Join us  

गोड आवडतं पण साखर खायची नाही? हे ४ पदार्थ खा, शुगर आणि वजन वाढण्याचा धोका टाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2023 4:34 PM

Top 5 Alternatives to Refined Sugar : आरोग्य तज्ज्ञांच्यामते गूळ हा पूर्णपणे नैसर्गिकरित्या बनवला जातो. याऊलट साखर बनवताना ब्लिचिंग एजंट आणि अनेक केमिकल्सचा वापर केला जातो.

डायबिटीस, लठ्ठपणा यांसारखे आजार टाळण्यासाठी गोड कमी खायचं, आहारातं साखरेचं प्रमाण कमी करा असं सांगितलं जातं. हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते साखरेऐवजी गुळाचा वापर केला तर शरीर निरोगी राहतं. (Top 5 Alternatives to Refined Sugar) तुम्हाला खरंच वजन कमी करायचं असेल तर सुरुवातीला लगेच पूर्णपणे साखर खाणं सोडू नका. आधी साखर खाणं कमी करा. नंतर साखरेऐवजी गुळ, खजूर अशा पदार्थाचा आहारात समावेश करा. यामुळे पूर्णपणे साखर सोडणं शक्य होईल.  (Natural Sweeteners That Are Good for Your Health)

गूळ आणि साखरेत काय फरक असतो?

रिपोर्ट्नुसार  गुड आणि साखर दोघांचाही सोर्स उस आहे. फक्त तयार करण्याची पद्धत वेगळी आहे. गुळाचे फायदे साखरेपेक्षा अनेक पटींनी जास्त असतात. आरोग्य तज्ज्ञांच्यामते गूळ हा पूर्णपणे नैसर्गिकरित्या बनवला जातो. याऊलट साखर बनवताना ब्लिचिंग एजंट आणि अनेक केमिकल्सचा वापर केला जातो.

रिफाइंड साखर तयार करण्यासाठी केमिकल्सचा वापर केला जातो. पण गुळाचे तसे नाही.  शरीरात रक्त कमी असल्यानंतरही गूळ खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण यात आयर्न, मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियम आणि सेलेनियम भरपूर प्रमाणात असते. साखर फक्त कॅलरीज वाढवते. याऊलट गुळात आयर्न, व्हिटामीन आणि एंटी ऑक्सिडेंट्स असतात. ज्यामळे शरीर निरोगी राहतं. आयुर्वेदानुसार गुळात एंटी एलर्जी गुण असतात. यामुळे अस्थमा,  खोकला, सर्दी, खोकला आणि छातीत जमा झालेले कप बाहेर पडण्यास मदत होते.

खजूर

रिफाईन शुगरला पर्याय म्हणून तुम्ही खजूर खाऊ शकता. खजूर फायबर, पोटॅशियम, मॅग्नेशियम, मॅंगनीज, व्हिटॅमिन बी 6 आणि कॅरोटीनॉइड आणि पॉलिफेनॉल अँटिऑक्सिडंट्ससह पोषक तत्वांचा एक चांगला स्रोत आहे.

मध

मध हो मधमाश्यांद्वारे तयार केलं जाणारं जाड, सोनेरी द्रव आहे. त्यात जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचे ट्रेस प्रमाण, तसेच वनस्पती संयुगे मुबलक प्रमाणात आहेत जे दाहक-विरोधी आणि अँटिऑक्सिडंट फायदे देतात. मध तुमच्या शरीरातील जळजळ कमी करण्यास मदत करू शकतात. टेबल शुगरपेक्षा मधाचा ग्लायसेमिक इंडेक्स (GI) किंचित कमी असतो.

खडीसाखर

अनेक रेसिपीजमध्ये खडीसाखर वापरली जाते. यात पोषक घटक असतात जे डायबिटीसच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरतात. साध्या साखरेच्या तुलनेत  खडीसाखर तब्येतीसाठी गुणकारी ठरते.

फळं

जेव्हा तुम्हाला गोड खावंस वाटत असेल तेव्हा फळं खा. पण रात्री फळं खाणं टाळा. फळांमध्ये नैसर्गिक साखर असते यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहते. 

टॅग्स :हेल्थ टिप्सवेट लॉस टिप्सफिटनेस टिप्स