स्वयंपाकघरात (Kitchen Tips) नियमित वापरण्यात येणारी भाजी म्हणजे टोमॅटो (Tomatoes). फोडणी असो किंवा चटणी, टोमॅटो घालताच पदार्थाची चव दुपट्टीने वाढते (Food). जेवणात टोमॅटो हवाच. आंबट - गोड चवीचा टोमॅटो, पदार्थाचीही चव वाढवते (Cooking Tips). टोमॅटो जेवढा चविष्ट आहे, तितकेच त्याचे गुणकारी फायदे देखील आहेत. टोमॅटोमध्ये फायबर आणि पाण्याची मात्रा जास्त प्रमाणात असते. ज्यामुळे शरीरात फॅट्स जमा होत नाही.
टोमॅटोमध्ये विटामिन, कॅल्शियम, प्रोटीन, फायबर असे अनेक गुणधर्म असतात. जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतात. जर आपल्याला टोमॅटोचा वापर फक्त फोडणीपुरतीच नसून, वेगळा पदार्थ करयचा असेल तर, टोमॅटोचं भरीत ट्राय करून पाहा. टोमॅटोचं भरीत करायला सोपं आहे. चपातीसोबत भाजी खायला नसेल तर, आपण टोमॅटोचे भरीत ट्राय करू शकता(Tomato bhorta video recipe | tamatar ka bharta).
हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी रोज खा ४ गोष्टी, LDL कोलेस्टेरॉल होईल कमी - राहाल फिट
टोमॅटोचं भरीत करण्यासाठी लागणारं साहित्य
टोमॅटो
लाल सुक्या मिरच्या
लसूण
तेल
लसूण कच्चा खावा की भाजलेला? आहारतज्ज्ञ म्हणतात ४ गोष्टींसोबत खा; मिळतील फायदेच - फायदे
कोथिंबीर
मीठ
कृती
सर्वात आधी कढई गरम करण्यासाठी ठेवा. नंतर त्यात २ चमचे तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यात २ लाल सुक्या मिरच्या घाला. लसणाच्या ४-५ पाकळ्या, कांदा आणि टोमॅटो भाजून घ्या. टोमॅटो भाजून घेतल्यानंतर त्याची साल काढा.
भाजलेलं साहित्य एका प्लेटमध्ये काढून घ्या. आणि हाताने मॅश करून घ्या. मॅश करत असताना, त्यात चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करा. अशा प्रकारे टोमॅटोचं चमचमीत - झणझणीत भरीत खाण्यासाठी रेडी. आपण हे भरीत चपाती, भात किंवा भाकरीसोबत खाऊ शकता.