सध्या इन्स्टंट तयार होणारे पदार्थ बाजारात सर्रास मिळतात. हे पदार्थ चुटकीसरशी तयार होतात. इन्स्टंट नूडल्स, नाश्त्याचे प्रकार यासह सूपचे पाकिटं देखील मिळतात. जे अवघ्या २ मिनिटात तयार होतात. पॅकेटमध्ये मिळणारे सूप मुलांना खूप आवडतात. पण यामध्ये आढळणारे हानिकारक घटक आरोग्याच्याच्या दृष्टीने योग्य नाही. ज्यामुळे आपण आजारी पडू शकता. थंडीचे दिवस सुरु आहेत.
जर मुलांना टेस्टी सूप पिण्याची इच्छा झाली असेल तर, त्यांना होममेड पौष्टीक टोमॅटो सूप (Tomato Soup) तयार करून द्या. टेस्टी आणि हेल्दी टोमॅटो सूप झटपट तयार होते, शिवाय चवीला ही जबरदस्त लागते (Cooking Tips). जर आपल्याला गुलाबी थंडीत हॉटेल स्टाईल टोमॅटो सूप प्यायचं असेल तर, ही रेसिपी नक्कीच ट्राय करून पाहा(Tomato Soup Recipe with Fresh Tomatoes).
टोमॅटो सूप करण्यासाठी लागणारं साहित्य
टोमॅटो
वेलची
काळी मिरी
ना गॅस, ना तूप-तेल, करा झटपट तिळाचे लाडू! फक्त ३ गोष्टी, आणि हाडं मजबूत
तमालपत्र
कांदा
लसूण
आलं
गाजर
बीटरूट
कोथिंबीर
मीठ
साखर
केचअप
लाल तिखट
कृती
सर्वप्रथम, एका पातेल्यात २ चमचे तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यात एक वेलची, ६ ते ७ काळी मिरी, २ तमालपत्र, एक बारीक चिरलेला कांदा, ३ ते ४ लसणाच्या पाकळ्या, एक इंच आलं, बारीक चिरलेला गाजर आणि बारीक चिरलेला बीटरूट घालून परतवून घ्या. नंतर त्यात बारीक चिरलेला टोमॅटो आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून साहित्य परतवून घ्या. टोमॅटो भाजून झाल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ आणि ४ कप पाणी घालून २० मिनिटांसाठी शिजवून घ्या. नंतर चमच्याच्या मदतीने खडा मसाला काढून घ्या, व गॅस बंद करा.
कोवळ्या हरबऱ्याच्या पानांची करा अस्सल गावरान झणझणीत भाजी, घ्या गावाकडची मस्त रेसिपी
थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून पेस्ट तयार करा. पेस्ट तयार केल्यानंतर एका भांड्यावर चाळणी ठेवा. चाळणीत पेस्ट ओतून प्युरी वेगळी करा. नंतर त्यात २ टेबलस्पून साखर, एक टेबलस्पून केचअप, अर्धा टेबलस्पून लाल तिखट घालून मिक्स करा. सूप मध्यम आचेवर गरम करण्यासाठी ठेवा. अशा प्रकारे टोमॅटो सूप पिण्यासाठी रेडी. सूप सर्व्ह करताना आपण त्यावर क्रीम आणि तळलेले ब्रेडचे तुकडे घालून देऊ शकता.