नेहमी तेच तेच खाऊन कंटाळा आला की काहीतरी नवीन चवीचे पदार्थ खावेसे वाटतात. डाळ-भात नेहमीच प्रत्येक घरात खाल्ला जातो. डाळ बनवण्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. (Cooking Tips) साधं वरण, फोडणीचं वरण तुम्ही आतापर्यंत अनेकदा खाल्लं असेल तर वाटणाचं वरणही तितकंच चवदार स्वादीष्ट लागतं. वाटपाचं वरण करण्याची सोपी रेसेपी पाहूया. चपाती किंवा भाताबरोबर तुम्ही हे वरण खाऊ शकता. हे वरण खाल्ल्यानंतर रोजच्या जेवणात तुम्हाला काहीतरी बदल जाणवेल. (Traditional dal recipe)
वाटणाची डाळ बनवण्यासाठी सगळ्यात आधी तुरीची डाळ शिजवून घ्या. एका मिक्सरच्या भांड्यात खोबरं, मीठ, कोथिंबीर, आलं, लसूण, जीरं, हळद घालून बारीक पेस्ट तयार करून घ्या. एका कढईत तेल गरम करून त्यात मोहोरी, जीरं, लसूण, कढीपत्ताची पानं घाला. त्यानंतर मिक्सरमधून फिरवून घेतलेली पेस्ट त्यात घाला. ही पेस्ट तेलात व्यवस्थित मिसळल्यानंतर त्यात घोटलेली डाळ, कैरीचे तुकडे घाला. यात गरजेनुसार पाणी आणि मीठ घाला. १ उकळ आल्यानंतर गॅस बंद करा. गरमागरम वाफाळलेली डाळ भातासह सर्व्ह करा.
तुरीची डाळ खाण्याचे फायदे
१) जर तुमचं वजन जास्त असेल तर आहारात या डाळीचा समावेश अवश्य करा. यात फायबर्स, प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असतात. ज्यामुळे दीर्घकाळ पोट भरल्यासारखं वाटतं आणि भूक कमी लागते.
२) रोज तूरीची डाळ खाल्ल्यानं रोगप्रतिकारकशक्ती मजबूत राहते. यात इम्यूनोमॉड्यूलेटरी गुणधर्म असतात जे रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यास मदत करतात.
३) या डाळीच फाबरर्सचे प्रमाणही भरपूर असते. ज्यामुळे पोट फिट राहण्यास मदत होते. जे लोक रोज तुरीच्या डाळीचे सेवन करतात. त्यांना पोटाशी संबंधित आजार होत नाहीत.
४) तुरीच्या डाळीत एंटी ऑक्सिडेंट्स असतात जे डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यास साहाय्यक ठरतात. याशिवाय ही डाळ कार्बोहायड्रेट्सचाही उत्तम स्त्रोत आहे. म्हणूनच तुरीच्या डाळीचे नियमित सेवन करायला हवे.