नवरात्र (Navratri) हा सण नऊ दिवसांचा जरी असला तरी, सलग नऊ दिवस विविध गोष्टी केल्या जातात. नऊ दिवसांचे रंग, प्रसाद, गरबा यासगळ्या गोष्टी उत्साह निर्माण करतात. नऊ दिवस वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ देवीला नैवेद्य म्हणून अर्पण केले जातात. नवरात्रीमध्ये सातव्या किंवा आठव्या दिवशी कडकण्यांचा नैवेद्य देवीला अर्पण केला जातो. कडकण्यांची माळ तयार करुन ती माळ काही लोक घटाला देखील बांधतात. या कडाकण्या चवीला भन्नाट लागतात.
गोड, खुसखुशीत, कुरकुरीत कडकण्या करायला सोपे नसतात. काही वेळेस पीठ कडक होते, तर काही वेळेस कडाकण्या मऊ तयार होतात. जर आपल्याला खुसखुशीत कडाकण्या तयार करायच्या असतील तर, स्टेप बाय स्टेप या रेसिपीला फॉलो करा. आपण या कडाकण्या चहासोबत देखील खाऊ शकता. चला तर मग कुरकुरीत कडाकण्या कसे करायचे पाहूयात(Traditional Navratri Sweet: Kadakani / Crispy Sweet Poori).
कडाकण्या करण्यासाठी लागणारं साहित्य
पिठी साखर
पाणी
रवा
मैदा
रवा बटाट्याची इडली कधी खाल्ली आहे? डाळ तांदूळ न भिजवता - न आंबवता करा झटपट इडली
मीठ
तेल
कृती
सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये पाव कप पाणी घ्या, त्यात ३ टेबलस्पून पिठी साखर घालून मिक्स करा. आपण पाण्याऐवजी दुधाचा देखील वापर करू शकता. दुसऱ्या मोठ्या बाऊलमध्ये अर्धा कप बारीक रवा, अर्धा कप मैदा, चवीनुसार मीठ व चमचाभर तेल घालून मिसळून घ्या. त्यानंतर त्यात तयार साखरेचं पाणी घालून मिक्स करा, व घट्टसर पीठ मळून घ्या. मळलेल्या पिठावर थेंबभर तेल घालून कोट करा. त्यावर झाकण ठेवा, व तासभरासाठी बाजूला ठेवा. जेणेकरून कडाकण्या खुसखुशीत तयार होतील.
नवरात्रात पोटभर खा वरीच्या तांदळाचा उपमा, पित्ताचा त्रास नाही -पचायला हलके-वजनही होईल कमी
तासाभरानंतर पुन्हा पीठ मळून घ्या, व छोटे छोटे गोळे तयार करा, व पातळ पुरीप्रमाणे लाटून घ्या. दुसरीकडे कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात कडाकण्या सोडून दोन्ही बाजूने खरपूस तळून घ्या. अशा प्रकारे कडाकण्या खाण्यासाठी रेडी. आपण या कडाकण्या हवाबंद डब्यात साठवून ठेऊ शकता.