Join us  

पालक - ब्रोकोलीची भाजी खाऊन कंटाळलात? ट्राय करा हेल्दी कटलेट, हिवाळ्यात गरमागरम पौष्टिक रेसिपी करेल दिल खुश..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2022 2:08 PM

Spinach - Broccoli Cutlets Healthy Recipe पालक आणि ब्रोकोलीची भाजी आपण खाल्लीच असेल, आता कटलेट करून पाहा.. हटके रेसिपी - चवीला उत्तम

हिवाळ्यात हिरव्या भाज्यांचा सिझन सुरू होतो. या दिवसात पालक, मेथी, शेपू, ब्रोकोली असे बरेच प्रकारच्या हिरव्या भाज्या बाजारात उपलब्ध असतात. जे खायला चविष्ट आणि आरोग्यदायी असतात. त्यातील पौष्टिक तत्वे आपल्या शरीराला ऊर्जा देतात. काहींना पाले भाज्या आवडत नाही. ज्यांना पालक आणि ब्रोकोली भाजीच्या स्वरूपात आवडत नसतील तर, त्यांनी हेल्दी पालक ब्रोकोली कटलेट पदार्थ करून पाहावा. ही हेल्दी रेसिपी आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहे. चला तर मग या पदार्थाची कृती पाहुयात.

हेल्दी पालक ब्रोकोली कटलेट बनवण्यासाठी लागणारं साहित्य

ब्रोकोली

पालक

बारीक चिरून घेतलेलं आलं

हिरवी मिरची

पनीर

चीझ क्यूब

बेसन

मीठ

काळी मिरी पावडर

चिली फ्लेक्स

कोथिंबीर

कृती

सर्वप्रथम ब्रोकोली किसून घ्या. यानंतर पालक उकळून घ्या. पालक उकळून घेतल्यानंतर त्यातील अतिरिक्त पाणी काढून टाका, आणि बारीक चिरून घ्या.नंतर एका भांड्यात पालक, ब्रोकोली घ्या. नंतर किसलेले आले,  बारीक चिरलेली हिरवी मिरची, किसलेले पनीर, एक चीज क्यूब, भाजलेले बेसन घाला.

नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर सोबत मीठ, काळी मिरी, चिली फ्लेक्स आणि काळे मीठ असे सर्व मसाले घालून चांगले मिक्स करा.आता एक नॉन-स्टिक पॅन गरम करा आणि नंतर मिश्रणाचे लहान कटलेट तयार करा. पॅन गरम झाल्यानंतर त्यात थोडे तेल टाका. मध्यम आचेवर सगळे कटलेट गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्या. अशाप्रकारे पालक ब्रोकली कटलेट रेडी.

टॅग्स :अन्नकिचन टिप्सकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.