Lokmat Sakhi >Food > २ टोमॅटोची करा आंध्रा स्टाईल चटपटीत चटणी, जेवणाची वाढेल चव, २ घास खाल जास्त

२ टोमॅटोची करा आंध्रा स्टाईल चटपटीत चटणी, जेवणाची वाढेल चव, २ घास खाल जास्त

Tomato Pachadi Recipe (Andhra Style) : १० मिनिटात तयार होईल गोड-आंबट चवीची टोमॅटो चटणी, चपाती-भात कशाही बरोबर लागेल चविष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2023 11:40 AM2023-10-11T11:40:05+5:302023-10-11T11:45:33+5:30

Tomato Pachadi Recipe (Andhra Style) : १० मिनिटात तयार होईल गोड-आंबट चवीची टोमॅटो चटणी, चपाती-भात कशाही बरोबर लागेल चविष्ट

Tomato Pachadi Recipe (Andhra Style) | २ टोमॅटोची करा आंध्रा स्टाईल चटपटीत चटणी, जेवणाची वाढेल चव, २ घास खाल जास्त

२ टोमॅटोची करा आंध्रा स्टाईल चटपटीत चटणी, जेवणाची वाढेल चव, २ घास खाल जास्त

गुणधर्माने समृद्ध टोमॅटोचा (Tomato) वापर प्रत्येक भाज्यांमध्ये होतो. काही भाज्यांची चव टोमॅटोशिवाय वाढत नाही. टोमॅटोमुळे शरीराला थायामिन, नियासिन, बी जीवनसत्त्वे, मॅग्नेशियम, फॉस्फरस मिळतात. टोमॅटो खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे टोमॅटो आपल्या आहारात हवाच. परंतु, टोमॅटोचा वापर फक्त फोडणीसाठी करण्यात येत नसून, त्याची चटणी सुद्धा केली जाते.

जेवताना तोंडी लावण्यासाठी काहीतरी चटपटीत खायचं असेल तर, टोमॅटोची चटणी करून पाहा. टोमॅटोची चटपटीत चटणी जिभेची चव तर वाढवेलच शिवाय दोन घास पोटात एक्स्ट्रा जातील. टोमॅटोची आंध्रास्टाईल चटणी कशी तयार करायची पाहूयात(Tomato Pachadi Recipe-Andhra Style).

टोमॅटोची आंध्रास्टाईल चटपटीत चटणी करण्यासाठी लागणारं साहित्य

टोमॅटो

कोथिंबीर

हिरवी मिरची

शिळ्या भाकरीची करा झणझणीत ‘फोडणीची भाकरी’! -खा चविष्ट गरमागरम पदार्थ

धणे

लसूण

चिंच

मीठ

जिरं

मोहरी

लाल सुकी मिरची

हिंग

कृती

सर्वप्रथम, पॅनमध्ये एक चमचा तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यात कपभर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून परतवून घ्या, व एका बाऊलमध्ये काढून घ्या. नंतर पुन्हा पॅनमध्ये एक चमचा तेल घाला. त्यानंतर त्यात २ ते ३ बारीक चिरलेले टोमॅटो, ३ ते ४ हिरव्या किंवा पोपटी रंगाच्या मिरच्या, एक चमचा जिरं, एक चमचा धणे, एक चमचा ठेचलेला लसूण, एक चमचा पाण्यात भिजलेली चिंच, परतवून घेतलेली कोथिंबीर, कडीपत्ता व चवीनुसार मीठ घालून परतवून घ्या. २ मिनिटांसाठी टोमॅटो शिजवून घ्या.

बेसनाच्या भजींनी त्रास होतो? मग करा कपभर रव्याची भजी, अशी कुरकुरीत भजी तुम्ही खाल्ली नसतील..

२ मिनिटानंतर गॅस बंद करा. तयार मिश्रण थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या, व त्याची पेस्ट तयार करा. तयार पेस्ट एका बाऊलमध्ये काढून घ्या. फोडणीच्या पळीत एक चमचा तेल घाला, तेल गरम झाल्यानंतर त्यात एक चमचा मोहरी, एक चमचा जिरं, एक लाल सुकी मिरची, व चिमुटभर हिंग घालून परतवून घ्या. तयार फोडणी टोमॅटोच्या पेस्टमध्ये घालून मिक्स करा. अशा प्रकारे चटपटीत टोमॅटोची चटणी खाण्यासाठी रेडी.

Web Title: Tomato Pachadi Recipe (Andhra Style)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.