जेवणताना तोंडी लावणीसाठी चटण्या, लोणचं असेल तर जेवणाची मजाच काही वेगळी असते. खोबऱ्याची चटणी, तिळाची चटणी, कैरीची चटणी, शेंगदाण्याची चटणी, लसूण चटणी अशा विविध प्रकारच्या चटण्या जेवणाबरोबर खायला असल्या तर नावडती भाजी असेल तरी घरातील मंडळी पोटभर जेवतात. रोज रोज तेच खाऊन कंटाळा आला की नवीन भाज्या काय बनवाव्यात ते सुचत नाही. (How to make tomato chutney)
घरात २ टोमॅटो असतील तर तुम्ही टोमॅटोची लज्जतदार चटणी बनवू शकता. ही चटणी बनवण्यासाठी तुम्हाला फक्त ५ ते १० मिनिटं लागतील. टोमॅटोची चटणी बनवल्यानंतर तुम्हाला भाजी बनवण्याची गरज भासणार नाही. भाजी किंवा भाताबरोबर तुम्ही ही चटणी काढू शकता. (Tomato chutney Recipe)
भाजलेल्या टोमॅटोची इस्टंट चटणी कशी करायची?
सगळ्यात आधी एक पॅनमध्ये तेल गरम करून त्यात टोमॅटोचे मोठे काप ठेवा. वरून थोडं मीठ घाला नंतर टोमॅटो पलटवा. टोमॅटो व्यवस्थित भाजल्यांतर सालं काढून घ्या. (How to make garlic Tomato Chutney Recipe)नंतर तेलात लसूण घालून फोडणी तयार करा.
गव्हाच्या पिठाचे वर्षभर टिकणारे क्रिस्पी पापड करा घरीच; ना लाटण्याचा त्रास, ना पीठ मळण्याचा..
भाजलेले टोमॅटो मॅश करून घ्या. या मिश्रणात लसणाची फोडणी घाला. त्यात चिरलेला कांदा, चिरलेली मिरची, कोथिंबीर, लाल तिखट, हळद, मीठ, लिंबाचा रस घालून एकजीव करून घ्या. तयार आहे इंस्टट टोमॅटोची चटणी, ही चटणी तुम्ही गरमागरम भाकरी, चपातीबरोबर किंवा भातबरोबर खाऊ शकता.