उन्हाळ्यात कोकणातील रानमेवा प्रत्येकाला चाखायला आवडतो.(traditional Konkan mango dessert) या ऋतूमध्ये आंबा, फणस, काजू, बोर, चिंच, करवंद, जांभून चवीने खाल्ले जातात.(step by step mango sandan recipe) परंतु, फळांचा राजा असणाऱ्या आंब्याला मात्र आवर्जून खाल्ले जाते. उन्हाळ्यात आंबे बाजारात सर्वत्र दिसतात. आंब्याच्या फोडी, आमरस, लस्सी, ताक, आइस्क्रीम यांसारखे पदार्थ आपण नेहमीच खातो. (summer mango dessert ideas)गावाकडेच्या भागात आमरसासोबत घावन खाल्ली जातात.(tips for perfect mango sandan) तर आजही काही ठिकाणी आंब्याचे सांदण आवडीने खाल्ले जाते.(homemade mango dessert without oven) सतत आंबे किंवा आमरस खाऊन कंटाळाला आला असेल तर आंब्याचे सांदण ही कोकणातील पारंपरिक रेसिपी नक्की करुन पाहा.(ripe mango dessert ideas) आई-आज्जीच्या हातची चव नक्की चाखायला मिळेल. आंब्याचे सांदण कसे बनवयाचे पाहूया सोपी रेसिपी
आंब्याच्या रसातील उकडीचे मोदक! पाहा पारंपरिक आंबा मोदक रेसिपी - फुटणार नाहीत, सुबक कळीदार मोदक..
साहित्य तूप - २ चमचे तांदळाचा रवा - १ वाटी आंब्याचा गर - १ वाटीवाटलेला ओला नारळ- अर्धी वाटी गूळ - अर्धी वाटी वेलची पूड - १ चमचा केशर - २ ते ३ काड्यानारळाचे दूध - १ चमचा खायचा सोडा - चिमूटभर
कृती
1. सगळ्यात आधी कढईमध्ये तूप घालून तांदळाचा रवा चांगला भाजून घ्या.
2. आता एका पसरट भांड्यात आंब्याचा गर, वाटलेला ओला नारळ, गूळ, वेलची पूड, केशर घालून हाताने चांगले मिक्स करा.
3. यामध्ये तांदळाचा भाजलेला रवा घालून पुन्हा हाताने चांगले मिक्स करा. तासभर भिजत ठेवा.
4. त्यानंतर यात नारळाचे दूध आणि खायचा सोडा घालून पुन्हा मिश्रण चांगले मिक्स करा.
5. हे मिश्रण कप केकच्या साच्यात काढून वाफेवर ठेवा. थंड झाल्यानंतर काढा, वरुन आंब्याने सजवा तयार होईल कोकणी पद्धतीचे आंब्याचे सांदण