Lokmat Sakhi >Food > ना उकड-ना पीठ मळण्याची गरज; पाहा अगदी ५ मिनिटात तांदुळाची भाकरी करण्याची सोपी कृती

ना उकड-ना पीठ मळण्याची गरज; पाहा अगदी ५ मिनिटात तांदुळाची भाकरी करण्याची सोपी कृती

Traditional Tandalache Pole- Easy Maharashtrian Bhakri Recipe : चपाती-भाकरी खाऊन कंटाळा आला असेल तर, पारंपारिक पद्धतीचे तांदुळाचे पोळे करा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2024 01:40 PM2024-04-16T13:40:51+5:302024-04-16T13:41:47+5:30

Traditional Tandalache Pole- Easy Maharashtrian Bhakri Recipe : चपाती-भाकरी खाऊन कंटाळा आला असेल तर, पारंपारिक पद्धतीचे तांदुळाचे पोळे करा..

Traditional Tandalache Pole- Easy Maharashtrian Bhakri Recipe | ना उकड-ना पीठ मळण्याची गरज; पाहा अगदी ५ मिनिटात तांदुळाची भाकरी करण्याची सोपी कृती

ना उकड-ना पीठ मळण्याची गरज; पाहा अगदी ५ मिनिटात तांदुळाची भाकरी करण्याची सोपी कृती

भाकरी खाण्याचे अनेक फायदे आहेत. भाकरी अनेक धान्यांची केली जाते (Bhakri Recipe). ज्वारी, बाजरी किंवा तांदुळाची भाकरी आपण खाल्लीच असेल. पण तांदुळाची भाकरी करणं जरा अवघड वाटते. तांदुळाची भाकरी करण्यासाठी उकड तयार करावी लागते, मग पीठ व्यवस्थित मळून भाकरी थापावी लागते (Food). जर ही प्रोसेस योग्यरीत्या झाली तरच, भाकऱ्या परफेक्ट होतात. पण काही वेळेला भाकरी किंवा चपाती खाऊन कंटाळा येतो (Cooking Tips).

जर आपल्याला भाकरी किंवा चपाती खाऊन कंटाळा आला असेल तर, तांदुळाच्या पोळे तयार करा. याला आपण शॉर्टकट पद्धतीच्या भाकऱ्या देखील म्हणू शकता. शिवाय कमी वेळात या भाकऱ्या तयारही होतात. चला तर मग तांदुळाच्या पोळे कशा तयार करायच्या पाहूयात(Traditional Tandalache Pole- Easy Maharashtrian Bhakri Recipe).

पारंपारिक तांदुळाचे पोळे करण्यासाठी लागणारं साहित्य

तांदुळाचं पीठ

मीठ

लसूण सोलणं किचकट वाटतं? चमचाभर मिठाचा करा 'असा' वापर; किलोभर लसूण सोलण्याची हटके ट्रिक

पाणी

गव्हाचं पीठ

कृती

सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये एक कप तांदुळाचं पीठ घ्या. त्यात अर्धा कप गव्हाचं पीठ आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. नंतर हळूहळू पाणी घालून गुळगुळीत पेस्ट तयार करा. जास्त पातळ ना जास्त घट्ट, ज्याप्रमाणे आपण डोश्याचं बॅटर तयार करतो, त्या पद्धतीने पेस्ट तयार करा, आणि शक्यतो हाताने मिक्स करा, जेणेकरून पोळे छान तयार होतील.

म्हशीचं की गायीचं? कोणत्या दुधाचं दही चांगलं लागतं? विकतसारखं घट्ट दही हवं तर..

बॅटर तयार झाल्यानंतर २० मिनिटांसाठी त्यावर झाकण ठेवा. २० मिनिटानंतर गॅसवर अॅल्युमिनियमचा तवा गरम करण्यासाठी ठेवा. तवा गरम झाल्यानंतर त्यावर हातानेच बॅटर सोडा, व बोटाने बॅटर पसरवा. बॅटर पसरवल्यानंतर त्यावर झाकण ठेवा. मध्यम आचेवर पोळे छान तयार होतील. २ मिनितानंतर झाकण बाजूला ठेवा, आणि पळीने पोळा अलगद उचलून दुसऱ्या बाजूनेही भाजून घ्या. अशा प्रकारे पारंपारिक पद्धतीचे तांदुळाचे पोळे खाण्यासाठी रेडी.

Web Title: Traditional Tandalache Pole- Easy Maharashtrian Bhakri Recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.