आपल्याकडे नाश्त्याला बरेचदा इडली, डोसा, मेदू वडा, उत्तपा असे साऊथ इंडियन पदार्थ आवडीने खाल्ले जातात. कधी आपण हे पदार्थ कुठल्या उडप्याकडून विकत आणतो तर कधी घरीच बनवून खातो. इडली दिसायला पांढऱ्या शुभ्र रंगाची खाण्यासाठी मऊ आणि पचण्यासाठी हलकी असते. उडीद डाळ, तांदूळ भिजवून, बारीक वाटून, आंबवून इडली बनविली जाते. इडली नारळाची चटणी किंवा सांबर यांसोबत सर्व्ह केली जाते.
आजकाल इडलीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची इडली आपल्याला खायला मिळते. या इडलीच्या प्रकारांमध्ये थट्टे इडली (Thatte Idli) ही सध्या फारच लोकप्रिय होताना दिसत आहे. थट्टे इडली ही नेहमीच्याच इडली सारखी असते, फक्त ती आकाराने थोडी मोठी असते. नेहमीची तीच ती इडली खाऊन आपल्याला कंटाळा आला असेल तर आपण घरच्या घरी झटपट होणारी थट्टे इडली (Thatte Idli Recipe) विथ पोडी मसाला (Podi Masala Recipe) असा झक्कास बेत नाश्त्याला करु शकतो. इन्स्टंट थट्टे इडली व पोडी मसाला नेमका कसा बनवायचा याचे साहित्य व कृती पाहूयात(Thatte Idli & Homemade Molagapodi Masala Recipe).
साहित्य :-
थट्टे इडलीसाठी :- (For Thatte Idli)
१. तांदूळ - २ कप
२. सुके पोहे - १, १/४ कप
३. दही - १ कप
४. पाणी - गरजेनुसार
५. इनो - गरजेनुसार
६. मीठ - चवीनुसार
७. तेल - गरजेनुसार
पोडी मसाला बनवण्यासाठी :- (For Podi Masala)
१. चणा डाळ - १/४ कप
२. पांढरी उडीद डाळ - १/२ कप
३. सफेद तीळ - १/४ कप
४. सुकी बेडगी मिरची - १० ते १२ सुक्या मिरच्या
५. हिंग - १ टेबलस्पून
६. मीठ - चवीनुसार
काही केल्या इडल्या फुगून येत नाहीत ? वापरा झटपट सोप्या टिप्स... इडली फुगेल पुरीसारखी टम्म...
इडली - डोसा - आप्पे, पदार्थ ३ - पीठ १! असे मल्टिपर्पज परफेक्ट पीठ कसे बनवायचे, पाहा कृती...
थट्टे इडली बनवण्याची कृती :- (Thatte Idli Recipe)
१. एका बाऊलमध्ये तांदूळ घेऊन ते २ वेळा स्वच्छ धुवून घ्यावेत, मग त्यात पाणी घालून हे तांदूळ ६ ते ७ तास भिजत ठेवावेत.
२. त्यानंतर एका बाऊलमध्ये पोहे घेऊन ते नरम होईपर्यंत व्यवस्थित भिजवून घ्यावेत.
३. आता भिजवलेले तांदूळ एका मिक्सरच्या भांड्यात घेऊन, त्यात भिजवलेले पोहे, दही घालून हे सगळे मिश्रण व्यवस्थित वाटून घ्यावे.
४. हे इडलीचे बॅटर मध्यम कंन्सिस्टंन्सीचे ठेवावे.
फोडशीची रानभाजी खायला नाक मुरडणारे देखील फोडशीची भजी चवीने खातील, चमचमीत व पौष्टिक रेसिपी
५. आता हे थट्टे इडलीचे तयार झालेले बॅटर एका बाऊलमध्ये काढून घ्यावे. त्यात गरजेनुसार पाणी, चवीनुसार मीठ व सोडा घालून हे मिश्रण चमच्याने ढवळून घ्यावे.
६. त्यानंतर एका छोट्या गोलाकार डिशमध्ये बटर पेपर ठेवून त्यावर थोडे तेल लावून हे इडलीचे बॅटर त्यात ओतावे व इडल्या वाफवून घ्याव्यात. (जर आपल्याकडे थट्टे इडलीचे भांडे असेल तर त्यात हे बॅटर ओतून इडल्या वाफवून घ्याव्यात.)
७. इडल्या वाफवून झाल्यावर सुरीच्या मदतीने काढून घ्याव्यात.
पोडी मसाला बनवण्याची कृती :- (Podi Masala Recipe)
१. पोडी मसाला बनवण्यासाठी चणा डाळ, पांढरी उडीद डाळ, सफेद तीळ, सुकी बेडगी मिरची हे जिन्नस प्रत्येकी एक - एक करून सुके भाजून घ्यावे.
हे जिन्नस भाजून घेताना ते मंद आचेवर भाजून घ्यावेत. हे जिन्नस थंड झाल्यावर मिक्सरला लावून त्यात चवीनुसार हिंग व मीठ घालून बारीक पूड होईपर्यंत वाटून घ्यावेत. पोडी मसाला तयार आहे.
या गरमागरम थट्टे इडलीवर थोडेसे साजूक तूप व पोडी मसाला भुरभुरवून चटणी व सांबार सोबत खाण्यासाठी थट्टे इडली सर्व्ह करावी.