Join us  

नेहमीच्या भाज्यांचा आला कंटाळा? करा मखान्याची भाजी... अशी भाजी तुम्ही कधी खाल्ली नसेल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2022 7:49 PM

मखान्याचा चिवडा, मखान्याची खीर, मखान्यांची बर्फी अ या यादीतला आणखी एक स्वादिष्ट पदार्थ क्वचितच कोणी ऐकला खाल्ला असेल! मखान्याची भाजी चवीला स्वादिष्ट आणि गुणांनी पौष्टिक.

ठळक मुद्देदुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी पौष्टिक आणि स्वादिष्ट  मखान्यांची भाजी करता येते. मखाने तुपात कडक होईपर्यंत भाजून घ्यायला हवेत. खसखस, काजू, मगज बी आणि कांद्याचा एकत्रित स्पेशल  मसाला या भाजीला चव आणतो. 

आहारात मखान्यांना सुकामेव्याप्रमाणे महत्व आहे. मखाने खाण्याचे आरोग्यास फायदे होतात. मखान्याचा चिवडा, मखान्याची खीर, मखान्यांची बर्फी असे विविध प्रकार करता येतात. या यादीतला आणखी एक स्वादिष्ट पदार्थ क्वचितच कोणी ऐकला खाल्ला असेल! मखान्याची भाजी चवीला स्वादिष्ट आणि गुणांनी पौष्टिक. दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात मखान्यांची भाजी करुन जेवणाला पौष्टिकतेचं मूल्य प्राप्त करुन देता येतं. 

Image: Google

कशी कराल मखान्यांची भाजी?

मखान्यांची भाजी करण्यासाठी 2 कप मखाने, पाव कप मटार. 7-8 काजू, 3 बारीक चिरलेला कांदे, 1 चमचा खसखस, 1 चमचा मगज बी, 1-2 तमालपत्रं, 2 लवंगा, 2 बारीक कापलेल्या मिरच्या, 1 वेलची, 1 दालचिनीचा तुकडा, 2 चमचे बटर, 1 चमचा तूप, थोडं आलं,  1 चमचा चिली फ्लेक्स, तेल आणि चवीपुरतं मीठ घ्यावं. 

Image: Google

मखान्यांची भाजी करण्यासाठी कांदा बारीक कापून घ्यावा. कुकरच्या भांड्यात खसखस, मगज बी, 2 कांदे, काजू घालून कुकरमध्ये 2 शिट्या करुन शिजवून घ्यावेत. वाफ निघून गेल्यावर भांडं कुकरच्या बाहेर काढून ते गार होवू द्यावं. नंतर मिक्सरमधून ते बारीक वाटून घ्यावं. कांदा काजूची पेस्ट एका वाटीत काढून घ्यावी. 

Image: Google

कढईत तूप गरम करावं. गरम तुपात मखाने घालून ते कडक होईपर्यंत भाजून घ्यावेत. भाजलेले मखाने बाजूला काढून ठेवावेत. कढईत तेल  आणि थोडं बटर घालून ते गरम करावं. त्यात दालचिनी, लवंग, 1-2तमालपत्रं, वेलची घालावी. मसाले परतून घ्यावेत. हिरवी मिरची आणि कापलेला कांदा घालून तो परतून घ्यावा. कांदा परतला गेला की त्यात मटार घालून ते परतून घ्यावेत. खसखस काजू कांद्याची पेस्ट आणि रेड चिली फ्लेक्स घालून ते दोन मिनिटं परतून घ्यावं.

परतलेल्या मिश्रणात 2 कप पाणी गरम करुन घालावं. त्यात थोडं आलं किसून घालावं. मिश्रणाला उकळी आली की त्यात  भाजलेले मखाने घालावेत. ते मऊ होईपर्यंत मसाल्यात शिजू द्यावेत. मखाने शिजले की गॅस बंद करावा, ही भाजी दुपारी किंवा रात्रीच्या जेवणासाठी चविष्ट आणि पौष्टिक बेत म्हणून करता येते. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सपाककृती