Join us  

टोमॅटो सॉस आणि टोमॅटो केचअप म्हणजे एकच.. असं वाटतं तुम्हाला? त्यात काय फरक असतो वाचा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2022 4:40 PM

Tomato sauce and tomato ketchup: केचअप काय आणि सॉस काय... दोन्हीही एकच तर आहे ना, असंच जर तुम्हालाही वाटत असेल तर तुम्हीही चुकत आहात. कारण...

ठळक मुद्देखरं पाहता टोमॅटो सॉस आणि टोमॅटो केचअप हे दोन्ही पदार्थ पुर्णत: वेगवेगळे आहेत. एवढंच नाही तर ते दाेन्ही पदार्थ करण्याची रेसिपीही वेगळी असून त्यांचा वापरही वेगवेगळ्या ठिकाणी केला जातो.

दुकानात सामान आणायला गेल्यावर टोमॅटो सॉस द्या किंवा टोमॅटो केचअप द्या.. असं आपण अगदी सहज म्हणतो. सॉस काय किंवा केचअप काय, एकच तर आहे ना.. असं कुणालाही वाटणं अगदीच साहजिक आहे. कारण दोन्हींचा रंगही सारखा आणि दोन्हींच्या पॅकेटवर टोमॅटोचंच चित्र. आता प्रत्येक ब्रॅण्डनुसार चव वेगवेगळी असतेच. त्यामुळे आपल्याला हे दोन्ही पदार्थ अगदी एकच असल्यासारखे फक्त त्यांची नावं वेगवेगळी असल्यासारखी वाटतात. पण खरं पाहता टोमॅटो सॉस आणि टोमॅटो केचअप हे दोन्ही पदार्थ पुर्णत: वेगवेगळे आहेत. एवढंच नाही तर ते दाेन्ही पदार्थ करण्याची रेसिपीही वेगळी असून त्यांचा वापरही वेगवेगळ्या ठिकाणी केला जातो.(tomato sauce and tomato ketchup are same?)

 

टोमॅटो सॉस म्हणजे काय? (what is tomato sauce?)सॉस बनविण्यासाठी वेगवेगळे मसाले आणि टोमॅटोच्या रसासोबतच वेगवेगळे पदार्थ लागतात. सॉस हा असा एक पदार्थ आहे जो अन्य पदार्थांमध्ये किंवा मसाल्यांवर टाकला जातो. जेणेकरून त्या पदार्थाची, मसाल्याची चव आणखी चवदार होते. केचअप म्हणजे काय? (what is tomato ketchup?)मुळात मसालेदार असणाऱ्या टोमॅटो सॉसला जेव्हा आणखी वेगवेगळे पदार्थ टाकून तयार करण्यात येते, तेव्हा त्यापासून तयार होणाऱ्या पदार्थाला केचअप म्हणतात. चीनी भाषेतील शब्द कोईचीप यावरून केचअप शब्दाची निर्मिती झाली. केचअप हे अधिक मसालेदार असल्यामुळे ते स्वतंत्रपणे खाल्ले जाते. कोणत्याही पदार्थाची किंवा मसाल्याची चव वाढविण्यासाठी केचअपचा वापर होत नाही. त्याला स्वतंत्र अस्तित्व आहे. 

 

टोमॅटो सॉस आणि टोमॅटो केचअप यातले फरक- टोमॅटो सॉसमध्ये साखर नसते. याउलट केचअपमध्ये साखर आणि इतर गोड पदार्थही असतात.- टोमॅटो साॅसचं माॅडर्न किंवा आधुनिक रूप म्हणून टोमॅटो केचअपकडे पाहिलं जातं.- सॉस कसा बनवायचा, याच्या वेगवेगळ्या रेसिपी आहेत. पण सॉसपासून केचअप बनविण्यासाठी मात्र एकसारखी रेसिपी वापरली जाते.- पारंपरिक पदार्थांसोबत सॉस खाल्ला जातो. तसेच सॉस गोड पदार्थांसोबतही चालतो. पण केचअप मात्र फास्टफूड, चायनिज या पदार्थांमध्ये जास्त वापरलं जातं आणि त्यांची टेस्ट खुलविण्यासाठी ते अधिक योग्य ठरतं. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.