Lokmat Sakhi >Food > Tomato Pulao Recipe : रोज डाळ भात खाऊन कंटाळलात? १० मिनिटांत करा चविष्ट टोमॅटो पुलाव, ही घ्या झटपट रेसेपी

Tomato Pulao Recipe : रोज डाळ भात खाऊन कंटाळलात? १० मिनिटांत करा चविष्ट टोमॅटो पुलाव, ही घ्या झटपट रेसेपी

Tomato Pulao Recipe : टोमॅटो पुलाव करायला एकदम सोप्पा असून खायला चटपटीत, स्वादीष्ट असतो. पाहूया टोमॅटो पुलावची सोप्पी  रेसेपी (How to make tomato pulao)

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2022 02:23 PM2022-11-25T14:23:11+5:302022-11-25T14:23:59+5:30

Tomato Pulao Recipe : टोमॅटो पुलाव करायला एकदम सोप्पा असून खायला चटपटीत, स्वादीष्ट असतो. पाहूया टोमॅटो पुलावची सोप्पी  रेसेपी (How to make tomato pulao)

Tomato Pulao Recipe : How to make tomato pulao, easy to make tomato pulao recipe | Tomato Pulao Recipe : रोज डाळ भात खाऊन कंटाळलात? १० मिनिटांत करा चविष्ट टोमॅटो पुलाव, ही घ्या झटपट रेसेपी

Tomato Pulao Recipe : रोज डाळ भात खाऊन कंटाळलात? १० मिनिटांत करा चविष्ट टोमॅटो पुलाव, ही घ्या झटपट रेसेपी

स्वयंपाकघरातील मोजक्या साहित्याचा वापर करून काहीतरी नवीन पदार्थ बनवावा असं अनेकांना वाटतं. कारण भाजी, चपाती, वरण भात खाऊन नेहमीच सगळ्यांना कंटाळा येतो. पुलाव, बिर्याणी नेहमीच बनवणं शक्य नसतं. (How to make tomato pulao) थंडीच्या दिवसात टोमॅटो,वाटाणे फार स्वस्त मिळतात.  रोजच्या जेवणात चेंज म्हणून तुम्ही टोमॅटो पुलाव बनवू शकता. टोमॅटो पुलाव करायला एकदम सोप्पा असून खायला चटपटीत, स्वादीष्ट असतो. पाहूया टोमॅटो पुलावची सोप्पी  रेसेपी (How to make tomato pulao)

टोमॅटो पुलाव रेसेपी

१ कप  तांदूळ

४ ते ५  टोमॅटो

१ कांदा

२ चमचे आलं, मिरची, लसणाची पेस्ट

१ चमचा जीरं 

प्रत्येकी २ चमचे लाल तिखट, हळद, गरम मसाला

१ चमचा  साखर

२ चमचे दही

२ चमचे तूप

१ वाटी  हिरवे वाटाणे

१ चमचे धणेजीरं पावडर

खडा मसाला गरजेपुरता

५ चमचे तेल

५ ते ६ कोथिंबीर काड्या, 

२ ते ३ कढीपत्ता

कृती

१) सगळ्यात आधी गॅसवर कुकर ठेवून त्यात तेल घाला तेल गरम झाल्यावर त्यात खडा मसाला, कढीपत्ता, कांदा, लसूण मिरची आल्याची पेस्ट घालावी.

२) कांदा शिजल्यानंतर त्यात टोमॅटो, मीठ मसाला,  हळद, गरम मसाला घालावा. टोमॅटो, वाटाणे घालून  सर्व साहित्य एकजीव झाल्यानंतर धुतलेले तांदूळ घालावे. 

३) तांदूळ एकजीव करून  झाल्यानंतर त्यात पुरेसं पाणी घालावं. पाणी घातल्यानंतर कुकरचं  घाकण लावा आणि २ ते ३ शिट्ट्या घ्या. त्यानंतर गॅस कमी करून कोथिंबीर घालून सर्व करा.  
 

Web Title: Tomato Pulao Recipe : How to make tomato pulao, easy to make tomato pulao recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.