Join us

रोज त्याच त्या भाज्या नको वाटतात? ५ मिनिटांत करा आंबट-गोड टॉमॅटोची चटणी, तोंडाला येईल चव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2024 15:10 IST

Tomato chutney Recipe : टोमॅटोची चटणी करण्याची सगळ्यात सोपी पद्धत पाहूया. ही चटणी खाल्ल्याने तोंडाला चव येते आणि भूकही खवळते.  

टोमॅटोचा वापर सर्वच भाज्यांमध्ये केला जातो. टोमॅटोमुळे पदार्थांची चव वाढते पोषण आणि चवीने परिपूर्ण टोमॅटोची चटणी  एकदा खाल्ल्यानंतर पुन्हा पुन्हा खाण्याची इच्छा होते.  (Tomato Chutney Recipe Cooking Hack) ऊन्हाळ्याच्या दिवसांत ही चटणी सर्वाधिक बनवली जाते.  कारण यामुळे शरीराचे तापमान मेंटेन राहण्यास मदत होते आणि वेगवेगळ्या आजारांपासून बचाव होतो. (Tomato chutney Recipe)

टोमॅटोची चटणी करण्याची सगळ्यात सोपी पद्धत पाहूया. ही चटणी खाल्ल्याने तोंडाला चव येते आणि भूकही खवळते.  ऊन्हाळ्याच्या दिवसांत काही खाण्याची इच्छा होत नाही भूक लागत नाही अशावेळी तुम्ही ही चटणीखाल्ली तर पोटभर जेवाल. टोमॅटोची चटणी १० मिनिटांत बनून तयार होते. (How To Make Tomato Chutney)

टोमॅटोची चटणी करण्यासाठी लागणारं साहित्य (Easy Steps To Make Tomato Chutney)

1) टोमॅटो - ४ ते ५

2) लसणाच्या पाकळ्या - ५ ते ७

3) आलं - १ टिस्पून

4) जीरं- अर्धा टिस्पून

5) आमसूल -  अर्धा टिस्पून

6) चिरलेल्या हिरवी मिरच्या- ३ ते ४

7) कोथिंबीर - २ टेबलस्पून

8) तेल- १ टिस्पून

9) साखर- अर्धा टिस्पून

10) मीठ - चवीनुसार

टोमॅटोची चटणी करण्याची सोपी पद्धत

1) टोमॅटोची आंबट-गोड चटणी करणं खूपच सोपं आहे. ही चटणी १० मिनिटांत बनून तयार होईल. टोमॅटोची चटणी करण्यासाठी लाल पिकलेल्या टोमॅटोंचा वापर करा.

2) सगळ्यात आधी टोमॅटो व्यवस्थित धुवून घ्या त्यानंतर त्याचे मोठे काप करून घ्या. त्यानंतर हिरवी मिरची,  कोथिंबीर, लसूण बारीक कापा. एका कढईत  तेल घालून ते गरम करून घ्या.

प्रोटीन परवडत नाही, पोषण कसं मिळेल? फक्त १० रूपयांत हे पदार्थ खा, हाडं-स्नायू बळकट होतील

3) तेल गरम झाल्यानंतर त्यात आलं, हिरवी मिरची, लसूण घालून काही सेकंद भाजून घ्या त्यानंतर जीरं घाला. काही सेंकंदांनी जेव्हा तुम्ही मसाले घालाल तेव्हा त्यात बारीक चिरलेले टोमॅटो,  कोथिंबीर  घाला. काहीवेळ शिजल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. हे सर्व साहित्य टोमॅटो मऊ होईपर्यंत परतवत राहा.

फिट व्हायचं तर रोज काय खाल? वाचा विराट कोहलीचा खास सल्ला, त्याच्यासारखा फिटनेस आणि एनर्जी हवी तर..

४) त्यानंतर यात आमसूल आणि चवीनुसार मीठ  घालून शिजू द्या. काहीवेळानंतर गॅस बंद करा. हे मिश्रण मिक्सरला लावून जाडसर वाटून घ्या. टोमॅटोची चटणी तयार आहे. चपाती बरोबर किंवा भाकरीबरोबर तुम्ही ही चटणी खाऊ शकता. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.