Lokmat Sakhi >Food > टोमॅटो झालेत स्वस्त तर करा २ महिने टिकणारी टोमॅटोची चटणी, चटपटीत चमचमीत चव

टोमॅटो झालेत स्वस्त तर करा २ महिने टिकणारी टोमॅटोची चटणी, चटपटीत चमचमीत चव

Easy And Simple Recipe For Making Delicious Tomato Chutney: टोमॅटो सध्या खूप स्वस्त झाले आहेत. त्यामुळे टोमॅटोची चटकदार चटणी करून ठेवण्याची ही एकदम उत्तम वेळ आहे.(tomato chutney recipe)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2025 14:39 IST2025-01-28T12:06:38+5:302025-01-28T14:39:59+5:30

Easy And Simple Recipe For Making Delicious Tomato Chutney: टोमॅटो सध्या खूप स्वस्त झाले आहेत. त्यामुळे टोमॅटोची चटकदार चटणी करून ठेवण्याची ही एकदम उत्तम वेळ आहे.(tomato chutney recipe)

tomato chutney recipe, how to make tomato chutney, easy and simple recipe for making delicious tomato chutney | टोमॅटो झालेत स्वस्त तर करा २ महिने टिकणारी टोमॅटोची चटणी, चटपटीत चमचमीत चव

टोमॅटो झालेत स्वस्त तर करा २ महिने टिकणारी टोमॅटोची चटणी, चटपटीत चमचमीत चव

Highlights कधी भाजी नसली तर तुम्ही ती पोळीसोबतही खाऊ शकता. पराठा, डोसा, उत्तप्पा यासोबत खाण्यासाठीही ती खूप छान लागते

भाजी, पोळी, वरण- भात असा स्वयंपाक असला तरी जेवणात तोंडी लावायला चटणी, लोणचं, कोशिंबीर लागतेच. असे पदार्थ ताटात असले की जेवणाची रंगत जास्त वाढत जाते. मग अशावेळी भाजीची किंवा वरणाची चव थोडी बिघडलेली असली तरी चालून जातं. टोमॅटोची चटणी हा असाच एक अतिशय चटकदार पदार्थ आहे जो तुमच्या जेवणाची रंगत निश्चितच जास्त वाढवतो. ही चटणी एकदा करून ठेवली की २ ते ३ महिने आरामात टिकते. त्यामुळे कधी भाजी नसली तर तुम्ही ती पोळीसोबतही खाऊ शकता (how to make tomato chutney?). पराठा, डोसा, उत्तप्पा यासोबत खाण्यासाठीही ती खूप छान लागते (tomato chutney recipe). किंवा भात- खिचडीसोबत तोंडी लावायलाही तुम्ही ती घेऊ शकता.(easy and simple recipe for making delicious tomato chutney)

टोमॅटोची चटणी करण्याची रेसिपी

 

साहित्य

अर्धा किलो लालबुंद, पिकलेले टोमॅटो

१० ते १२ लसूण पाकळ्या

१ इंच आल्याचा तुकडा

१ टेबलस्पून गूळ

१ टेबलस्पून चिंचेचा कोळ

एका लिंबाचा रस

२ ते ३ टेबलस्पून तेल

चवीनुसार लाल तिखट आणि मीठ

 

कृती

सगळ्यात आधी टोमॅटो स्वच्छ धुवून घ्या आणि त्यांना सुरीने छोटी छोटी छिद्रं पाडून घ्या. एका टोमॅटोला साधारण ४ ते ५ ठिकाणी टोचा द्या.

त्यानंतर एका पातेल्यामध्ये पाणी घ्या आणि त्या पाण्यात टोमॅटो ठेवून ते ८ ते १० मिनिटे वाफवून घ्या.

वाफवून घेतलेले टोमॅटो थंड झाले की त्यांचे साल काढून घ्या. टोमॅटो वाफवून घेतलेलं जे पाणी उरलेलं आहे ते तुम्ही वरणासाठी किंवा इतर कोणत्या रेसिपीसाठी वापरू शकता.

आता साल काढून घेतलेले टोमॅटो पावभाजी मॅशरने व्यवस्थित मॅश करून घ्या. त्यानंतर गॅसवर कढई गरम करायला ठेवा आणि त्यात मॅश केलेले टोमॅटो घालून व्यवस्थित शिजवून घ्या. जो पर्यंत टोमॅटोमधलं पाणी निघून जात नाही, तोपर्यंत ते शिजवावे. टोमॅटोमधलं पाणी पुर्णपणे संपलं की मग गॅस बंद करावा.

 

आता दुसरीकडे गॅसवर कढई गरम करायला ठेवा आणि त्यामध्ये तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर आलं, लसूण पेस्ट घालून परतून घ्या. त्यानंतर टोमॅटोची प्युरी, चिंचेचा काेळ, गूळ, लाल तिखट घाला आणि पुन्हा एकदा सगळं मिश्रण ८ ते १० मिनिटांसाठी परतून घ्या. जेव्हा चटणीला छान तेल सुटू लागेल तेव्हा गॅस बंद करा. 

चटणी जेव्हा थंड होईल तेव्हा तिच्यामध्ये लिंबाचा रस घाला आणि ती काचेच्या बरणीत घालून फ्रिजमध्ये ठेवून द्या. ही चटणी २ ते ३ महिने छान टिकते. 

 

Web Title: tomato chutney recipe, how to make tomato chutney, easy and simple recipe for making delicious tomato chutney

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.