Lokmat Sakhi >Food > Top 10 Potato Chips Brand : वेफर्स खाल्ल्याने मूड बदलतो! माहिती आहे, भारतातले टॉप १० वेफर्स ब्रॅण्ड्स कोणते आहेत?

Top 10 Potato Chips Brand : वेफर्स खाल्ल्याने मूड बदलतो! माहिती आहे, भारतातले टॉप १० वेफर्स ब्रॅण्ड्स कोणते आहेत?

Top 10 Potato Chips Brand वेफर्स आवडत नाहीत अशी माणसं वेगळीच, त्यातही मूड जर डाऊन असेल किंवा काही सेलिब्रेट करायचं असेल तर वेफर्स हवेतच..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2022 04:59 PM2022-02-04T16:59:33+5:302022-03-03T15:21:33+5:30

Top 10 Potato Chips Brand वेफर्स आवडत नाहीत अशी माणसं वेगळीच, त्यातही मूड जर डाऊन असेल किंवा काही सेलिब्रेट करायचं असेल तर वेफर्स हवेतच..

Top 10 Potato chips brand : Eating wafers changes the mood! Do you know what are the top 10 wafers brands in India? | Top 10 Potato Chips Brand : वेफर्स खाल्ल्याने मूड बदलतो! माहिती आहे, भारतातले टॉप १० वेफर्स ब्रॅण्ड्स कोणते आहेत?

Top 10 Potato Chips Brand : वेफर्स खाल्ल्याने मूड बदलतो! माहिती आहे, भारतातले टॉप १० वेफर्स ब्रॅण्ड्स कोणते आहेत?

Highlightsपोटॅटो चिप्स म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी जीव की प्राण, कुर्रमकुर्रम करत हे चिप्स खाण्याची मजाच न्यारीबाजारात सध्या एकाहून एक ब्रँडस आघाडीवर असून या वेफर्समध्ये वेगवेगळे फ्लेवर्सही पाहायला मिळतात

बटाटा वेफर्स किंवा सॉल्टेड पोटॅटो चिप्स म्हणजे आपल्या सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ. कधी चहासोबत तर कधी सँडविच, पिझ्झा, बर्गरसोबत हे वेफर्स असतील तर त्याची मजाच न्यारी. बटाट्यापासून केले जाणारे हे वेफर्स म्हणजे भारतीयांसाठी तोंडाला चव आणणारे आणि मूड चेंज करणारे ठरतात. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना वेड लावणाऱ्या या कुर्रमकुर्रम वेफर्सवर आपण पार तुटून पडतो. वेफर्स आवडतात, मूड चेंज करतात. सध्या बाजारात अनेक कंपन्यांचे वेफर्स उपलब्ध आहेत  Top 10 Potato Chips Brand. त्यातल्या सॉल्टेड वेफर्सचा हा रिव्ह्यू...दहा रुपयांच्या छोट्या पॉकेट्समध्ये हे वेफर्स मिळतात.

१. लेज (lays)

वर्षानुवर्षे आवडीचा आणि लोकप्रिय असा लेज हा पेप्सिकोचा ब्रँड. वेफर्समध्ये तर एकाहून एक भन्नाट फ्लेवर्स मिळतात. असे असले तरी सॉल्टेड लेज खाण्यातली मजा काही औरच. एखाद्या ट्रीपला नाहीतर चित्रपटगृहात, आणखी कुठेही हे सॉल्टेड लेज खाण्यातला आनंद वेगळाच असतो. भारतातील नंबर १ वेफर्स ब्रँड असलेले लेज त्याच्या आकर्षक पॅकेजिंग कलर्समुळे ओळखले जातात.

(Image : Google)
(Image : Google)

२. अंकल चिप्स (uncle chipps)

अमृत ॲग्रो; लिमिटेड हा मूळ ब्रँड असलेले अंकल चिप्स आपल्यातील अनेकांनी लहानपणी नक्की खाल्ले असतील. भारतीय चवीचे अनेक फ्लेवर्स यामध्ये देण्यात आले आहेत. भारतातील हा एक प्रसिद्ध ब्रँड असून एकेकाळी हा वेफर्सच्या उत्पादनातील हा सर्वोत्तम ब्रँड म्हणून ओळखला जायचा.

(Image : Google)
(Image : Google)

३. G2

दुगनी गुडनेस ही टॅगलाइन असलेला G2 हा ब्रँड अल्पावधीतच ग्राहकांमध्ये लोकप्रिय झाला आहे. उत्तम चवीबरोबच गुणवत्तापूर्ण असलेले G2 चे सॉल्टेड वेफर्स बाजारात अतिशय प्रसिद्ध आहेत. सॉल्टेड बटाटा वेफर्सचा कुरकुरीतपणा तुम्हाला प्रत्येक घासाला आनंद तर देईलच पण समाधानही देईल.

(Image : g2snacks.com)
(Image : g2snacks.com)

४. बिंगो ( Bingo)

लहान मुलांमध्ये प्रसिद्ध असलेला हा ब्रँड तुलनेने नवीन असला तरी त्यांची बाजारात बरीच उत्पादने आहेत. त्यांनी केलेल्या वेगवेगळ्या कॅम्पेनमुळे तरुणांमध्येही हा ब्रँड विशेष प्रसिद्ध असल्याचे पाहायला मिळते.

(Image : Google)
(Image : Google)

५. पार्ले वेफर्स (Parle wafers )

पार्ले कंपनी भारतातील चॉकलेट, बिस्कीट आणि इतरही अनेक उत्पादनांसाठी एक महत्त्वाची कंपनी आहे. पार्लेचे क्लासिक सॉल्टेड वेफर्सही तितकेच प्रसिद्ध आहेत. याशिवाय आलू चाट, पिरीपिरी, टँगी टोमॅटो अशा वेगवेगळ्या चवीमध्ये पार्लेचे वेफर्स उपलब्ध आहेत.

(Image : Google)
(Image : Google)

६. प्रिंजल्स चिप्स (Pringles)

केलॉग्ज या प्रसिद्ध कंपनीचा ब्रँड असलेले प्रिंजल्स चिप्स बाजारात उपलब्ध आहेत. त्याची चव आणि वास इतका छान आहे की आपण स्वत:ला ते खाण्यापासून रोखू शकत नाही. यामध्येही पिझ्झा, बार्बेक्यू, कॉर्न असे विविध फ्लेवर्स उपलब्ध आहेत.

(Image : Google)
(Image : Google)

७. बालाजी वेफर्स (Balaji Wafers)

आपल्या सगळ्यांना माहित असलेला हा ब्रँड नमकीन पदार्थांच्या उत्पादनातील एक अग्रेसर ब्रँड आहे. कमीत कमी किंमतीत अतिशय चांगली चव आणि उत्पादने असलेल्या बालाजीचे सॉल्टेड वेफर्स खाणे म्हणजे खऱ्या अर्थाने चेहऱ्यावर आनंद येण्यासारखे आहे.

(Image : Google)
(Image : Google)

८. हल्दीराम वेफर्स (Haldirams)

हल्दीराम हा स्वीटस आणि स्नॅक्स पदार्थ तयार करणारा भारतातील मुख्यत: महाराष्ट्रातील एक मोठा ब्रँड आहे. सध्या त्यांची बऱ्याच शहरांमध्ये आऊटलेटसही असून वेगवेगळ्या प्रकारच्या उत्तम पदार्थांमुळे ते ग्राहकांमध्ये प्रसिद्ध आहेत. इतकेच नाही तर त्यांचे सॉल्टेड आणि इतर फ्लेवरचे वेफर्सही आपल्याला जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात सहज उपलब्ध होतात.

(Image : Google)
(Image : Google)

९. यलो डायमंड (Yellow Diamond)

एखाद्या लहानशा गावात किंवा अजिबात गर्दी नसणाऱ्या एखाद्या समुद्र किनाऱ्यावरील छोट्याशा स्टॉलवर इतर कोणते नाही पण हे यलो डायमंड वेफर्स आपल्याला हमखास दिसून येतात. अशाच एखाद्या ठिकाणी खूप भूक लागलेली असताना यलो डायमंडचे सॉल्टेड वेफर्स खाणे म्हणजे पोटाला आधार मिळण्यासारखे आहे.

(Image : Google)
(Image : Google)

१०. बुधानी वेफर्स (Budhani bros)

बुधानी ब्रो वेफरवाला हा पुण्यातील एक प्रसिद्ध ब्रँड आहे. चवीला अतिशय उत्कृष्ट असलेले हे बटाटा चिप्स गुणवत्तेच्या बाबतीतही तितकेच उत्तम आहेत. हा ब्रँड सॉल्टेड वेफर्ससाठी अतिशय प्रसिद्ध ब्रँड आहे. 

(Image : Google)
(Image : Google)

Web Title: Top 10 Potato chips brand : Eating wafers changes the mood! Do you know what are the top 10 wafers brands in India?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :foodअन्न