Lokmat Sakhi >Food > नेहमीचे बुंदी रायते खाऊन कंटाळलात, करुन पाहा हे फ्रुट रायते ! हिवाळ्यातल्या जेवणाची वाढेल लज्जत

नेहमीचे बुंदी रायते खाऊन कंटाळलात, करुन पाहा हे फ्रुट रायते ! हिवाळ्यातल्या जेवणाची वाढेल लज्जत

Fruit Raita Recipe : फ्रूट रायते करायलाही सोपे आणि तोंडी लावणे म्हणून एकदम उत्तम.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2022 06:09 PM2022-12-09T18:09:04+5:302022-12-09T18:13:24+5:30

Fruit Raita Recipe : फ्रूट रायते करायलाही सोपे आणि तोंडी लावणे म्हणून एकदम उत्तम.

Tired of eating the usual bundi raita, try this fruit raita! | नेहमीचे बुंदी रायते खाऊन कंटाळलात, करुन पाहा हे फ्रुट रायते ! हिवाळ्यातल्या जेवणाची वाढेल लज्जत

नेहमीचे बुंदी रायते खाऊन कंटाळलात, करुन पाहा हे फ्रुट रायते ! हिवाळ्यातल्या जेवणाची वाढेल लज्जत

पुलाव असो किंवा बिर्याणी, भाताचा कोणताही प्रकार असो त्यासोबत तोंडी लावायला रायते हवंच. त्याशिवाय जेवण पूर्ण झाल्याचा फिल येत नाही. तस पाहायला गेलं तर रायत्याचे भरपूर प्रकार आहेत. रायते ही एक साईड डिश आहे. आपल्या आवडीनुसार शिजवलेल्या किंवा कच्च्या भाज्यांचे मिश्रण एकत्रित करून रायते बनवलं जाते तर कधी या रायत्याला खमंग फोडणी दिली जाते. बुंदी रायते, काकडी टोमॅटो रायते, बीटरूट गाजर रायते, आंब्याचं रायते यासांरखे भरपूर प्रकार तुम्हांला माहितच असतील. रायते हे मेन कोर्समधील डिशची चव अधिक वाढविण्यासाठी खाल्ले जाते. पण तेच तेच रायत्याचे प्रकार खाऊन तुम्हीसुद्धा बोअर झाला असाल तर हा एक नवीन प्रकार (Fruit Raita Recipe).


फ्रुट रायते कसे करायचे?


साहित्य

१. सफरचंद - १ कप (लहान तुकडे केलेले) 
२. अननस - १ कप (लहान तुकडे केलेले)   
३. डाळिंबाचे दाणे - १,१/२ कप  
४. दही - १,१/२ कप  
५. पुदिन्याची पाने - १/२ कप
६. काळे मीठ (संचल) - १ टेबलस्पून
७. काळीमिरी पावडर - १/४ टेबलस्पून
८. मीठ चवीनुसार

 

झटपट कृती


१. फ्रुट रायते बनविण्यासाठी दही, पुदिना, संचल, आवडीनुसार मीठ व काळीमिरी पूड हे एकत्रित करून दह्याचे मिश्रण तयार करून घ्या.   
२. हे मिश्रण किमान एक तास किंवा जोपर्यंत तुम्ही सर्व्ह करत नाही तोपर्यंत फ्रीजमध्ये ठेवा
३. जेवणापूर्वी थोडावेळ बाहेर काढा.

 

फ्रुट रायते सर्व्ह करताना 

१.सर्व्हिंग बाऊलमध्ये सगळ्यात आधी लहान तुकडे केलेल्या सफरचंदाचा थर लावून घ्या. 
२. अननसाचे लहान तुकडे घाला. मग डाळिंबाचे दाणे पसरून घ्या त्यावर थंड दह्याचे मिश्रण घाला.
२. बाऊल मधील सगळे जिन्नस व्यवस्थित हलवून घ्या.

 चविष्ट आणि झटपट होणारे फ्रुट रायत खाण्यासाठी तयार आहे.

Web Title: Tired of eating the usual bundi raita, try this fruit raita!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.