पुजा, सण - समारंभ असला की आपल्याला या सगळ्या शुभ कार्यात लागतो तो नारळ. कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे घरात नेहमीच नारळ आणले जातात. या नारळातून निघणारे पाणी व खोबरे हे दोन्ही उपयुक्त असते. आपण बहुतेकवेळा बाजारांत गेल्यावर एकदाच सगळ्या वस्तू खरेदी करून आणतो. आपण आठवड्याला लागणारे नारळ देखील एकदाच खरेदी करून आणतो. हे बाजारांतून विकत आणलेले नारळ विकत घेताना बाहेरून दिसताना चांगले दिसतात, परंतु आतून काहीवेळा हे नारळ खराब निघतात.
नारळ विकत घेतल्यानंतर तो आतून चांगला निघेल की नाही अशी शंका, आपल्या मनात तो विकत घेताना असते. काहीवेळा आपण नारळाचा बाहेरचा आकार, रंग, त्याची शेंडी, वास यावरून तो आतून कसा निघेल याचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न करत असतो. आपण जरी नारळ विकत घेताना बाहेरुन कितीही अंदाज बांधला तरीही तो आतून खराब निघायचा असेल तर निघतोच. अशा आयत्यावेळी स्वयंपाक करताना खोबरे हवे असल्यास नारळ खराब निघाला तर सगळी गल्लत तर होतेच, पण याबरोबर पैसेही वाया जातात. अशावेळी नारळ खराब निघू नये म्हणून तो विकत घेताना काही गोष्टीची काळजी घेतली तर योग्य ठरू शकते. नारळ खराब निघू नये म्हणून नक्की कोणत्या टिप्स लक्षात ठेवाव्यात ते पाहूयात(Top 5 Tips to Ensure You Pick the Best Coconut).
चांगला नारळ कसा निवडावा ?
१. गोल आकाराचा नारळ निवडा :- नारळ जसजसा परिपक्व होतो तसतसा त्याचा आकार अधिक लांबट होतो. मोठ्या नारळात पाण्याचे प्रमाण कमी असल्याने नेहमी गोल आकाराचे नारळ निवडावेत. दुकानात पूर्ण गोल नारळ मिळणे शक्य नसेल तर अशावेळी कमी तिरपे असलेले आणि लांब असलेले नारळ निवडा.
एक थेंब ही तेल न वापरता फाफडा करता येतो ? पाहा, बिनतेलाची कुरकुरीत फाफडा रेसिपी...
२. नारळ हलवून पहा :- ताज्या नारळात जास्त पाणी असते, त्यामुळे तुम्ही जेव्हा तो हलवता तेव्हा त्यातून पाणी हलल्याचा आवाज येत नाही. त्यामुळे जेव्हाही तुम्ही नारळ विकत घेण्यासाठी जाल तेव्हा नारळ चांगले हलवून पहा, जर त्यातून पाण्याचा आवाज येत असेल तर समजून घ्या की त्यात पाण्याचे प्रमाण खूप कमी आहे.
३. कोंब फुटलेला नारळ घेऊ नका :- काहीवेळा नारळाचे बाहेरचे आवरण पाण्यांत भिजून नरम बराच काळ ओला राहिल्याने त्याला कोंब येण्याची शक्यता असते. अशावेळी कोंब फुटलेला नारळ खरेदी करू नये. कोंब फुटलेला नारळ आतून खराब निघण्याची शक्यता असू शकते.
उरलेले पनीर फ्रिजमध्ये ठेवले तरी लगेच शिळे - पिवळे दिसते, १ सोपी ट्रिक- पनीर राहील ताजे फ्रेश!
४. वास घेऊन तपासा :- बाहेरून सुक्या असणाऱ्या नारळाला कोणत्याही प्रकारचा वास येत नाही. अशा परिस्थितीत, बाजारातून नारळ खरेदी करताना त्याच्या दोन्ही टोकांचा वास घेण्याचा प्रयत्न करा. जर त्यातून कोणत्याही प्रकारचा तीव्र किंवा कुबट वास येत असेल तर तो विकत घेऊ नका.
उरलेला शिळा ब्रेड ताजा करण्याची १ जादूई ट्रिक, शेफ पंकज भदौरिया सांगतात...
५. आतील पाण्याचा कसा अंदाज लावावा :- नारळ विकत घेताना तो कानाजवळ नेऊन जोरजोरात हलवून पहावा. त्यात पाण्याचा आवाज येत असेल तर असा नारळ विकत घेऊ नका. नारळातून पाण्याचा आवाज आला की त्याचा अर्थ त्यात खोबरे तयार होऊ लागले आहे, आणि आतले पाणी कमी होऊ लागले आहे. याउलट नारळात पाण्याचा आवाज येत नसेल तर याचा अर्थ त्यात अजून खोबरे तयार होऊ लागलेले नाही तर तो पाण्याने पूर्ण भरलेला आहे.