Join us  

हॉटेलसारखं परफेक्ट टोमॅटो सूप १० मिनीटांत होईल तयार; थंडीत गरमागरम सूप करा एन्जॉय, सोपी रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2022 1:34 PM

Tomato Soup Easy Recipe by Chef Kunal Kapoor : रात्रीचे जेवण हलके करायचे असेल तर पुलावसोबत किंवा नुसतेही हे सूप जेवणाची लज्जत वाढवणारे ठरते.

ठळक मुद्देआपलं सूप हॉटेलसारखं का होत नाही असा प्रश्न आपल्याला अनेकदा पडतो. काही सोप्या ट्रिक्स वापरुन पदार्थ केल्यास ते झटपट तर होतातच पण चविष्टही होतात.

थंडीच्या दिवसांत आपल्याला सारखं गरम काहीतरी प्यावसं वाटतं. जेवणातही गरम आणि पातळ काही असेल तर आपल्याला जेवण ४ घास जास्तच जातं. हॉटेलमध्ये गेलो की आपण अनेकदा जेवणाच्या आधी सूप घेतो. हे गरम सूप घेतल्याने घशाला तर बरे वाटतेच पण तब्येतीसाठीही सूप पिणे अतिशय चांगले असते. अनेक घरांत थंडीच्या दिवसांत टोमॅटो सूप, व्हेज सूप प्रामुख्याने केले जाते. रात्रीचे जेवण हलके करायचे असेल तर पुलावसोबत किंवा नुसतेही हे सूप जेवणाची लज्जत वाढवणारे ठरते. पण आपण घरी केलेले सूप हॉटेलसारखे चविष्ट होत नाही अशी तक्रार अनेक महिला करतात. त्यासाठीच प्रसिद्ध शेफ कुणाल कपूर टोमॅटो सूप करण्याची परफेक्ट रेसिपी आपल्यासोबत शेअर करतात. पाहूयात ही पद्धत नेमकी काय आहे....

(Image : Google)

साहित्य - 

१. टोमॅटो - ५ 

२. कांदा  - १ 

३. लाल शिमला मिरची - १

४. आलं - १ इंच 

५. हिरवी मिरची - १  

६. काळी मिरी - ३ ते ४ 

७. लसूण - ५ ते ७ पाकळ्या

८. मीठ - चवीनुसार 

९. तेल - २ चमचे 

१०. तुळशीची पाने - ५ - ७

११. बटर - २ चमचे 

१२. क्रिम - २ चमचे 

१३. साखर - १ चमचा  कृती -

१. टोमॅटो, कांदा, शिमला मिरची, आलं सगळं चिरुन घ्यायचे.

२. त्यामध्ये हिरवी मिरची, लसूण, काळी मिरी, तेल, मीठ आणि तुळशीची पाने घालून हे सगळे एकत्र करुन ओव्हनमध्ये किंवा कुकरमध्ये चांगले शिजवून घ्या.

३. हे मिश्रण थोडे थंड झाल्यावर ते मिक्सरमधून फिरवून त्याची पेस्ट करुन घ्या.

४. गॅसवर कढई ठेवून त्यात हे मिश्रण घाला आणि त्यात बटर, तुळशीची पाने आणि पाणी घालून सगळे एकजीव करा. 

५. टोमॅटो आंबट असल्याने आवडीनुसार तुम्ही थोडी साखर घातली तरी चालेल. 

६. सगळ्यात शेवटी फ्रेश क्रिम घालून गरमागरम सूप बाऊलमध्ये घेऊन त्याचा आस्वाद घ्या. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीथंडीत त्वचेची काळजीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.