Join us  

प्रवासात ‘रेल्वे कटलेट’ खायची मजाच भारी! घ्या रेल्वे कटलेटची सोपी-झटपट रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2023 2:59 PM

Train cutlet recipe | how to make railway veg cutlet पावसाळ्यात घर बसल्या रेल्वे प्रवासाचा आनंद घ्या आणि घरच्याघरी करा रेल्वे कटलेट, रेल्वेतला स्पेशल नाश्ता

भारतीय ट्रेनमधून आपण कुठेही कोणत्याही भागात जाऊ शकतो. रेल्वेमुळे आपले ट्रॅवल सोपे होऊन जाते. ट्रेनमुळे आपण काही तासात आपलं डेस्टिनेशन गाठू शकतो. रेल्वेमध्ये प्रवास करताना अनेकदा भूक लागते. आपण पाहिलंच असेल की, रेल्वेच्या डब्यांमध्ये रेल्वे कर्मचारी विविध पदार्थ विकण्यासाठी घेऊन येतात. ज्यात रेल्वे कटलेट हा पदार्थ फार फेमस आहे.

अनेक लोकं नाश्त्यासाठी रेल्वे कटलेटचा आस्वाद घेतात. विविध भाज्यांपासून तयार हा पदार्थ लोकं आवडीने खातात. परंतु, घरी करताना हा कटलेट रेल्वेमध्ये मिळतो, त्याप्रमाणे होत नाही. जर आपल्याला रेल्वे कटलेट घरच्या घरी, त्याच चवीचा तयार करायचा असेल तर, ही रेसिपी नक्की ट्राय करून पाहा(Train cutlet recipe | how to make railway veg cutlet).

रेल्वे कटलेट करण्यासाठी लागणारं साहित्य

तेल

जिरं

हिरवी मिरची

आलं

लसूण

बीटरुट

गाजर

चिरलेला पालक-किसलेला बटाटा-करुन पाहा कुरकुरीत भजी, मस्त बरसत्या पावसात खमंग बेत

फरसबी

मटार

मीठ

बटाटे

लाल तिखट

गरम मसाला

धणे पूड

हळद

आमचूर पावडर

कॉर्नफ्लोर

ब्रेडक्रँब्स

पाणी

मैदा

कृती

सर्वप्रथम, एका पॅनमध्ये २ टेबलस्पून तेल घालून गरम करण्यासाठी ठेवा, तेल गरम झाल्यानंतर त्यात एक टेबलस्पून जिरं, बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेलं आलं, बारीक चिरलेला लसूण घालून भाजून घ्या. नंतर त्यात बारीक चिरलेला बीटरूट, गाजर, फरसबी, मटार व चवीनुसार मीठ घालून २ मिनिटापर्यंत भाजून घ्या.

साहित्य मिक्स केल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्या. एका बाऊलमध्ये ३ उकडलेले बटाटे घ्या, व हाताने मॅश करा. व मॅश केलेले बटाटे भाज्यांच्या साहित्यात मिक्स करा. नंतर त्यात एक चमचा लाल तिखट, एक चमचा गरम मसाला, एक टेबलस्पून धणे पूड, अर्धा चमचा हळद, एक टेबलस्पून आमचूर पावडर, २ टेबलस्पून कॉर्नफ्लोर, तीन टेबलस्पून ब्रेडक्रँब्स घालून हाताने साहित्य मिक्स करा. व मिश्रणाला आपल्या आवडीचा आकार द्या.

१ वाटी पोह्यांची करा कुरकुरीत खमंग भजी! पाऊस - पोहे भजी आणि चहा, व्हा फ्रेश

कटलेट कोटिंगसाठी एका प्लेटमध्ये ब्रेडक्रँब्स घ्या, दुसऱ्या प्लेटमध्ये ४ चमचे मैदा, २ टेबलस्पून कॉर्नफ्लोर, व पाणी मिक्स करून पेस्ट तयार करा. दुसरीकडे पॅनमध्ये तेल घालून गरम करण्यासाठी ठेवा. कटलेट घ्या, व त्याला मैद्याच्या पेस्टमध्ये बुडवून ब्रेडक्रँब्समध्ये कोट करा. व हे कटलेट तेलामध्ये दोन्ही बाजूने सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या. अशा प्रकारे रेल्वे कटलेट खाण्यासाठी रेडी, आपण हे कटलेट सॉस किंवा चटणीसोबत खाऊ शकता.

टॅग्स :अन्नरेल्वेकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स