Lokmat Sakhi >Food > टोमॅटो महाग झाले तर आंबटपणासाठी वापरा ६ गोष्टी, टोमॅटोचा रसरशीतपणा नाही, काम भागेल...

टोमॅटो महाग झाले तर आंबटपणासाठी वापरा ६ गोष्टी, टोमॅटोचा रसरशीतपणा नाही, काम भागेल...

Tomato prices making you cry? Try these other souring agents : टोमॅटो घरात नसेल तर काय करायचे ? महागड्या टोमॅटो ऐवजी वापरा ६ इतर घरगुती पदार्थ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2023 12:36 PM2023-06-29T12:36:54+5:302023-06-29T12:42:48+5:30

Tomato prices making you cry? Try these other souring agents : टोमॅटो घरात नसेल तर काय करायचे ? महागड्या टोमॅटो ऐवजी वापरा ६ इतर घरगुती पदार्थ...

Tomato Price Hike Bothering You? Try These 6 Alternatives For Flavourful And Colourful Meals | टोमॅटो महाग झाले तर आंबटपणासाठी वापरा ६ गोष्टी, टोमॅटोचा रसरशीतपणा नाही, काम भागेल...

टोमॅटो महाग झाले तर आंबटपणासाठी वापरा ६ गोष्टी, टोमॅटोचा रसरशीतपणा नाही, काम भागेल...

टोमॅटो हा आपल्या रोजच्या वापरातला अतिशय महत्वाचा पदार्थ आहे. रोजचा स्वयंपाक टोमॅटो शिवाय बनवणे ही एक अशक्य गोष्टच आहे. भाजी, आमटी, डाळ यांसारख्या पदार्थांची चव वाढवण्यासाठी आपण त्यात आवर्जून टोमॅटो घालतो. कोणत्याही पदार्थात टोमॅटो घातल्याने त्याच्या चवीत भर पडून तो पदार्थ खूपच रुचकर लागतो. असे असले तरीही सध्याच्या काळात रोजच्या जेवणात टोमॅटोचा वापर करणे कठीण होऊन बसले आहे.

"टोमॅटोचा भाव किती महाग झाला आहे..."  "टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत..." "रोजच्या जेवणात टोमॅटोचा वापर करणे परवडत नाही..." असे संवाद सध्या सगळ्याच गृहिणींच्या तोंडून ऐकायला मिळतात. टोमॅटोचा दर वाढल्याने सगळ्यांनाच टोमॅटो खाणे परवडत नाही. सहसा कोणताही रस्सेदार किंवा ग्रेव्ही असलेला पदार्थ बनवायचा म्हटलं की आपण त्यात प्रामुख्याने टोमॅटोचा वापर करतो. टोमॅटोच्या वापराने भाजी, आमटी घट्ट व दाटसर बनवण्यास मदत होते. असे असले तरीही सध्या टोमॅटोचे भाव गगनाला भिडले असल्यामुळे रोजच्या स्वयंपाकात टोमॅटोचा वापर करणे सगळ्यांनाच शक्य होत नाही. अशावेळी नेमके काय करावे हा प्रश्न गृहिणींना पडतो. स्वयंपाक बनवताना जरी टोमॅटोचा वापर करताना आला नाही तरीही आपण त्या ऐवजी इतर पदार्थ वापरून देखील पदार्थ तितकेच चविष्ट बनवू शकतो. टोमॅटोचा वापर न करता त्या ऐवजी आपण कोणते पदार्थ वापरू शकतो, हे पाहूयात(Tomato Price Hike Bothering You? Try These 6 Alternatives For Flavourful And Colourful Meals).

टोमॅटोचा वापर न करता त्याऐवजी वापरता येणाऱ्या पदार्थांची यादी :- 

१. टोमॅटोचा सॉस :- टोमॅटो महाग झाल्यामुळे सध्या रोजच्या पदार्थात टोमॅटोचा वापर करणे कठीण झाले आहे. अशावेळी आपण टोमॅटो ऐवजी टोमॅटो सॉसचा देखील वापर करू शकतो. दररोजची भाजी, आमटी यांसारख्या पदार्थांमध्ये टोमॅटो ऐवजी टोमॅटो सॉस घालून देखील आपण हे पदार्थ तितकेच रुचकर बनवू शकतो. जर आपल्याला थोडा तिखटपणा हवा असेल तर आपण टोमॅटो - चिली सॉसचा सुद्धा वापर करू शकतो. यामुळे पदार्थांमध्ये टोमॅटोचा आंबटपणा व चिलीचा तिखटपणा उतरून पदार्थ चवीला छान तयार होतो. टोमॅटो सॉसचा वापर करताना भाजी, आमटीचे योग्य ते प्रमाण बघून मगच टोमॅटो सॉसचा वापर करावा.

टोमॅटोची पावडर करून ठेवा, आणि वर्षभर भाजी - आमटीला वापरा, पाहा कशी करायची पावडर...

२. पिकलेला भोपळा :- टोमॅटो ऐवजी आपण पिकलेल्या भोपळ्याची ग्रेव्ही तयार करून त्याचा वापर करू शकतो. कोणतीही रस्सेदार भाजी किंवा घट्ट दाटसर  ग्रेव्ही तयार करायची असल्यास आपण त्यात टोमॅटोची प्युरी बनवून घालतो. परंतु टोमॅटो प्युरी ऐवजी आपण पिकलेल्या भोपळ्याच्या ग्रेव्हीचा वापर करू शकतो. यामुळे ग्रेव्हीला दाटसरपणा येऊन ग्रेव्ही चविष्ट होण्यास मदत होते. या भोपळ्याच्या प्युरीमध्ये जर आपण व्हिनेगर मिक्स केले तर त्याची चव अगदी टोमॅटोच्या प्युरी सारखीच लागते. 

३. गाजराचा वापर करावा :- टोमॅटोचा वापर केल्याने ग्रेव्हीला छान लालसर रंग व चव प्राप्त होते. परंतु टोमॅटो महाग असल्याने आपण त्या ऐवजी गाजर किसून ग्रेव्हीत घालू शकतो यामुळे ग्रेव्हीला छान रंग व चव प्राप्त होते. गाजर किसून किंवा त्याची पेस्ट करून याचा रस भाजीत घातल्यास भाजीची ग्रेव्ही चवीला उत्तम लागते. किसलेले गाजर संपूर्णपणे मऊ होईपर्यंत शिजवावे जेणेकरून त्याचा रंग व स्वाद ग्रेव्हीत उतरेल.

विकत आणलेले टोमॅटो लगेच मऊ पडून खराब होतात, ५ सोप्या ट्रिक्स - टोमॅटो राहतील फ्रेश...

४. लाल रंगाची ढोबळी मिरची :- टोमॅटो ऐवजी आपण लाल रंगाच्या ढोबळी मिरचीचा देखील वापर करू शकतो. लाल ढोबळी मिरचीमध्ये, टोमॅटो प्रमाणेच व्हिटॅमिन सी खूप मोठ्या प्रमाणात असते. लाल ढोबळी मिरची किसून किंवा त्याची पातळ पेस्ट करून ग्रेव्हीमध्ये  घातल्यास ग्रेव्हीला छान रंग व चव प्राप्त होते. ढोबळी मिरचीच्या वापराने ग्रेव्ही घट्ट होण्यास देखील मदत मिळते. जर आपल्याला ग्रेव्ही अधिक तिखट हवी असेल तर आपण या लाल रंगाच्या ढोबळी मिरची सोबतच सुक्या लाल मिरच्यांचासुद्धा वापर करू शकतो. 

घरात विरजण नाही, बाहेरच्या दह्यानं चांगलं दही लागत नाही? १ सोपी ट्रिक, ५ मिनिटांत परफेक्ट विरजण...

५. बीटचा करा वापर :- बीटचा वापर केल्याने ग्रेव्हीला छान लाल रंग आणि चव प्राप्त होते. ज्या भाज्यांच्या ग्रेव्हीमध्ये आपण टोमॅटोची प्युरी वापरत होतो, त्या जागी किसलेल्या बीटाचा वापर करू शकतो. किसून घेतलेले बीट थोड्याशा दह्यात मिसळल्यास बीटाचा येणारा उग्र वास कमी होण्यास मदत होते. दही व बीट यांच्या एकत्रित वापरामुळे ग्रेव्हीला छान रंग व घट्टसरपणा येतो. 

६. चिंचेचा कोळ :- टोमॅटो ऐवजी आपण भाजीत किंवा ग्रेव्हीत चिंचेचा कोळ देखील घालू शकता. यामुळे ग्रेव्हीला टोमॅटोमुळे येणारा थोडासा आंबट - गोडपणा प्राप्त होण्यास मदत मिळते. याशिवाय आपण लिंबूचा रस व चिंचेचा कोळ यांचा रस काढून घेऊन त्याचा देखील वापर करू शकता.

Web Title: Tomato Price Hike Bothering You? Try These 6 Alternatives For Flavourful And Colourful Meals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :foodअन्न