Join us  

टोमॅटो जास्त झाला तर भाजीची ग्रेव्ही आंबट होते? फक्त २ टिप्स, टोमॅटो घालून रंग तर येईल पण आंबटपणा कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2023 1:52 PM

How To Reduce Sourness Of Tomato From Curry Stew Or Gravy : ग्रेव्ही करताना कांदा-टोमॅटो वाटणाचं प्रमाण चुकलं तर मसाला बिघडतो, असं होऊ नये म्हणून या टिप्स

टोमॅटो हा आपल्या जेवणातील मुख्य घटक आहे. कोणतीही भाजी, डाळ करायची असल्यास टोमॅटो शिवाय तयार होऊच शकत नाही. जर आपल्याला रस्सेदार, घट्ट ग्रेव्हीवाल्या भाज्या करायच्या असल्यास त्यात टोमॅटो भरपूर वापरला जातो. असे बरेच लोक आहेत जे टोमॅटोशिवाय स्वयंपाक करण्याची कल्पनाही करू शकत नाहीत, कारण टोमॅटो पासून मिळणारे फायदे शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात. टोमॅटो खायला रुचकर तसेच पौष्टिक आहेत. टोमॅटोच्या आंबट चवीचे कारण म्हणजे त्यात सायट्रिक ऍसिड आणि मॅलिक ऍसिड आढळतात, ज्यामुळे ते अँटासिड म्हणून काम करते. टोमॅटोची चव ही मुळातच थोडीशी आंबट गोड  असते.

घरी जर आपण छोले, मटार पनीर, व्हेज कोल्हापुरी यांसारख्या रस्सेदार भाज्या केल्या की त्यात भरपूर प्रमाणात टोमॅटो वापरतो. टोमॅटोचा वापर केल्याने या रस्सेदार भाज्या किंवा त्यांची ग्रेव्ही चवीला उत्तम तर होतेच. परंतु कधी कधी टोमॅटोच्या अधिक वापरामुळे किंवा टोमॅटो जास्त आंबट असल्यामुळे आपल्या भाजीची ग्रेव्हीदेखील आंबट होते. ग्रेव्ही झणझणीत करण्यासाठी आपण त्यात काही गरम मसाल्यांचा देखील वापर करतो. या गरम मसाल्यांचा उग्र वास ग्रेव्हीला येतो. अशावेळी भाजी कितीही टेस्टी असली तरीही ग्रेव्हीच्या आंबटपणामुळे व मसाल्यांच्या उग्र वासामुळे आपल्याला ती खाणे नकोसे वाटते. अशावेळी दोन सोप्या टीप्स वापरून आपण भाजीची ग्रेव्ही आंबट होण्यापासून वाचवू शकतो(How To Reduce Sourness Of Tomato From Curry Stew Or Gravy).

टोमॅटोमुळे भाजीची ग्रेव्ही आंबट होते ? आपण हॉटेलमध्ये गेल्यावर छोले, मटार पनीर, व्हेज कोल्हापुरी, पनीर माखनवाला यांसारख्या घट्ट ग्रेव्ही असणाऱ्या भाज्या आवडीने ऑर्डर करून खातो. हॉटेलमध्ये या भाज्या बनवण्यासाठी भरपूर प्रमाणात टोमॅटोचा वापर केलेला असतो. तरीही हॉटेलमधल्या भाज्या चवीला आंबट लागत नाहीत. याउलट भरपूर टोमॅटोचा वापर करून याच भाज्या आपण घरी केल्या तर भाजीची ग्रेव्ही आंबट होते. त्याचप्रमाणे या ग्रेव्ही तयार करताना आपण काही प्रमाणात गरम मसाल्यांचा वापर करतो. या गरम मसाल्यांचा उग्र वास देखील ग्रेव्हीत उतरतो. परंतु आता चिंता करू नका दोन सोप्या टीप्स वापरून या भाज्यांच्या ग्रेव्हीचा आंबटपणा आपण कमी करू शकतो. 

टीप १ :- भाजीच्या ग्रेव्हीसाठी किंवा रस्सेदार भाजी बनवण्यासाठी टोमॅटो कापताना टोमॅटोच्या बिया, टोमॅटोचा रस तसेच टोमॅटोच्या मधला गर काढून घ्यावा. टोमॅटोच्या रसामधून आणि बियांमधून त्याचा आंबटपणा निघून जातो. टोमॅटोच्या बिया, टोमॅटोचा रस तसेच टोमॅटोच्या मधला गर काढून केवळ टोमॅटोच्या फोडींचे बारीक तुकडेच ग्रेव्हीसाठी वापरावेत. 

टीप २ :- टोमॅटोची प्युरी करून झाल्यानंतर ती शिजवताना त्यात एक चमचा साखर घालावी. असे केल्याने ग्रेव्ही आंबट होत नाही यासोबतच ग्रेव्हीला एक प्रकारचा चमकदार रंग प्राप्त होऊन ग्रेव्ही दिसताना छान दिसते. एक चमचा साखर घातल्यामुळे ग्रेव्हीतील गरम मसाल्यांचा उग्र वाससुद्धा नाहीसा होण्यास मदत होते.         saritaskitchenofficial या इंस्टाग्राम पेजवरून टोमॅटोमुळे भाजीची ग्रेव्ही आंबट होऊ नये म्हणून दोन टीप्स सांगितल्या आहेत. भाजीची ग्रेव्ही आंबट होऊ नये म्हणून या दोन टीप्स फॉलो कराच.

टॅग्स :अन्नपाककृती