Join us  

कांदे पोहे खाऊन कंटाळलात? ट्राय करा पोहे पकोडे, बनवायला सोपे, चविष्ट - कुरकुरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2022 7:32 PM

Pohe Pakode Recipe हिवाळ्यात काहीतरी हटके नाश्ता खायची इच्छा होते? आजच बनवा पोहे पकोडे, कुरकुरीत पकोडे करतील दिल खूश

नाश्ता म्हटलं की आपल्या डोक्यात आधी पोहे येतात. कांदे पोहे हे प्रत्येकाच्या घरात बनतात. घरातील सदस्य देखील चवीने आणि आवडीने खातात. मात्र, दररोज नाश्त्याला तेच तेच कांदे पोहे खाऊन कंटाळा आला असेल, तर पोहे पकोडे ट्राय करा. आपल्याला चविष्ट, कुरकुरीत आणि रुचकर पदार्थ खाण्याची इच्छा होत असेल तर आजच पोहे पकोडे घरात बनवून पाहा. लहानग्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हा पदार्थ आवडेल. या हिवाळ्यात जर चमचमीत पकोडे खायचे असेल तर पोहे पकोड्यांचा उत्तम बेत आखा. आणि लहान मुलांचे मन खूश करा.

पोहे पकोडे बनवण्यासाठी लागणारे साहित्य :

पोहे दीड वाटी

उकडलेले बटाटे 3

2 हिरव्या मिरच्या

2 चमचे हिरवे धणे

अर्धा टीस्पून लाल तिखट

अर्धा टीस्पून जिरे

अर्धा टीस्पून साखर

एक टीस्पून लिंबाचा रस

एक टीस्पून तेल

मीठ

कृती

सर्वप्रथम पोहे स्वच्छ करा नंतर गाळणीत टाका आणि पाण्याने धुवा, आणि भिजत ठेवा. यानंतर एका बाऊलमध्ये बटाटे उकडून सोलून मॅश करून घ्या. त्यात हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर बारीक चिरून टाका. यासह भिजत घातलेले पोहे मिक्स करा.

या मिश्रणात लाल तिखट, जिरे, साखर, आणि इतर साहित्य घालून चांगले मिक्स करा. आता गॅसवर कढई ठेवा त्यात तेल टाकून गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात मिश्रणाचे लहान गोळे करून टाका आणि पकोड्यासारखे तळून घ्या.

कढईत पकोडे टाकल्यावर दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत तळून घ्या. आपण हे पकोडे सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत गरमागरम सर्व्ह करू शकता.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स