Join us

फक्त २ तासांत लावा विकतसारखे दही, विरजण लावताना मिसळा ‘हा’ सिक्रेट पदार्थ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2025 16:01 IST

How to Make Curd At Home : How To Set Curd At Home : How to make Thick Curd : Homemade Curd Recipe : Tips & Tricks To Make Curd At Home : घरी लावलेलं दही घट्ट तयार होत नाही, यासाठी करून पाहा हा एक खास उपाय..

दह्याचा आपण रोजच्या जेवणात आवर्जून समावेश करतोच. दह्यासोबतच आपण दह्यापासून तयार केलेले इतर पदार्थ देखील खातो. रोजच्या जेवणात वाटीभर दह्यात साखर किंवा मीठ (How To Set Curd At Home) घालून तसेच कोशिंबिरीत दही घालून अशा वेगवेगळ्या रुपात दही खाल्ले जाते. दही खाताना आपण शक्यतो घरीच तयार केलेलं दही खाण्याला प्राधान्य देतो. काहीवेळा आपण विकतचे दही देखील आणतो, परंतु विकतच्या दह्याला (How To Set Curd At Home) घरच्या दह्यासारखी चव नसल्याने सगळ्यांना घरचेच दही खायला आवडते. विकतचे दही आणले की ते घरच्या दह्यापेक्षा थोडे अधिक घट्ट आणि जाडसर असते(Tips & Tricks To Make Curd At Home).

घरी अनेकवेळा कित्येक प्रयत्न करूनही विकतच्यासारखेच घट्ट व दाटसर दही लावता येत नाही. घरी विरजण लावून तयार केलेलं दही विकतच्या दह्यासारखे घट्ट होत नाही. परंतु जर आपल्याला बाहेर विकत मिळणाऱ्या दह्यासारखे घट्ट व जाडसर दही हवे असेल तर आता असे दही घरीच तयार करता येऊ शकते. दही लावताना जर आपण त्यात एक सिक्रेट पदार्थ घातला तर घरचे दही अगदी विकतच्या दह्यासारखे होईल. मुळात दही तयार करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. अगदी पाच ते दहा मिनीटांमध्ये आपण दह्याला विरजण लावू शकता. मात्र कधी कधी घरी लावलेलं दही घट्ट तयार होत नाही. यासाठी आपण दही तयार करताना त्यात कोणकोणते पदार्थ मिक्स करावेत ते पाहूयात. 

दही घट्ट व दाटसर लागावे म्हणून काय करावे ?

साहित्य :- 

१. दूध - १ लिटर २. मिल्क पावडर - १/३ कप ३. दह्याचे विरजण - १ वाटी

१० मिनिटांत करा सोया चंक्सचा चमचमीत पराठा, सकाळचा नाश्ता - टिफिनसाठी प्रोटीनरीच हेल्दी पर्याय...

दीपिका पादुकोणला आवडतो तसा ‘रस्सम राइस’ करायचाय? ही घ्या स्पेशल साऊथ इंडियन रेसिपी...

कृती :- 

१. सगळ्यात आधी दूध एका भांड्यात ओतून दूध गॅसच्या माध्यम आचेवर ठेवून गरम करून घ्यावे. २. दूध गरम करत असतानाच त्यात थोडी मिल्क पावडर घालावी. ३. मिल्क पावडर घातल्यानंतर ती मिल्क पावडर संपूर्णपणे दुधात विरघळवून घ्यावी. ४. त्यानंतर गॅस बंद करून दूध थंड करून घ्यावे. दूध गार झाल्यावर त्यात वाटीभर दह्याचे विरजण घालून मिक्स करुन घ्यावे. 

५. आता स्टील किंवा मातीच्या भांड्यात हे दूध ओतून या भांड्यांच्या तोंडावर अ‍ॅल्युमिनियम फॉईलच्या तुकड्याने झाकून ठेवावे. त्यानंतर दही तयार होण्यासाठी  ठेवून द्यावे.  ६. जर आपल्याकडे प्रेशर कुकर किंवा एखादा मोठा हॉट पॉट असेल तर त्यात हे दही ठेवावे. कुकरमध्ये दही ठेवण्यापूर्वी कुकर २ ते ३ मिनिटे हलका गरम करून घ्यावा. या गरम करुन घेतलेल्या कुकरच्या तळाशी एक कॉटनचा जाडा रुमाल अंथरुन घ्यावा. या रुमालावर दह्याचे भांड ठेवून कुकरचे झाकण लावून झाकून घ्यावे. त्यानंतर २ तास हे असेच ठेवून द्यावे. २ तासानंतर आपले दही तयार असेल.

टॅग्स :अन्नपाककृतीकिचन टिप्सकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.