Join us  

भरपूर पाणी असलेले शहाळे कसे ओळखायचे? ५ टिप्स - उन्हाळ्यात प्या शहाळ्याचे गोड पाणी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2023 2:08 PM

How Do You Choose The Best Tender Coconut : शहाळ आतून छान मलईदार व भरपूर पाणी असलेले आहे हे नेमके कसे ओळखावे यासाठी काही टिप्स समजून घेऊयात.

उन्हाळ्यात वाढत्या उष्णतेमुळे आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण हळुहळु कमी होत जाते. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ न देण्यासाठी आपण स्वतःला हायड्रेटेड ठेवणे गरजेचे असते. उन्हाळ्यात शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी आपण भरपूर पाणी, फळांचे रस, शहाळाचे पाणी जास्तीत जास्त पिण्याचा प्रयत्न करतो. उन्हाळ्यांत बरेचदा वाढत्या गरम्यामुळे आपल्याला सारखी तहान लागते, घसा कोरडा पडतो, डिहायड्रेशनमुळे चक्कर येणे यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे या ऋतूत शरीर हायड्रेटेड ठेवणं खूप गरजेच असत. 

शहाळाचे पाणी उन्हाळ्यात शरीराला आतून थंड ठेवण्याचे काम करते. अनेक आरोग्य तज्ज्ञ देखील दररोज सकाळी रिकाम्या पोटी शहाळाचे पाणी पिण्याचा सल्ला देतात. यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढवते, चयापचय सुधारते आणि वजन कमी होते असे मानले जाते. यासोबतच त्वचेमध्ये चमकही येते. अशा परिस्थितीत, उन्हाळ्याच्या ऋतूत शहाळाच्या नारळाची मागणी खूपच वाढते, ज्यामुळे इतर ऋतूंच्या तुलनेत उन्हाळ्यात ते अधिक महाग विकले जाते. आपण हे शहाळाचे पाणी पैसे देऊन विकत घेतो पण कधीकधी आपली फसवणूक होते. अनेकांना जास्त पाणी असलेले कोवळे खोबरे किंवा नारळ कसे ओळखायचे हे माहित नसल्यामुळे अनेकवेळा ते बाजारातून नारळ विकत घेऊन घरी नेतात, त्यात फारच कमी पाणी असल्याचे दिसून येते. परंतु शहाळ आतून छान मलईदार व भरपूर पाणी असलेले आहे हे नेमके कसे ओळखावे यासाठी काही टिप्स समजून घेऊयात(Top 5 Tips to Ensure You Pick the Best Tender Coconut). 

भरपूर पाणी असलेले, मलईदार शहाळे नेमके कसे ओळखावे ?  १. शहाळावर तपकिरी डाग असलेले शहाळे घेऊ नका :- हिरवा नारळ खरेदी करताना सर्व बाजूंनी नीट तपासून मगच तो खरेदी करावा. त्यावर तपकिरी रंगाचे  डाग असल्यास असा नारळ विकत घेऊ नका. जर प्रत्येकाला असे डाग असतील तर असा नारळ घ्या ज्याला कमी डाग दिसत असेल. खरं तर, नारळावर दिसणारा हा तपकिरी रंग त्याच्या जास्त पिकल्याचं लक्षण आहे, म्हणजे त्यात पाणी कमी आहे.

२. अधिक पाण्यासाठी गोल नारळ निवडा :- नारळ जसजसा परिपक्व होतो तसतसा त्याचा आकार लांब आणि लांबट होतो. मोठ्या नारळात पाण्याचे प्रमाण कमी असल्याने नेहमी गोल आकाराचे नारळ निवडावेत. दुकानात पूर्ण गोल नारळ मिळणे शक्य नसले तरी. या प्रकरणात, कमी तिरपे आणि लांब नारळ निवडावेत. 

फक्त २ कप रवा आणि १ ग्लास ताक, आप्पे करा मस्त - गुबगुबीत फुललेले...

३. नारळ हलवण्याचा प्रयत्न करा :- हिरव्या आणि ताज्या नारळात जास्त पाणी असते , त्यामुळे तो हलवल्यावर आवाज येत नाही. अशा परिस्थितीत जेव्हाही आपण नारळ पाणी विकत घेण्यासाठी जाल तेव्हा नारळ चांगले हलवून पहा, जर त्यातून पाण्याचा आवाज येत असेल तर समजून घ्या की त्यात पाण्याचे प्रमाण खूप कमी आहे.

४. नारळाचा वास घ्या :- ताज्या हिरव्या नारळाला कोणत्याही प्रकारचा वास येत नाही. अशा परिस्थितीत, बाजारातून नारळ खरेदी करताना, दोन्ही बाजूंनी वास घेण्याचा प्रयत्न करा. जर त्यातून कोणत्याही प्रकारचा तीव्र वास येत असेल तर तो विकत घेऊ नका. तसेच, बोटाने दाबल्यावर ते मऊ वाटत असल्यास, ते विकत घेऊ नका.

आईस्क्रीम विरघळले? आता करा त्याचे ४ पदार्थ, झटपट सोपे आणि गारेगार मस्त...

५. नारळाचा आकार देखील महत्वाचा आहे :- छोट्या नारळात कमी पाणी असते, पण मोठ्या नारळात जास्त पाणी असतेच असे नाही. म्हणूनच नारळ खरेदी करताना नेहमी त्याचा मध्यम आकार निवडावा, कारण त्यात पाण्याचे प्रमाण जास्त असण्याची शक्यता असते.\

टॅग्स :अन्न