फेब्रुवारी संपून मार्च महिना सुरु झाला की वातावरणातली उष्णता वाढत जाते आणि हळूहळू मग उन्हाळ्याची चाहूल लागते. अशी उन्हाळ्याची चाहूल लागली की सगळ्यात आधी आठवण येते ती आंब्याची आणि आमरसाची. दूध आणि आंबा यांचं मिश्रण करून आपण आमरस किंवा कधी कधी मँगो लस्सी बनवतो. मँगो लस्सी म्हटलं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच अगदी आवडीने त्याचा आस्वाद घेतात. आपला हाच पदार्थ आता जगभरात गाजत असून TasteAtlas यांनी २०२३- २४ या वर्षात Dairy Beverages ची जी यादी जाहीर केली आहे (Top 10 Dairy Beverages in TasteAtlas). त्यात नंबर एक वर मँगो लस्सी असून टॉप टेनमध्ये भारताचे आणखी २ पदार्थ आहेत. (Mango Lassi is on the first rank in Top 10 Dairy Beverages in TasteAtlas)
यावरूनच आपला आंबा आणि मँगो लस्सी जगभरातील खवय्यांना किती आवडते, ते लक्षात येतं. या यादीमध्ये चाैथ्या आणि पाचव्या क्रमांकावर अनुक्रमे लस्सी आणि स्वीट लस्सी असे दोन पदार्थ आहेत.
स्वस्तातलं फर्निचरही दिसेल महागडं आणि क्लासी, २ साेपे उपाय, कमी पैशात बदलून टाका घराचा लूक
आता लस्सी आणि स्वीट लस्सी हे दोन वेगळे पदार्थ कसे, असा प्रश्न अनेक भारतीयांना पडला आहे. पण लस्सी म्हणजे ताक किंवा बटरमिल्क असावे, असा कयास अनेकजण करत आहेत.
मँगो लस्सी करण्याची रेसिपी
काही महिन्यांनी उन्हाळा येतोच आहे. त्यामुळे आतापासूनच मँगो लस्सी करण्याची ही सोपी रेसिपी पाहून ठेवा.. ही रेसिपी तरला दलाल यांच्या युट्यूब चॅनलवर शेअर केलेली आहे.
स्लायडिंग खिडक्यांच्या ट्रॅकमध्ये खूप घाण- माती अडकली? १ सोपा उपाय- विंडो ट्रॅक होईल चकाचक
साहित्य
१. २ वाट्या आंब्याच्या फोडी
२. एक वाटी ताजं दही
३. २ वाट्या दूध
४. अर्धी वाटी साखर
कृती
आंब्याच्या फोडी, दही, दूध आणि साखर हे सगळं मिक्सरमध्ये टाकून व्यवस्थित ब्लेंड करून घ्या. सगळं मिश्रण बारीक होऊन छान एकजीव झालं की झाली तयार थंडगार मँगो लस्सी...