Join us  

टोमॅटोचं चटपटीत, आंबट-गोड लोणचं घरीच करा; सोपी रेसिपी, सुटेल तोंडाला पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2023 1:49 PM

Tomato Pickle Recipe : बाजारातून ताजे टोमॅटो आणल्यानंतर काही सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही हे लोणचं करू शकता.

उन्हाळ्याच्या दिवसात घराघरांमध्ये  लोणचं, पापड बनवायला सुरूवात होते. लोणचं तोंडी लावणीसाठी असेल तर जेवणाची मजाच काही वेगळी असते. (Tomato Pickle Recipe) साधा वरण भात जरी बनवला असेल आणि ताटात लोणचं वाढलं तर त्या ताटाची शोभा वाढते आणि जेवणारी व्यक्ती आनंद घेऊन जेवते.(Cooking Hacks) लालबूंद टोमॅटो वापरून तुम्ही टोमॅटोचं चटपटीत लोणचं बनवू शकता. हे लोणचं करायला जास्त मेहनत लागणार नाही. बाजारातून ताजे टोमॅटो आणल्यानंतर काही सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही हे लोणचं करू शकता. (Instant Tomato Pickle Recipe)

टोमॅटोचं लोणचं कसं बनवायचं?

१) 500 ग्रॅम टोमॅटो घ्या आणि पाण्यात स्वच्छ धुवा. नंतर स्वच्छ आणि कोरड्या कापडाने पुसून कोरडे करा. 50 ग्रॅम चिंच घ्या आणि बिया काढून स्वच्छ करा.

२) टोमॅटोचे चौकोनी तुकडे करा आणि पॅनमध्ये घाला. चिंचेचा कोळ घाला आणि झाकण 2 मिनिटे बंद करा. आच मध्यम ठेवा. झाकण उघडा आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत ढवळत राहा. टोमॅटो मऊ झाले की गॅस बंद करून पूर्णपणे थंड करा.

३) फ्राय पॅनमध्ये 1 टीस्पून मेथी दाणे आणि 2 टीस्पून मोहरी घाला. ते सुगंधी होईपर्यंत भाजून घ्या. थंड करून बारीक वाटून घ्या.  टोमॅटोचे मिश्रण कोरड्या मिक्सरच्या भांड्यात घाला. 1/4 कप मीठ, 1/2 कप तिखट, 1/4 कप लसूण पाकळ्या, 1 टीस्पून हळद आणि ग्राउंड मेथी आणि मोहरी पूड घाला.  पेस्ट किंचींत बारीक करा. 

४) हे मसाले जास्त जाळू नका. गॅस मंद करा आणि तेलात लोणचे एकत्र करा. २ मिनिटे ढवळत राहा आणि गॅस बंद करा. हे मिश्रण पूर्णपणे थंड करा आणि सिरॅमिक किंवा काचेच्या भांड्यात साठवा. रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा हे लोणचं 6 महिन्यांपर्यंत टिकेल. 

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सअन्न