कधीकधी वाटतं की काहीतरी असं मस्त खावं की मूड बदलला पाहिजे. तोंडाला चव आली पाहिजे. सुटीच्या दिवशीही दुपारी किंवा सायंकाळी चहासोबत खायला काहीतरी कुरकुरीत चटपटीत हवं असतं. बाहेरून खेळून आलेल्या मुलांना रात्रीच्या जेवणाआधी काहीतरी भारी स्नॅक्स झटपट हवं असतं. छोटं गेट टुगेदर असेल तर छानसं स्टार्टर हवं असतं. आणि यासगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो, वेळेचा. फार वेळ घालवायला नको आणि विकतचं आणूनही खायला नको, पदार्थ तर असा हवा की पूर्वी कधी खाल्ला नाही किंवा नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटेल. या सगळ्या गोष्टी हव्या
तर झटपट करा, टोमॅटो वेफर्स शेवपुरी!
म्हणजे अशी शेवपूरी की बाजारात जाऊन पापडी पुऱ्याही आणायला नको, तयार वेफर्स हाताशी आहेत, १५ मिनिटांत ही टोमॅटो वेफर्स शेवपूरी करता येतो. मग करुन पहा ही टेस्टी, क्रंची रेसिपी..टोमॅटो वेफर्स शेवपुरी... ही रेसिपी करण्यासाठी जेवढी सोपी आहे, तेवढीच खाण्यासाठी टेस्टी आहे. चवबदल म्हणूनही हाएक उत्तम पदार्थ आहे. ही रेसिपी करण्यासाठी आपल्याला खूप जास्त तयारी करण्याची गरज नाही. वाटलं की करुन खाता यावा असा हा पदार्थ.
कशी करायची टोमॅटो वेफर्स शेवपुरी?
साहित्य
G- 2 चे टोमॅटो चिप्स, उकडलेला १ बटाटा, १ कांदा, चिंच- पुदिन्याची गुळ घालून केलेली चटणी,
चाट मसाला, बारिक शेव, चवीनुसार तिखट आणि मीठ.
कृती
१. टोमॅटो वेफर्स शेवपुरी करण्यासाठी सगळ्यात आधी उकडलेले बटाटे आणि बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर एकत्र करून मॅश करून घ्या. त्यामध्ये चाट मसाला आणि चवीनुसार मीठ टाका.
२. चिंच- पुदिना चटणी करण्यासाठी २ ते ३ तास पाण्यात भिजवलेली चिंच, पुदिना, कोथिंबीर जीरे हे साहित्य मिक्सरमध्ये फिरवून बारीक करून घ्या. त्यात थोडे पाणी टाका. गाळणीने पाणी गाळून टाका. चटणीचा चोथा वेगळा करून घ्या.. आता त्या पाण्यात गूळ आणि थोडंसं मीठ टाका. आता हे घरी करा किंवा हल्ली पाणीपुरीच्या या चटण्या रेडिमेडही मिळतात, एक पाकीट घेऊन या.
३. एकसारख्या आणि मोठ्या आकाराचे G- 2 टोमॅटो चिप्स एका प्लेटमध्ये मांडून ठेवा. प्रत्येक चिप्सवर कांदा आणि बटाट्याचे आपण करून ठेवलेले मिश्रण थोडे- थोडे टाका. त्यावर बारीक शेव घाला. वरतून थोडी- थोडी चिंच- पुदिन्याची चटणी घाला. हवा तर थोडा चाट मसाला टाका. झालं तयार आहे तुमची आणि चटपटीत टोमॅटो वेफर्स शेवपुरी..
खाओ, खिलाओ.. खुश हो जाओ..