते तर जड नारळात जास्त मलई असते. यासाठीच जर तुम्हाला अधिक मलई असणार शहाळ हव असेल तर वजनाने हलक्या नारळापेक्षा नेहमी जड शहाळ विकत घ्या, जेणेकरून तुम्हांला शहाळ्यात मलई अधिक मिळेल. 

हिरव्यागार कैरीचा आंबट - गोड चटपटीत ठेचा! भाकरी - वरणभातासोबत मनसोक्त खा...

३. शहाळ्याच्या डोळ्यांकडे पाहा :- शहाळ्यावर तीन गोल खुणा असतात ज्यांना 'डोळे' म्हणतात. जर हे डोळे कठीण, कोरडे आणि खोल दिसत असतील तर समजून जा की नारळ जुना आहे आणि त्यात भरपूर मलई आहे. जर हे डोळे मऊ आणि हलके ओलसर दिसले तर त्यात जास्त पाणी असते. 

४. हलकेच शहाळ वाजवून पाहा :- शहाळ विकत घेण्याआधी ते हातात घेऊन हलकेच बोटांनी वाजवून पाहा. या शहाळ्यावर हलकेच बोटांनी टिचकी वाजवून पाहिल्यास जर जड आवाज येत असेल तर त्यात जास्त मलई असे असे समजावे. याउलट जर वाजवल्यावर पोकळ आवाज येत असेल तर पाण्याचे प्रमाण जास्त आहे असे समजावे. 

गारेगार लालचुटुक कलिंगडाचा गोळा घरीच करण्याची पाहा रेसिपी, इतकी भारी मजा येईल...

५. शहाळ्याचा पृष्ठभाग तपासून पाहा :- शहाळ विकत घेण्याआधी नेहमी त्याचा पृष्ठभाग तपासून पाहा. शहाळ्याचा पृष्ठभाग जर गुळगुळीत आणि चमकदार असेल तर त्यात जास्त पाणी असते. पण जर हा पृष्ठभाग थोडा कोरडा आणि खडबडीत असेल तर ते शहाळ मलईदार असते असे समजावे. 

६. शहाळ्याचा रंग :- शहाळ्याचा बाहेरील रंग पांढरा आणि चमकदार असेल, तर त्यात पाणी जास्त असते. याउलट जर शहाळ्याचा रंग थोडा पिवळसर किंवा तपकिरी असेल, तर त्यात मलई जास्त असण्याची शक्यता असते.

Web Title: Tips & Tricks Is There More Water Or Cream In Tender Coconut Identify Right One Tender Coconut In Minutes With These 5 Easy Tricks How to choose a tender coconut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.