Lokmat Sakhi >Food > २ टॉमेटो-कपभर शेंगदाण्याची करा चमचमीत चटणी, डोसा-पराठ्यासोबत लागेल चविष्ट - खा पोटभर

२ टॉमेटो-कपभर शेंगदाण्याची करा चमचमीत चटणी, डोसा-पराठ्यासोबत लागेल चविष्ट - खा पोटभर

Tomato Peanut Chutney Recipe for Idli, Dosa : अशी टॉमेटो शेंगदाण्याची चटणी आपण कधी खाल्ली नसेल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2023 11:51 AM2023-10-18T11:51:33+5:302023-10-18T11:52:28+5:30

Tomato Peanut Chutney Recipe for Idli, Dosa : अशी टॉमेटो शेंगदाण्याची चटणी आपण कधी खाल्ली नसेल.

Tomato Peanut Chutney Recipe for Idli, Dosa | २ टॉमेटो-कपभर शेंगदाण्याची करा चमचमीत चटणी, डोसा-पराठ्यासोबत लागेल चविष्ट - खा पोटभर

२ टॉमेटो-कपभर शेंगदाण्याची करा चमचमीत चटणी, डोसा-पराठ्यासोबत लागेल चविष्ट - खा पोटभर

जेवताना तोंडी लावण्यासाठी असो किंवा इडली, डोसा, पराठ्यासोबत खाण्यासाठी चटणी ही हवीच. चटणीमुळे जेवणाची रंगत वाढते. चटणी दोन प्रकारच्या असतात. एक ओली तर दुसरी सुकी चटणी तयार केली जाते. कोथिंबीर, लसूण, शेंगदाणा, कांद्याची चटणी आपण खाल्लीच असेल. पण कधी टॉमेटो-शेंगदाण्याची चटणी करून खाल्ली आहे का?

टॉमेटो खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे बरेच जण टॉमेटोचा वापर भाज्यांमध्ये करतात. याची चटणी देखील केली जाते. जरा हटके म्हणून आपण त्यात शेंगदाणे मिक्स करू शकता. जर आपल्याला रोजची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर, टॉमेटो शेंगदाण्याची चटणी तयार करून खा. टॉमेटो-शेंगदाण्याची चटणी कशी तयार करायची? पाहूयात(Tomato Peanut Chutney Recipe for Idli, Dosa).

टॉमेटो शेंगदाण्याची चटणी करण्यासाठी लागणारं साहित्य

टॉमेटो

शेंगदाणे

तेल

हिंग

लाल सुक्या मिरच्या

आलं

चिंच

मीठ

मोहरी

आजचा रंग निळा : घ्या यादी - सांगा यापैकी किती पदार्थ तुम्ही खाल्ले आहेत?

कडीपत्ता

कृती

सर्वप्रथम, कढई गरम करण्यासाठी ठेवा. त्यात मुठभर शेंगदाणे घालून भाजून घ्या. शेंगदाणे भाजून घेतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या. कढईत २ चमचे तेल घाला, तेल गरम झाल्यानंतर त्यात चिमुटभर हिंग, ४ ते ५ लाल सुक्या मिरच्या, आल्याचे २ तुकडे घालून भाजून घ्या, व भाजलेलं साहित्य मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या. नंतर त्याच कढईत २ बारीक चिरलेले टॉमेटो, चिंचेचा छोटा तुकडा घालून परतवून घ्या. जोपर्यंत टॉमेटो मऊ होत नाही तोपर्यंत भाजून घ्या.

अर्धा कप मैदा-रव्याच्या करा पारंपारिक कडाकण्या, नवरात्रात कडाकण्यांचा पारंपरिक नैवैद्य

परतलेले टॉमेटो मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या. त्यात चवीनुसार मीठ व अर्धा कप पाणी घालून क्रिमी पेस्ट तयार करा. तयार पेस्ट एका बाऊलमध्ये काढून घ्या. फोडणीच्या पळीत २ चमचे तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यात अर्धा चमचा मोहरी व कडीपत्ता घालून परतवून घ्या, व तयार फोडणी चटणीवर ओतून मिक्स करा. अशा प्रकारे टॉमेटो शेंगदाण्याची चमचमीत चटणी खाण्यासाठी रेडी.

Web Title: Tomato Peanut Chutney Recipe for Idli, Dosa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.